रात्री उठून पाणी पिताय, लघवीला जाताय? तर पुन्हा पश्चाताप करण्याआधी एक वेळा अवश्य या चुका टाळा नाहीतर मरण नक्की ….??

आरोग्य टिप्स

मित्रांनो, मानवी शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी कधी व किती प्यावे यावर 80 टक्के आजार अवलंबून असतात. रात्री झोपेतून उठून काही लोकांना पाणी पिण्याची सवय असते परंतु हे पाणी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पीत असाल तर याचा तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतो. शिवाय बऱ्याच जणांना रात्री लघवीला जाण्याची सवय असते. याचा देखील आपल्या शरीरावरती फार घातक परिणाम होऊ शकतो. झोपेतून उठल्यानंतर कशा पद्धतीने पाणी प्यावे व लघवीला जाताना काय काळजी घ्यावी ती आज आपण पाहणार आहोत.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री झोपेमध्ये पाणी पिण्याची सवय असते म्हणजेच त्यांना तहान लागत असल्यामुळे ते आपल्या उषाजवळ पाणी घेऊन झोपतात आणि हे पाणी ते पीत असतात. तर बरेच जण हे अर्ध्या झोपेतच तसेच पाणी पीत असतात आणि झोपतात. परंतु हे एकदम चुकीचे आहे.

मित्रांनो जर तुम्हाला संध्याकाळी तहान लागली असेल तर तुम्ही उठून तीन चार मिनिटे बसायचे आहे. आपण झोपेतून पूर्णपणे जागे झाले आहोत याची खात्री झाल्यानंतर आपण पाणी प्यायचे आहे. पाणी पिल्यानंतर लगेचच झोपायचे नाही. तर तीन चार मिनिटे आपल्याला तसेच बसून राहायचे आहे आणि नंतर झोपायचे आहे.

जे आपण रात्री पाणी पितो हे शक्यतो करून अजिबात थंड नसावे म्हणजे ते पाणी कोमट असावे किंवा नॉर्मल असले पाहिजे. कारण जर तुम्ही रात्री थंड पाणी पिले तर याचा शरीरावर घातक परिणाम होतो. म्हणजेच आपल्याला ऍसिडिटी तसेच कोलेस्ट्रॉल याचा त्रास होऊ शकतो.

तसेच वातसंबंधी देखील आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कधीही तुम्ही नॉर्मल किंवा कोमट पाणी पिल्याने तुम्हाला यापैकी कोणता त्रास होणार नाही. तसेच दातासंबंधित देखील कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे संध्याकाळी लघवीला जाण्याची सवय असते. मित्रांनो संध्याकाळी ज्या वेळेस आपण झोपतो त्यावेळेस मेंदूकडे रक्तपुरवठा हा संथगतीने चालू असतो. त्यावेळी मनुष्याचे मन आणि बुद्धी शांत झालेली असते. तुम्ही जर अशावेळी पटकन उठून उभे राहिलात तर रक्तपुरवठा खंडित होतो. मेंदूकडे रक्तपुरवठा न झाल्यास ब्रेन स्ट्रोक येण्याची संभावना असते. शिवाय मेंदूकडे रक्तपुरवठा न झाल्यास हृदय सुद्धा बंद पडू शकते.

या कारणांमुळे अनेक लोकांचे मृत्यू देखील झाले आहेत. जर झोपेतून उठून लघवीला जायचे असेल तर आधी नीट जागे होऊन उठून बसायचे आहे आणि आपण आपल्या हातापायांवर चोळायचे आहे. जेणेकरून रक्तपुरवठा सुरळीत चालू राहील आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कानांच्या पाठीमागे बोटांच्या सहाय्याने चोळत राहायचे आहे जेणेकरून तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा हा सुरळीतपणे चालू राहील थोडा वेळ झाल्यानंतर मग आपण लघवीला जाऊ शकतो.

तर मित्रांनो यामुळे आपल्या शरीराला कोणताच मग घातक परिणाम होणार नाही. वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील रात्री झोपेत पाणी पिण्याची सवय असेल तसेच रात्री लघवीला तुम्ही जात असाल तर वरील गोष्टी व्यवस्थितरीत्या पाळून तुम्ही पाणी प्यायचे आहे. तसेच लघवीला जायचे आहे. यामुळे मग तुमच्या शरीराला कोणताच घातक परिणाम होणार नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *