आंबा घाटात एसटी ड्रायव्हर शंकर भोईर दादांना आलेला हा स्वामींचा अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो . स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही काही अनुभव ऐकला तिला वाचला असशील किंवा कुठेतरी बघितला देखील असाच आज आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजचा जो अनुभव आहे तो अत्यंत थरारक अशा पद्धतीचा आहे ड्रायव्हर दादांना आलेला हा अनुभव आहे चला तर मग आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया शंकर भोईर अस दादांच नाव आहे.

 

नमस्कार मी स्वामी सेवेमध्ये भरपूर वर्षापासून आहे अगदी कोणतेही काम करायचं म्हटलं तर मी स्वामींच्या आशीर्वादशिवाय करत नाहीत घराचे बाहेर जरी पडायचं असेल तर मग मी स्वामींना मुजरा केल्याशिवाय पडत नाही माझं कोणत्याही लहान मोठं काम असू दे मी प्रत्येक काम मी स्वामींच्या आशीर्वादशिवाय कधीच करत नाही अगदी लहानपणापासूनच मी स्वामींचा सेवेकरी आहे मी एक एसटी ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हींग करताना देखील मी स्वामींचे नामस्मरणच करत असतो आणि नंतरच मी गाडी चालवायला देखील घेत असतो आणि स्वामींच्या कृपेने वीस वर्षे झाले मी ड्रायव्हरचं काम करतो आणि ड्रायव्हिंग करताना माझ्याकडून कधीही कोणाचा अपघात झाला नाही किंवा माझ्यामुळे कोणाला साधं लागलं देखील नाही .

 

माझ्या आयुष्यामध्ये ती प्रसंग असा घडला की आजही मला माझ्या हातांचा थरकाप होतो आणि त्या घटना मुळे माझ्या डोळ्यात आजही अश्रू येतात एकही दिवस जात नाही की तो प्रसंग मला आठवत नाही.एप्रिल मे चा महिना चालू होता आणि त्यावेळेस कोल्हापूर आगारातून मी 40 प्रवाशांना घेऊन रत्नागिरीला चाललो होतो रत्नागिरीला जाण्यासाठी आपल्याला आंबा घाट लागतो आणि आंबा घाटामध्ये हा प्रसंग घडला होता तेव्हा प्रत्यक्ष स्वामींनी मला दर्शन दिलं होतं ते कशा पद्धतीने दिले आता मी ते सांगणार आहे .

 

त्या दिवशी मी चाळीस प्रवाशांना घेऊन चाललो होतो आणि ज्या वेळेस मी आंबा घाटामध्ये गेलो त्यावेळी अचानक काय झालं माहित नाही पण बसचे अचानक ब्रेक फेल झाले आणि हे माझ्या लक्षात येताच मी खूप घाबरून गेलो होतो कारण मी तेव्हा घाटामध्ये होतो दरी होती आणि गाडी गेली असती तर सर्वजण आम्ही घाटामध्ये गेलो असतो दुसरीकडे गाडी वळवायला कुठेही जागा नव्हते आणि डोळ्यासमोर असं वाटलं की सगळं संपून गेलं एक वेळेस माझं जाऊ द्या पण जी माझे 40 प्रवासी आहेत त्यांचं काय माझ्यामुळे त्यांनाही त्यांचे प्राण गमवावे लागणार असं मला वाटत होतं.

 

काय करावे काय मला सूचना झालेलं गाडीचा कंट्रोल माझ्या हातातून निसटून गेल मला काहीही करता येत नव्हतं अशातच एकच शक्ती माझ्यासोबत होती ती म्हणजे आपले स्वामी महाराज जोर जोरात मी स्वामींचा जप करायला सुरू केलं गाडी कसतरी कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न केला पण तो शेवटचा टप्पा मारताना माझ्या हातात काही राहिलं नव्हतं अगदी फक्त डोळे बंद करून दरीमध्ये बस जाणार हे आपल्या डोळ्यांनी बघायचे एवढेच माझ्या डोळ्यासमोर दिसत होत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप मी करत होतो.

 

तोपर्यंत प्रवाशांना कानो कान खबर गेली नव्हती असं काही घडत आहे त्यांना जर समजलं तर एकच गर्दी होईल आणि जी काही परिस्थिती आहे ती अजून बिकट होऊन जाईल म्हणून त्यांना काहीही कळू दिलं नव्हतं अशातच मी स्वामींचा जप करतच होतो आणि जप चालू असतानाच मला एका दिशेने एक व्यक्ती उभी दिसली आणि ती व्यक्ती उभी होती आणि एका दिशेने हात करत होते आणि त्या क्षणाला मला असं वाटलं की ती व्यक्ती मला काहीतरी सांगत आहे मला काहीतरी खुणावत आहे आणि क्षणाचाही विचार न करता ती ज्या दिशेने हात करत आहे त्या दिशेने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला.

 

त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मी गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो कारण असं तर प्रान गमवायला लागणार होते परंतु एकदा करून बघूया त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ती व्यक्ती आपल्याला खुणावत आहे तर ते एकदा करून बघूया असं माझ्या मनात विचार आला आणि गाडी मी त्या बाजूने घेतले आणि झाले अस की त्या जागी सपाट जमीन होती आणि गाडी एकदम सुरक्षित मी त्या ठिकाणी नेऊन पोचवलं होतं क्षणभरामध्ये मला तेव्हा असे वाटले नाही की खरच आपण जिवंत आहोत गाडी सुखरूप आहे आपण सगळे सुखरूप आहेत 40 प्रवासही सुखरूप आहेत या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता.

 

आणि त्यावेळेस घडलेला हा सर्व प्रसंग प्रवाशांच्या लक्षात आला होता आणि हा सर्व प्रसंग बघताच आज कोणी रडत होतो कोणी किंचाळत होतं कोणी माझ्यावर ही ओरडत होतं सर्व काही चालू असताना त्यावरच मी त्यांना शांत केलं आणि मी त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली कारण ज्या व्यक्तींनी मला हात केला होता ती मुळे मी आज येथे आहोत हे माझ्या लक्षात आलं होतं आणि तिथल्या प्रवाशांना मी ही गोष्ट सांगितली आणि तेही त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली .

 

पण खरंच त्या व्यक्तीचा भरपूर शोध घेतल्यानंतर देखील ती व्यक्ती आम्हाला दिसली नाही दुसर कोणती व्यक्ती असते तर साहजिकच ती आम्हाला रस्ता दाखवली होती म्हणून काळजीपोटी आमच्याजवळ येऊन विचारपूस केली असते परंतु त्या ठिकाणी तसेही झाले नाही ती व्यक्ती आमच्या जवळ आली नाही.

 

माझ्या लक्षात आले की मला या सर्व संकटातूनच माझ्या स्वामींनी बाहेर काढला आहे अडचण कोणत्याही प्रकारच्या असू दे फक्त आपण स्वामींचा नाम जप करायला कधीही विसरायचे नाही जर आपला तोंडामध्ये स्वामींचे नाव असेल तर आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमी भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *