सकाळी व सायंकाळी 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी घरी येण्याची वेळ नक्की करा या 7 गोष्टी, लक्ष्मी माता होईल प्रसन्न …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटते की आपल्या सर्व धना संबंधीच्या अडचणी दूर व्हाव्यात. आपल्याला जे काही आर्थिक संकट आलेले आहेत ते दूर व्हावे. आपल्या घरात होत असलेले वाद विवाद दूर व्हावेत. घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. घरातील रोगराई निघून जावे. असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. यावर उपाय म्हणून आपण लक्ष्मी ची आराधना करत असतो.

 

ज्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊन लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरातील सर्व अडचणी बाधा दूर होऊन घरात लक्ष्मी टिकून राहील व आपल्या घरात तिचे अखंड वास्तव्य राहिल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहील. म्हणूनच आज आपण काही सायंकाळी वेळेस करायचे नियम जाणून घेणार आहोत की ज्यामुळे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात टिकून राहील.

 

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मा नुसार व शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की सायंकाळच्या वेळेस लक्ष्मीचे आगमन आपला घरात होत असते. यावेळेस आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात व कोणकोणत्या गोष्टी करू नयेत? याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडून चुका होऊन आपल्या घरातून लक्ष्मी निघून जात असते व आपण करत असलेला कामांमध्ये आपल्याला यश येत नाही.

 

घरात धन धान्यांचे बरकत होत नाही. घरात सतत वादविवाद भांडण तंटे होत राहतात. यामुळे घरातील लक्ष्मी तर घरात टिकून राहत नाहीत. त्याबरोबर घरामध्ये आर्थिक टंचाई खूप प्रमाणात तयार होते. यावरच उपाय म्हणून आपण सायंकाळच्या वेळेस कोणत्या गोष्टी करू नयेत व कोणत्या गोष्टी कराव्यात? याची माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीच्या वास्तू राहील व आपल्या सर्व समस्या दूर होतील.

 

सकाळी व संध्याकाळी साडेसहा ते साडे सातच्या दरम्यान लक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत असते. अशावेळी तुम्हाला तुमच्या घराच दार उघड ठेवायला आहे. आपल्या मुख्य दरवाजावर गणपती असेल किंवा आणि अंगणात तुळस असेल यांची पूजा करावी. त्यांना उदबत्ती ओवाळावे. आपण ज्या ठिकाणी काम करत असतो म्हणजे तुमचे एखाद्या ऑफिस असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल.

 

त्या ठिकाणी तुम्ही ज्या देवीची स्थापना केली असेल अशा देवांची पूजा करावी. दिवा लावावा, उदबत्ती लावावी. त्यांना नैवेद्य दाखवा व आपल्याकडे जो कोणी व्यक्ती त्या वेळी येईल त्यांना तो थोडा थोडा करून वाटावा. अशा या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. या एका तासाच्या वेळेमध्ये आपण कोणत्याही गोष्टी किंवा पदार्थ ग्रहण करू नये. कारण देव पूजेच्या आधी आपण कोणत्याही वस्तू किंवा पदार्थ ग्रहण करायचा नसतो.

 

सकाळी आणि सायंकाळी या एका तासाच्या वेळेमध्ये पैशाची देव घेऊन चुकूनही करू नये. कुणालाही मीठ व तेल या वस्तू देऊ नयेत. आपल्याला जितके शक्य होईल तितके मौन पाळावे. कमी बोलावे, वादविवाद टाळा. विशेष करून कोणत्याही स्त्री सोबत आपण भांडू नये. त्यांच्यासोबत वाद विवाद घालू नये. कारण स्त्री ही प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे एक रूप मानले जाते. या वेळेमध्ये आपण आपली नखे काढू नयेत.

 

केस विचरू नयेत. भांडी घासू नये व धुणे देखील धुवू नये. महत्त्वाची बोलणी या वेळेमध्ये टाळावेत. केस कापू नये. या वेळेमध्ये जर पैसे देण्याची खूपच गरज पडली तर हे पैसे देताना आपल्या हाताची कात्री करू नये. या एका तासाच्या कालावधीमध्ये आपण देवाचे नामस्मरण करावे. आपण ज्या देवांना मानतो ज्या देवावर आपले भक्ती आहेत अशा देवांची मंत्रजाप करावा, श्लोक म्हणावे. देवपूजा झाल्यानंतर आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावावा. आपण ज्यावेळी घरातून कामासाठी बाहेर पडतो त्यावेळी जे काही आपण देवाला फुले अर्पित केलेले आहेत त्यातील एक फुल आपल्याजवळ ठेवावे व मगच घरातून बाहेर पडावे.

 

हे नियम जर आपण दररोज पाळले तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मी माताची कृपा होईल. आपल्या सर्व धनासंबंधीच्या अडचणी दूर होते. या साडेसहा ते साडेसात सकाळी व संध्याकाळी या एका तासाच्या कालावधीमध्ये जी व्यक्ती झोपते अशा व्यक्तींना पुढील सात जन्म हा रोगी म्हणून मिळतो. त्याचबरोबर ती व्यक्ती दारिद्र्य अवस्था होते व ती दरिद्री होते. याबरोबरच आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत जे गोष्टी आपण करू नये.

 

त्या म्हणजे कोणाचाही घरातून जाताना किंवा कुठेही जाताना जातो असे म्हणू नये. घराच्या उंबरठ्यावर शिनकू नये. नखे दातांनी कुरतडू नये. असे केल्याने लक्ष्मी निघून जाते. शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये गोडे तेल आणू नये. मात्र जर आपण शनि देवांना अर्पण करण्यासाठी हे तर आणणार असो तर ते आणले तर चालू शकते. शनिवारच्या दिवशी केस, दाढी करू नये. सोमवारच्या दिवशी लोणी कडवू नये. गणपतीला तुळस कधीही वाहू नये. मात्र गणेश चतुर्थीला तुळस गणपतीला अर्पण करावे. अशाप्रकारे हे काही नियम आहेत. ते आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

 

तुम्ही देखील या नियमांचे पालन नक्की करा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील व धनाची बरकत होईल. घरातील सर्व अडचणी निघून जातात व घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *