मित्रांनो तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्व वर्क आहे हे आपण जाणतोच. इतकच नाही तर तांब्याची भांडी आपण प्रामुख्याने देवपूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमासाठी आपण वापरत असतो. तर बऱ्याच मंडळींच्या घरी अजूनही पाणी पिण्यासाठी असणारा पाण्याचा पीक हा देखील ताब्याचाच असतो. आणि पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारी घागर, कळशी ही देखील तांब्याचीच असते.
घरी आपल्या ताब्याच्या वस्तूंना इतर धातूंच्या तुलनेत मोठे स्थान असते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी तांब्याच्या वस्तू ह्या असतातच. मात्र मंडळींनो या वस्तू जेव्हा जुन्या होतात तेव्हा त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची कलई चढते आणि या वस्तू खूप जुनाट आणि खराब दिसू लागतात. पितांबरी सारख्या किती जरी वस्तूचा वापर केला किती तरी घासले तरी या वस्तू कलई चढल्यामुळे जशाच्या तशा जुन्याच दिसतात.
मग या तांब्याच्या वस्तू स्वच्छ कशा धुवायच्या त्यांना कसं चमकवायचं हा मोठा प्रश्न महिला वर्गासमोर निर्माण होतो. आणि याच विषयावर आपण आज या विशेष लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या काही जुन्या तांब्याच्या वस्तू असतील, तांब्याच्या वापरातील वस्तू असतील. त्या आता खूप दिवस झाल्याने अत्यंत जुन्या दिसत असतील. या वस्तू या घरगुती उपायाने तुम्ही स्वच्छ करून चमकु शकता.
साहित्य :
यासाठी आपणाला दोन वाटी पाणी, दोन चमचे मीठ, दोन वाटी व्हेनिगर, एक लिंबू इत्यादी घरगुती साहित्य लागणार आहे. आता आपण पाहू याबद्दलची कृती.
कृती:
मित्रांनो मित्रांनो यासाठी सुरुवातीला आपली जी काही तांब्याची वस्तू आहे ती घेऊन बाजूला ठेवावी. दुसरे एका कोणत्याही भांड्यामध्ये दोन वाटी पाणी, दोन चमचे मीठ, दोन वाटी व्हेनिगर, एका लिंबूचा रस हे सर्व घेऊन ते एकत्र मिसळून घ्यावे. आणि या सर्व वस्तू मिसळल्यानंतर जे पाणी तयार होईल त्या पाण्यात आपले तांब्याचे भांडे बुडवावे.
यानंतर तांब्याच्या भांड्यावर हाताने हात फिरवावा व जे काही डाग निघतील ते निघतील. आणि त्या पाण्यात पुन्हा तांब्याची आपली वस्तू बुडवावी आणि जे काही आपणाला हे सर्व घाण पाणी दिसेल ते सर्व पाणी आपल्या तांब्याच्या वस्तू मध्ये भरून ठेवावे. कारण या वस्तूला आपण बाहेरून हात फिरवला मात्र आज आपणाला हात फिरवता येत नाही. अशावेळी हे पाणी आज ओतून ठेवल्याने आतील कलई ही देखील साफ होईल.
आणि तीन ते चार तासानंतर त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेली पाणी ओतून द्यावे आणि यासाठी जो लिंबू चिरला होता त्याचा रस आपण काढला होता. त्या लिंबूच्या सालीने हे सर्व भांडे घासून घ्यावे. यानंतर स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी भांड्याचा साबणाचा वापर केला तरी चालेल. आणि ज्यावेळी तुम्ही स्वच्छ पाण्याने ही आपली तांब्याची वस्तू धुवाल ती अगदी सोन्यासारखी चमकेल.
हा अतिशय साधा सोपा व घरगुती विना खर्चिक उपाय आपणाला आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच प्रकारच्या माहिती देणारे विविध आम्ही येथे आमच्या पेजवर प्रसिद्ध करू. अशाच प्रकारच्या विविध माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.