हात जोडून विनंती करतो मुतखड्याचे ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त तीन दिवस हा उपाय करा मुतखडा तुकडे तुकडे होऊन बाहेर पडले फक्त तीन दिवसात …..!!

आरोग्य टिप्स

मित्रानो, आज-काल दिसून येणारी एक मोठी समस्या म्हणजे मुतखडा किंवा किडनी स्टोन. मीठ आणि लघवीमधील खनिज पदार्थ एकत्र आल्यामुळे मुतखडा तयार होतो. मुतखड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मुतखड्याचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतो. हा त्रास खूपच असह्य होतो. याच्या होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. कशातही लक्ष लागत नाही. मुतखडा जोपर्यंत किडनीत असतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास जाणवत नाही. पण मुत्रनलिकेत आल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात. आजकाल हा त्रास खूप साऱ्या व्यक्तींना सतावत आहे.

मित्रांनो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे, उलटी आल्यासारखे होणे, पित्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे, खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. तर आज आपण यावर काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो, मुतखड्याचा त्रास व्हायला लागला की, आपण डॉक्टरकडे जातो. सोनोग्राफी करून मुतखड्याची साईझ कळते. मुतखडा असेल तर डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. जर आपल्याला ऑपरेशन न करता किडनी स्टोन बाहेर काढायची असेल तर सर्वप्रथम आयुर्वेदिक उपाय करून पहा. आयुर्वेदिक उपायाचा फरक नाही पडला तर तुम्ही दवाखान्यात जा. असंख्य व्यक्तींचा मुतखडा आयुर्वेदिक उपायाने पडलेला आहे. आज असाच आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊयात. या उपायाने 100% मुतखडा पडतो. परंतु मुतखडा आयुष्यभर न होण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्षातून किमान एक वेळेस करायचा आहे..

मित्रांनो, यासाठी कोणते फळ लागणार आहे? ते घ्यायचं कसं? याविषयी सविस्तर माहिती घेऊ. यासाठी प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की, मुतखडा झालेल्या व्यक्तीला त्रास खूप भयंकर असतो. हा त्रास कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अर्धा कप कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा तूप टाका. प्यायला द्या. दहा मिनिटांमध्ये कसलाही पोटशूळ संपूर्णपणे थांबतो. सोबतच ज्या व्यक्तीस मुळव्याध आहे आणि मुतखडाही आहे अशा वेळेस त्या व्यक्तीने मुतखड्याचा उपाय न करता सुरुवातीला मुळव्याधाचा उपाय करा. मुळव्याध बरा झाल्यानंतर मुतखड्याचे उपाय करा. असं केल्याने त्रास आपणास जास्त होत नाही.

मित्रांनो, अशा या उपायसाठी लागणारे फळ आपणास सर्वत्र पाहायला मिळते. फळाला महाराष्ट्रमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात. गळलिंबु, इडलिंबु, शिवलिंबु, नळलिंबु, जंबुरी अशी अनेक नावे या फळाला आहेत. हे फळ आंबट, गोड, तुरट आणि कडवट आहे. ईडलिंबूची फळे साधारण जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पिकलेली पाहायला मिळतात. या फळाचे बऱ्याच ठिकाणी लोणचे बनवतात. या फळाची साल भूक वाढवणारी वायुनाशी असते. या फळाचा रस आंबट असतो. तो दातातून हिरड्यातून रक्त येते यावर खूप उपयुक्त ठरतो.

मित्रांनो सोबतच हा रस पित्तकारक, श्वासरोग, संधिवात, आमवात, कफ या रोगामध्ये अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. सायट्रिक आम्ल असते. पेप्टीन हा घटक असतो. त्यामुळे या उपायासाठी हे फळ वापरायच आहे.

मित्रांनो, ईडलिंबू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ईडलिंबूचा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. कापताना याचे तीन समान काप करायचे आहेत. म्हणजेच तीन दिवसासाठी याचा वापर करायचा आहे.

तीन पैकी यातील एक फोड वापरायची आहे. फोड कापल्यानंतर यातील बिया तुम्ही काढून वाळवून पावडर बनवून ठेवू शकता. सकाळी उठल्याबरोबर पाच ग्रॅम पावडर गरम पाण्यामध्ये घेतली तर लगेचच लघवी संबंधित जळजळ होणे किंवा लघवी संबंधीच्या सर्व तक्रारी कमी होतात.

मित्रांनो ईडलिंबूची फोड उपायासाठी वापरताना त्याची साल काढून घ्या. गराचे बारीक बारीक तुकडे करून चांगले बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. सकाळी उठल्याबरोबर ही पेस्ट तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा याचा रस तुम्ही कपड्याच्या मदतीने गाळून रस काढा. हा सुद्धा सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी पिऊ शकता. यानंतर साधारण अर्धा तास काही खायचं नाही. परंतु या दरम्यान दिवसभर जास्त पाणी प्यायच आहे.

ज्यांना मुतखडा आहे अशा व्यक्तींनी यामध्ये जी कवडी मिळते. ती कवडी रसामध्ये टाकायची आहे. अर्धा ते एक तास कवडी विरघळून जाईल आणि तो रस त्या व्यक्तीने घ्यायचा आहे. छोटा पाच एमएमचा मुतखडा तीन दिवसात पडेल. जास्त मोठ्या मुतखड्याला जास्त वेळ लागू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा पाणी पिण्याचे प्रमाण जास्त असायला हवे. यांने किडनी स्वच्छ होईल आणि किडनीमध्ये असणारी घाण आहे ते पूर्ण बाहेर पडेल. वर्षातून एक वेळेस हा उपाय करा. असा हा उपाय करताना पथ्य पाळणे खूप महत्त्वाचे आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *