तूप न खाणाऱ्यांनो हा लेख एक वेळा नक्की वाचाच तूप खाण्याचे हे अद्भुत फायदे वाचून तुम्ही पण आजपासून खायला सुरवात कराल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून तुपाचा समावेश केला जात आहे आणि तुपाचा समावेश केल्याने आपल्याला जेवण रुचकर सुद्धा लागते. जेवनाला वेगळी चव सुद्धा प्राप्त होते परंतु तुपाचे फायदे अनेक सांगण्यात आलेले आहे तसेच आहारामध्ये तुपामध्ये सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व सुद्धा प्राप्त होत असतात. तुपाचे आपल्या शरीराला नेमके काय काय फायदे होतात? याबद्दल आज आपण महत्त्वाची माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

आपल्यापैकी अनेकांना तूप आवडत असते. परंतु काहीजण तूप मुद्दाम खात नाही कारण की त्यांना याबद्दल मनामध्ये चिंता सतावत असते की जर आपण तूप खाल्ले तर आपले वजन वाढेल. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होईल. जर तुम्ही सुद्धा तूप बद्दल असा विचार करत असाल तर आत्ताच थांबा.

हा अत्यंत चुकीचा विचार आहे. तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणताच विपरित परिणाम होत नाही. उलट तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप असे फायदे होतात. तूप आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि पोषक तत्वासाठी फायदेशीर ठरतात.

आपण जर पाहिले असेल की पूर्वीच्या काळी गावात राहणारे लोक आहारामध्ये जास्तीत जास्त तुपाचे सेवन प्रमाण वाढवत असे आणि यामुळे त्यांची शारीरिक स्थिती अत्यंत चांगली असायची. त्यांना कोणत्या प्रकारचा आजार नसायचा.

परंतु सध्या प्रत्येक जण धावपळीच्या जगामध्ये वावरत असताना अनेक जण स्वतःकडे दुर्लक्ष करत आहे आणि अनेकदा आपण बाहेरचे पदार्थ खान्यामध्येच व्यस्त असतो आणि घरच्या घरी बनवलेले पदार्थ आपण खात नाही. म्हणूनच कुठेतरी पोषक तत्वांची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासू लागते.

अनेक आहार शास्त्रामध्ये तुपाचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. परंतु आपल्यापैकी अनेक जण तुपाबद्दल अनेक गैरसमज सुद्धा मनामध्ये मिरवत असतात. तूप खाल्ल्याने आपल्या शरीराचे वजन वाढते. तूप खाल्ल्याने शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हे जरी काही प्रमाणात खरे असले तरी पूर्ण सत्य नाही.

जर आपण तुपाचे सेवन योग्य प्रमाणामध्ये, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी जर नाही केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच तुपाचा योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये वापर करणे गरजेचे आहे. कारण की जर कोणतीही गोष्ट आपण जर अधिक प्रमाणापेक्षा जास्त वापरली तर त्याचा विपरीत परिणाम तर आपल्याला भोगावाच लागतो. म्हणून तूप योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीमध्ये उपाय करणे गरजेचे आहे. तरच आपल्याला फायदा होतो. अन्यथा परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात.

तुपाचा योग्य वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर त्या सुद्धा नष्ट होऊन जातात. त्यामुळे आपले केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो निघून जातो. सडपातळ केस असतील तर ते मजबुत होतात. त्याचबरोबर आपल्या शरीराचे मधील हृदय सुद्धा मजबुतीने कार्य करू लागते.

हे सर्व फायदे आपल्याला तेव्हाच मिळतील जेव्हा आपल्या घरातील तुप शुद्ध असेल कारण की बाजारामध्ये अनेक तूप उपलब्ध असते त्यामध्ये अनेक रासायनिक पदार्थांचा सुद्धा समावेश असतो. जर तुपामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीराला भोगावा लागेल. म्हणून शक्यतो घरी बनवलेले तूपच आहारामध्ये समाविष्ट करा.

शुद्ध गाईचे तूप आपण जर सेवन केले तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट सुद्धा व्यवस्थित राहते व आपल्या पोटामध्ये जे काही काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते.

यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि परिणामी आपले पोटाची स्वच्छता सुद्धा होते. तसेच चरबीचे प्रमाण सुद्धा कमी राहते. तूप पचवण्यासाठी हलके असते आणि म्हणूनच तुपाचे सेवन केल्यानंतर लवकर पोट स्वच्छ होत असते. तसेच रक्त सुद्धा शुद्ध होते आणि हे रक्त आपल्या शरीराच्या इतर भागांपर्यंत सुद्धा पोहोचते. नियमितपणे तूप सेवन केल्याने आपल्या मेंदूवर व आपल्या डोळ्यांच्या नजरेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.

जे लोक आपल्या आहारामध्ये नियमितपणे तुपाचा समावेश करतात त्या लोकांची विचार करण्याची क्षमता व विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. अशा प्रकारचे लोकांची स्मरणशक्ती सुद्धा मजबूत राहते. तुपामध्ये अँटीबॅक्टरियल अँटीवायरल गुणधर्म उपलब्ध असतात. त्यांच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यासाठी मदत होते.

तूप सेवन केल्याने वातावरणातील बदलामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोणतेही आजार लवकर बरा होण्याची शक्ती आपल्या शरीराला प्राप्त होते.

बहुतेक वेळी आपल्या सांध्यांमध्ये एक वंगण उपलब्ध असते जर हे वंगण संपल्यावर आपल्या शरीरातून हाडांचा टक टक असा आवाज येतो. जर आपण नियमितपणे तूप सेवन केले तर शरीरातून येणारा हाडांचा आवाज पूर्णपणे बंद होतो व आपले हाडे मजबूत बनतात.

म्हणूनच अनेकदा सांधेदुखी, पाठदुखी, मणके दुखी यासारखे असंख्य समस्या उद्भवतात तेव्हा डॉक्टरांकडून तूप खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. कारण की तुपामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात. जे वेदनेवर रामबाण औषधी ठरतात.

जर तुम्हाला पोटा संदर्भातील काही समस्या असेल, पोट वेळेवर स्वच्छ होत नसेल, बद्धकोष्टता, पोटामध्ये नेहमी दुखत असेल तर अशा वेळी तुमच्या आहारामध्ये तुपाचा नेहमी समावेश करा कारण की तुपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचे प्रमाण असते आणि यामुळे आपले पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते. यामुळे आपली पचनसंस्था सुद्धा व्यवस्थित कार्य करू लागते.

तुपामुळे आपली त्वचा सुद्धा चमकते. कारण की तुपामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडते व आपली त्वचा पूर्वीपेक्षा जास्त चमकण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच अनेकदा चेहर्‍यावरच्या सुरकुत्या आल्या असेल तर त्या सुरकुत्या सुद्धा तुपाच्या वापरामुळे लवकर दूर होऊन जातात आणि आपला चेहरा अगदी चमकू लागतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *