!जेवणा आधी एक चमचा सकाळी पोट फक्त दोन मिनिटात साफ होईल, पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल, पित्त गायब होईल! बहुपयोगी असा आयुर्वेदीक उपाय …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल अनेक प्रकारचे आजार डोके वर काढत आहेत. माणसांचे जीवन हे धकाधकीचे बनलेले आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यक्ती आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कामाचे टेन्शन तसेच व्यस्त जीवनशैली यामुळे अनेक व्यक्ती स्वतःला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. लोकांचे वजन खूपच वाढताना दिसत आहे. वाढत्या या वजनामुळे अनेक त्रास त्यांना सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे पित्ताचा त्रास हा आजकाल अनेक लोकांना सतावत आहे. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व औषध घेऊन देखील या समस्या दूर होत नाहीत.

मित्रांनो पोट साफ न होणे, जेवल्यानंतर पोट गच्च होणे, पित्त, ऍसिडिटी त्याचबरोबर पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, अपचन, अजीर्ण बद्धकोष्ठता होणे अशा अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या नेहमी होत असतात. आपल्याला होणाऱ्या एकूण आजारांपैकी जवळजवळ सत्तर टक्के आजार हे पोटाच्या व पचनाच्या समस्या निर्माण होत असतात.

मित्रांनो या सर्व समस्यांसाठी एक साधा सोपा घरगुती उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व पोटाच्या समस्यांपासून लगेच मुक्तता मिळेल. चला तर मग पाहुयात कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहेत. जे पदार्थ लागणार आहेत हे पदार्थ तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होणारे आहेत. ते पदार्थ म्हणजे खसखस, ओवा आणि सैंधव मीठ. हे सर्व पदार्थ घरोघरी असतात.

पहिला पदार्थ आहे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखशीत फायबर जास्त प्रमाणात असतात. फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते. फायबरमुळे अपचनाच्या तक्रारी जसे की बद्धकोष्ठता यासारखे त्रास होत नाहीत. प्राचीन काळापासून खसखस दुखण्यावर उपाय म्हणून वापरली जाते. पूर्वी रडणाऱ्या बाळांना थोडी खसखस मधातून देण्याची पद्धत होती. ज्यामुळे ती शांत होत असत. आता खसखस अशाप्रकारे वापरली जात नसली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. खसखशीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते. आपल्या हाडांमधील मुख्य घटक कॅल्शियम असल्याने हाडे बळकट होतात.

दुसरा पदार्थ आहे ओवा. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते.

तिसरा पदार्थ आहे का मीठ. काळ मीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.हे केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर औषध म्हणूनही कार्य करते. त्यात असणारे खनिज हाडे मजबूत करतात. याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजारांमध्येही आराम मिळतो. काळ मीठ बुद्धकोष्ठते आणि पोटफुगीपासून आराम देतं. जर आपल्याला अपचन,गॅस,ऍसिडिटी,बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.तर आपण काळ मीठ आवर्जून खावे.
या मिठातील घटकामुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो. तसेच ब्लडप्रेशर आहे तो नियंत्रणात राहते. जेवणावरील वासना उडाली असेल किंवा पित्त झालेल असेल ऍसिडिटीमुळे उलटी जळजळ डोके दुखत असेल तर या मिठाचा उपयोग होतो.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा तो. प्रथमतः मित्रांनो तवा गॅसवर तापत ठेवा. यामध्ये अर्धा चमचा खसखस आणि एक चमचा ओवा टाकून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर यात पाच ग्रॅम काळ्या मिठाचा खडा टाका आणि मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या.

मित्रांनो रात्रीच्या जेवणापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे आधी हा उपाय करायचा आहे. यासाठी एक ग्लास पाणी घ्यायचा आहे. पाणी साधंच वापरा. कोमट किंवा गरम करून वापरू नका. या एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा आपण तयार केलेले चूर्ण टाकायचे आहे. चमच्याने पाणी प्यायचे आहे.

मित्रांनो हा उपाय सलग दहा-बारा दिवस केला तर तुमच्या पचनसंस्थेच्या, पोटाच्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी पूर्णपणे दूर होतील. रात्री शांत झोप लागेल सकाळी उठल्याबरोबर एक मिनिटात पोट साफ होईल. कोणताही पदार्थ खाल्ला तर सहजपणे पचून जाईल. बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जाईल. पित्ताची गोळी खावी लागणार नाही. तर मित्रांनो तुम्ही हा उपाय नक्की करा. हा घरगुती सहज सोपा उपाय नक्की करून पहा याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *