हार्ट अटॅक येण्याआधी ‘या’ पाच लक्षाणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष नाहीतर मरण नक्की वेळात वेळ काढून वाचा आणि स्वतःचा आणि दुसऱ्यांचा सुद्धा जीव वाचवा …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक गंभीर आजारांचे शिकार आहे तर काहींना सामान्य समस्या उद्भवत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त पुरूषांमध्येच नाही तर मोठ्या संख्येनं महिलांमध्येही हृदयाचे आजार उद्भवताना दिसतात. दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो आणि जगभरातील लोकांना हृदयाच्या आजारांबाबत जागरूक करणं हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल.

मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवून देत असते. ती लक्षणे कोणतीही याची माहिती आपल्याला नसते. म्हणून आज आपण या लेखातून या लक्षणांनी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजकालच्या या ताण-तणावाच्या जीवनामध्ये कोणतेही कारण असताना आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो पहिले लक्षण म्हणजे छातीत दुखणे. सायकल चालवल्यामुळे, जिना चढल्यामुळे किंवा कोणतेही काम करत असताना. अचानक जर छातीत दुखायला सुरुवात झाली तर समजुन जा की, ही हार्ट अटॅक येण्याची लक्षणे आहेत.

मित्रांनो दुसरे लक्षण म्हणजे उलटी येणे किंवा मळमळ होणे. बऱ्याच वेळा आपल्याला मळमळ होत असतात किंवा उलटी येत असते या वेळी आपण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु मित्रांनो हे लक्षण हृदयाकडून देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

तिसरे लक्षण म्हणजे चक्कर येणे. काही कारण नसताना अचानक जर आपल्याला चक्कर येत असेल तर, हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याच्या वेळी आपल्या शरीराला रक्त पुरवठा होण्याचा बंद होत असतो.
त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा झाल्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्याकडे देखील दुर्लक्ष करू नका.

चौथे लक्षण म्हणजे छाती जड होणे किंवा छातीवर दडपण आल्यासारखे होणे. असे होणे देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते. पाचवे लक्षण म्हणजे दम लागणे. जर आपल्याला श्वासास त्रास होत असेल. श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर, समजून जा की हे देखील हार्ट येण्याचे लक्षण आहे.

मित्रांनो पुढचे लक्षण म्हणजे खूप घाम येणे. काहीही श्रमाचे काम न करता जर, आपल्याला घाम येत असेल तर, हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण आहे. कोरडा खोकला येणे. अचानकपणे जर कोरडा खोकला येत असेल तर हा देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते.

त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाच्या आजारांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार लघवी येते आणि हृदय देखील खूप वेगाने धडधडू लागते. कधीकधी आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, परंतु ती हृदय विकाराच्या झटक्याची चिन्हं असू शकतात. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे.

त्या पुढचे लक्षण म्हणजे पाठीच्या वरच्या बाजूला वेदना होणे मित्रांनो जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. तेव्हा रुग्णाला पाठीच्या वरच्या भागात वेदना होतात. परंतु जर यासह तुम्हाला छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता येत असेल, जडपणा जाणवत असेल, मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल तर हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

अस्वस्थता होणे, चेहरा पडल्यासारखे होणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. डोके जड होणे, डोक्यात खूप कळ येणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. तर मित्रांनो अशाप्रकारे ही काही लक्षणे आहेत. ज्यामुळे आपण हार्ट अटॅक येणार असेल तर, तो जाणून घेऊ शकतो व त्याच्यावर योग्य वेळेत उपचार करू शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणे आपल्यात आढळल्यास आपण लगेच दवाखान्यात जावे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *