फक्त एक चमचा हा पदार्थ तुळशीच्या कुंडीत टाका कितीही सुकलेली तुळस फक्त दोन दिवसात हिरवीगार होऊन डोलायला लागेल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त औषधी वनस्पती. हिंदू धर्मात तुळशीचं एक वेगळंच स्थान आहे. आणि ते का आहे हे आता आपल्याला नक्कीच कळलं असेल. कारण आता तुळस एक ट्रेंडिंग वनस्पती बनली आहे. सगळेच डायटीशीयन, प्रसिद्ध शेफ, सेलेब्रिटी फूड कौन्सेलर सगळेच तुळशीचा आपल्या प्रत्येक डिशमध्ये, नवीन इन्व्हेन्शनमध्ये तुळशीचा वापर करताना दिसतात आणि आपल्या आरोग्यासाठी तुळस किती महत्त्वाची आहे हे आता पाश्चात्य लोक सुद्धा मान्य करतायत. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करून, तिची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. यामागील कारण हे की तुळस इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राण वायू देते.

आणि त्याचबरोबर आयुर्वेदातही तुळशीच्या औषधी गुणधर्मांबाबत सांगितले आहे. कोणी धर्म, श्रद्धा म्हणून तर कोणी आरोग्यविषयक कारणांसाठी घरात तुळस ठेवतो. प्रत्येक घरात एक तरी तुळस असतेच. पण तुळशीबाबत अनेकांची तक्रार असते की तुळस खूप लवकर सुकते. अनेकदा व्यवस्थित पाणी घालूनही तुळशीची पानं गळतात. तुळशीचं झाड सुकण्याची अनेक कारणे असू शकतात.
उष्णता, गरमीमुळे तुळशीचे झाड सुकते असा अनेकांचा अंदाज आहे, तर एखाद्याला वाटते की तुळशीचे झाड हिवाळ्यात दवांमुळे खराब होते. पण जेव्हा काही लोकांचे तुळशीचे रोप पावसाळ्यातही टिकू शकत नाही, तेव्हा त्यांचे सर्व अंदाज चुकतात.

कारण तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. एक प्रकारे, असे म्हणता येईल की तुळशीच्या झाडाला जास्त काळजीची गरज नाही, त्यामुळे तुळशीची वनस्पती कमी पाण्यात, कमी सूर्यप्रकाश आणि कमी हवेमध्ये जगू शकते. पण जर ती सारखी कोरडी होऊन पानं गळत असतील तर काही उपाय करून पुन्हा हिरवेगार केले जाऊ शकते. जर तुमच्या घरचे तुळशीचे रोप पूर्णपणे सुकले असेल आणि तुम्हाला ते पुन्हा हिरवे दिसावे असे वाटत असेल, दर महिन्याला फक्त 2 चमचे कडुलिंबाची पावडर वापरा. तुळस सुकल्यानंतर कडुलिंबाची पावडर टाकली की तुळशीच्या लागवडीनंतर नवीन पाने देखील रोपामध्ये येऊ लागतील आणि वनस्पती सुकणार नाही.

आणि मित्रांनो हे करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला कडुनिंबाच्या पानांची पावडर झाडाच्या मातीमध्ये चांगले मिसळावी लागेल. असे केल्याने तुळशीच्या रोपाला बराच फायदा होईल. पावसाळ्यात जेव्हा तुळशीच्या रोपामध्ये जास्त पाणी जमा होते, तेव्हा पाने गळू लागतात. याचे कारण झाडाला आवश्यकतेपेक्षा जास्त ओलावा मिळत आहे. अशा स्थितीत झाडाची मुळे श्वास घेऊ शकत नाहीत आणि परिस्थिती अशी येते की हळूहळू तुळस सुकू लागते. आणि त्यावेळी आपण एक छोटासा उपाय करू शकतो तो म्हणजे अशावेळी वनस्पतीपासून 20 सेंटीमीटर खालपर्यंत माती खणून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की जमिनीत ओलावा आहे की नाही. तसे असल्यास, ती कोरडी माती आणि वाळूने भरा पुन्हा कुंडी भरा. यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेऊ शकतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुमचे तुळशीचे जे रूप आहे तो वारंवार सुकत असेल आणि त्याला मुबलक प्रमाणात पोषक घटक मिळत नसतील तर मित्रांनो अशा वेळी आपण मॅग्नेशियम सल्फेट याची पावडर जे आपल्याला कोणत्याही मेडिकल दुकानांमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होते तेथून तुम्ही आणून याचा वापर एक एक चमचा करू शकता मित्रांनो यामुळे आपल्या तुळशीच्या रोपाला जे काही पोषण घटक हवे आहेत ते लवकरात लवकर मिळतातच आणि त्याचबरोबर तुळशीची रोपे लवकरात लवकर मोठे होण्यासाठी यामुळे मदत होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *