मित्रांनो आजची औषधी वनस्पती आहे ती निसर्गाचा मानवाला मिळालेली एक अनमोल अशी भेट आहे. त्या वनस्पतीचे नाव आहे शेवगा. मराठीमध्ये त्याला शेवगा म्हणतात. इंग्रजी मध्ये त्याला ड्रमस्टिक हिंदीमध्ये त्याला मुंगा किंवा सहजनफली म्हटलं जातं. संस्कृत मध्ये दशमुल असे म्हटले जाते.
मित्रांनो शेवगा हा मानवजातीच्या इतिहासात सगळ्यात जास्त वापरली जाणारी ही वनस्पती आहे. याला जगात सुपरफुड या नावाने ओळखलं जातं त्याच्या मागं कारण पण तसेच आहेत कारण यात पोषक तत्व खनिज आणि व्हिटॅमिन्स एक उत्तम स्त्रोत आहे. हे मुलांना खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यामुळे मुलांचे हाडे मजबूत होतात दात मजबूत होतात. कारण याच्या मध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाण मध्ये असतं.
ज्यामुळे मुलं तंदुरुस्त राहतात कारण यामध्ये लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आहे ज्यामुळे मुले निरोगी राहतात. शेवग्याच्या पानांमध्ये फॉस्फरस जास्त असतं त्यामुळे शरीराची जास्तीची कॅलरी आहे ती कमी होते याच्यात विटामिन ए असतं जे आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी मदत करत असतं. शेंगांमध्ये विटामिन ए आणि लोह असतं ज्यामुळे आपलं रक्त साफ ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत नाहीत.
शेवग्यामध्ये आईसोथिओ साईनेट नावाचा एक घटक असतो जे आपलं पाचन तंत्र व्यवस्थित करण्यासाठी मदत करत असतो जर तुमचं डोकं दुखत असेल तर या पानांची भाजी करून जर तुम्ही खाल्ली तुमची डोकेदुखी तात्काळ बरी होते किंवा या पानांची पेस्ट तयार करून तव्यावर थोडस गरम करून घ्यायचं आणि थोडस थंड झाल्यानंतर ती पेस्ट तुमच्या डोक्यावर लावायची त्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.
मित्रांनो याच्यामध्ये विटामिन सी असतं ज्यामुळे सर्दी खोकल्यासारखे जे काही आजार आहेत ते होत नाहीत. कारण व्हिटॅमिन सी च आपल्या शरीरामध्ये सेवन केल्यानंतर जे साधे साधे आजार आहेत ते आपल्याला होत नाहीत म्हणून आपण या शेवग्याच्या भाजीचा सेवन अवश्य केले पाहिजे. याच्यामध्ये विटामिन ई पण असतं. व्हिटॅमिन ई केसांसाठी आवश्यक असतं. केसाच्या निरोगीपणासाठी केसाची मजबुतीसाठी केस गळती थांबवण्यासाठी विटामिन ई आवश्यक असतं. याच्यामध्ये विटामिन ई एक अँटिऑक्सिडंट आहे. जे डोक्याचा रक्तप्रवाह वाढून त्वचा निरोगी ठेवत. केसाच्या विकासासाठी फायदेशीर असतं.
विदेशामध्ये या शेवग्याच्या पानांची पावडर खूप महाग मिळते रक्तात जे घटक आवश्यक आहेत ते सर्व घटक शेवग्यामध्ये आहेत म्हणून ते महाग मिळतं. शरीरात ज्या गोष्टीची कमतरता आहे ती या सर्व गोष्टीची कमतरता भरून काढण्याचं काम हे शेवगा करत असतो. म्हणून शेवग्याच्या पानाची भाजी आपण आवश्यक खाल्ली पाहिजे.
मित्रांनो याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही पण आहेत.
ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांनी याचा सेवन करू नये कारण हे थोडे उष्ण असत. यात दुधाच्या तुलनेमध्ये चार पट पोटॅशियम, संत्रीच्या तुलनेत सातपट विटामिन असतं. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जात ते घड्याळाच्या दुरुस्तीसाठी वापरले जाते. याच्या अनेक पोषक तत्व असतात त्याच्या हिरव्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं.
याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात गुडघेदुखी असेल कंबर दुखी पाठ दुखी मान दुखी असेल याचा त्रास ज्या लोकांना आहे त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगा घरी आणायच्या त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याला मधून कापायचं. शेवग्याच्या अर्ध्या-अर्ध्या फोडी करून तव्यावर गरम करून घ्यायच्या आणि खायच्या. आणि खाल्ल्यानंतर गुडघेदुखीला मधून आराम देण्याचं काम या शेवग्याच्या शेंगा करत असतात.
या शेवग्याच्या सेवनाने म्हातारपण दूर होत म्हणजे डोळ्यांना पण चांगला दिसायला लागतो याच्यामुळे नजर तेज होते. कारण यामध्ये काय असतं विटामिन ए हा घटक असतो याचं सूप करून जर आपण केलं तर आपल्याला जे काही फोड येत असतील ते फोड पण येणार नाहीत कारण रक्त साफ करण्याचं काम करत असते मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण वनस्पती आहे.
मित्रांनो गर्भवती महिलांनी मात्र याच सेवन अजिबात करायचा नाही तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांनी पण याचं सेवन करायचं नाही. जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यानंतर छातीत जळजळ होऊ शकतो किंवा डायरिया पण होऊ शकतो त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन करणे करायचं नाही. पण याला घाबरायचं पण नाही कमी प्रमाणात सेवन केल्यास अजिबात त्रास होणार नाही मित्रांनो पण याचं सेवन मात्र अवश्य केले पाहिजे.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.