काय तुम्ही पण कोमट पाणी पिताय मग पुन्हा पश्याताप करण्याधी एक वेळेस नक्कीच वाचा हा लेख महत्वपूर्ण माहिती …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रदुषण असल्यामुळे बहुतांश लोकांचं आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी समोर येताना दिसतात. म्हणूनच या आरोग्यांच्या तक्रारींपासून कायमचे दूर राहायचे असेल तर गरम पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. गरम पाणी पचनशक्ती सुधारून, बंद नाकाला पुन्हा सुरू करण्यापासून आजारपणात आपल्या शरीराला आराम देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये खूपच उपयुक्त ठरते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी आणि रात्री झोपतानाही गरम पाणी प्यावं असं ज्येष्ठ मंडळी सांगतात.

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि कफ-सर्दीसारखे आजार लवकर दूर होतात. तसेच जर तुम्ही योग्य पद्धतीने गरम पाणी प्यायलात तर अनेक रोगांवर असलेल्या घरगुती उपायांपैकी तो एक रामबाण उपाय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे आणि त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीने कोमट पाणी पिल्यामुळे त्याला फायदे होतात आणि कोणत्या व्यक्तीने कोमट पाणी थोड्या किंवा कमी प्रमाणात प्यायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गरम पाणी पिताना त्यातून जी वाफ मिळते त्यामुळे चोंडलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते. पाणी पिताना ग्लास अशा पद्दतीने पकडा की, त्या पाण्याची वाफ आपल्या घशाच जाईल. गरम पाण्याची वाफ श्वासावाटे घशात गेल्याने सायनस आणि सायनस आजारामुळे होणारी डोकेदुखी थांबवते. तसेच ते गरम पाणी घशातून जाताना घशात होणारी खवखव किंवा सर्दीमुळे झालेली जखम बरी करते. तुम्ही गरम पाण्यात विक्स टाकून त्याचा वाफारा घेतल्यानेही तुम्हाला आराम पडू शकतो. तर या सर्दी-पडसे, खोकला, सायनस या आजारांपासून वाचण्यासाठी कायम गरम पाणी पिणे.

जर तुम्ही थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्यास सुरूवात केली तर आतड्यांना आक्रसण्यात मदत होते. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा माणसाच्या शरीरातील आतड्यांमध्ये फसलेल्या गोष्टी पूर्णपणे शरीराबाहेर फेकल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही दररोज सकाळी न चुकता पाणी पिणं कधीही चांगलं ठरू शकतं. तसंच चहा आणि कॉफीमध्ये असणा-या कॉफीनमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणूनच कॉफीनयुक्त पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा गरम पाणी प्यावे.

जेव्हा तुम्ही सात ते आठ तास झोपून उठता तेव्ही सर्वप्रथम तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते. लिंबूमध्ये विटामिन ‘सी’ असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सकाळी सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध टाकून प्यायल्यास वजन नियंत्रणात आणण्यास किंवा कमी करण्यात मदत होते. तसेच गरम पाण्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे गरम पाणी पिणारी लोकांमध्ये तणावाचे प्रमाण कमी असते आणि मन शांत असते.

मित्रांनो या गरम पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून आपले पोट साफ होते आणि आपले स्वास्थ सर्वोत्तम राहण्यास मदत होते. म्हणूनच रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर गरम पाणी प्यायल्याने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. शिवाय कोरड्या त्वचेची समस्याही उद्भवत नाही. रक्ताभिसरण प्रक्रिया सुरुळीत सुरू राहते. रक्त प्रवाहामध्ये सुधारणा झाल्यास आपल्या चेहऱ्याचा रंग उजळतो. मुरुमांचीही समस्या कमी होते.

परंतु मित्रांनो सकाळच्या वेळी गरम पाणी पीत असताना आपल्याला ते पाणी अगदी कडक गरम करून त्याचे सेवन करायचे नाही, फक्त ते भांड्यातील पाणी कोमट होईपर्यंत त्याला गरम करायचे आणि त्यानंतर लगेचच ते भांडे गॅसवरून खाली उतरवून त्या पाण्याचे सेवन आपल्याला करायचे आहे. जास्त गरम पाणी पिल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि ज्यांचे बायपास झालेले आहे अशा व्यक्तींनी गरम पाण्याचे अति प्रमाणात सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी फक्त दोन वेळेस ही अशा व्यक्तींनी हे कोमट पाणी प्यायचं आहे बाकी इतरत्र सर्वांनी याचा नियमितपणे वापर केला तरीही चालेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *