नागीण, नागवेढा, झोस्टर या सर्वांवर १०० % रामबाण घरगुती उपाय फक्त मोजून चार दिवसात पूर्णपणे बरा करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. तर मित्रांनो नागिन हा एक आजार अनेकांना सतावत आपल्याला पाहायला मिळते. नागिन म्हणजेच एक उष्णतेचाच प्रकार आहे. ज्यामुळे आपल्या मानेवर आणि कमरेवर जखमा होतात आणि यालाच नागिन असे नाव दिलेले आहे. तर या नागिनीमुळे बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतो. आपण डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. परंतु मित्रांनो या नागिनी मुळे भरपूर त्रास आपल्याला होतो.

तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये नागिनीवर अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि हा उपाय जर तुम्ही घरच्या घरी केला तर यामुळे तुम्हाला दोन दिवसातच हा उष्णतेचा दाह म्हणजेच नागिनीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची देखील गरज भासणार नाही.

मित्रांनो नागिन आजारावर तांदळाचे पीठ व दुर्वा अतिशय गुणकारी आहेत. दुर्वांचा रस, तांदळाचे पीठ या दोघांना एकजीव करून लेप तयार करा. हा लेप पुरुळ आलेल्या जागेवर लावा. या उपायाने नागिन पसरत नाही आणि दाहही कमी होण्यास मदत होते.

आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वनस्पतींचा फायदा आपल्याला अनेक आजारावर होत असतो. परंतु आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याकारणाने आपण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतो. दुसरा उपाय म्हणजे मंजिष्ठा. मंजिष्ठा नागीण या आजारावर खूपच गुणकारी आहे.

मंजिष्ठाचे चूर्ण रोज दोन वेळा दीड ते तीन ग्रॅम घेतल्यास नागिन आजारावर आराम मिळतो.मित्रांनो तिसरा उपाय कडुलिंबाची पाने.आपल्या आसपास कडूनिंबाची भरपूर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. कडूलिंबाचे आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे.

कडुलिंबाची पाने नागीण या त्वचा विकारावर अतिशय गुणकारी आहेत. नागिन आजारामध्ये त्वचेचा खूप दाह होत असल्यास किंवा अंगावर पुरळ आली असल्यास कडुलिंबाच्या पानांचा पाणी घालून लेप करा. हा लेप पुरळ आलेल्या भागावर दिल्याने नागिन बरी होते किंवा कडूलिंबाची पाने अंथरून त्यावर नागिन झालेल्या व्यक्तीस झोपवल्याने देखील शरीराचा दाह थांबून आराम मिळतो.

मित्रांनो चौथा उपाय काशीफळ. भोपळ्याचा देठ कडुलिंबाच्या रसात उगळा व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नागवेढा आजारातील पुरळ आलेल्या भागावर लावा. असे काही दिवस केल्यास नागिन आजारांवर नक्कीच आराम मिळतो.

तसेच मित्रांनो नागिन आजार नियंत्रणात आणण्यासाठी गरम पाण्यात थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान केल्याने फायदा होतो.अजून एक उपाय असा आहे की गोपीचंद, सापाची कात आणि गेरू सर्व समप्रमाणात घ्यायचे आहे. तुम्हाला त्याचे बारीक चूर्ण तयार करून घ्यायचे आहे . हे चूर्ण खोबरेल तेलात मिसळून तयार होणारी पेस्ट पुरळ-फोड आलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदात सांगितलेले जलोकावरचरण रक्तमुक्षण इत्यादी रक्त आणि पित्ताच्या शुद्धीचे उपचार केले पाहिजेत. नागिन उठल्यानंतर काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. दूध, मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत. लोणचे, खारवलेल्या मिरच्या, शेवया इत्यादी पदार्थ खाण टाळावेत.

तसेच आपोआप पाणी सुटणारे पदार्थ जसे की दही, गूळ इत्यादी वस्तू त्वचारोग वाढवतात. म्हणून फक्त काळजी करत राहण्यापेक्षा या घरगुती उपायांचा अवलंब करा आणि नागिन त्वचा विकारापासून सुटका करून घ्या.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *