मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रथा, परंपरा चालत आलेले आहेत. या प्रथा परंपरांचे बरेच लोक हे पालन देखील करतात. परंतु बरेचजण याकडे दुर्लक्ष देखील करीत राहतात. मित्रांनो स्त्रियांना मासिक पाळी ही येत असते. या वेळेस अनेक गोष्टी पाळणे गरजेचे असते. परंतु आजकाल बरेच जण याकडे दुर्लक्ष देखील करीत असतात. तर मासिक पाळी आल्यानंतर स्त्रियांनी देवाची पूजा करावी का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो.
तर स्त्रियांनी मासिक पाळी आल्यानंतर देवाची पूजा अजिबात करू नये. बऱ्याच आपल्यापैकी महिला या स्वामींच्या मठांमध्ये केंद्रामध्ये जाणे टाळतात. आपल्या सर्वांना परमेश्वराने बनवलेले आहे. मासिक पाळी म्हणजेच स्त्रियांच्या लैंगिक भागातून पाच दिवस रक्तस्त्राव होत असतो. यालाच अशुद्ध पाणी देखील मानले गेलेले आहे. तरी या मासिक पाळी मध्ये स्त्रियांनी पूजा करू नये.
मासिक पाळी ही पाच दिवस चालत असते. या मासिक पाळीमध्ये त्या स्त्रियांनी देवघराच्या आसपास असणे देखील चुकीचे असते. परंतु कुटुंबीयांतील लोक त्या स्त्रियांच्या सानिध्यामध्ये येतच असतात. त्यामुळे घरातील जे काही लोक आहेत त्यांनी कधीही आपली जी देवपूजा आहे ती सकाळीच करायची आहे.
तसेच मासिक पाळी आलेल्या स्त्रीने जपमाळ,गुरू चरित्र मासिक चरित्र या गोष्टींना अजिबात स्पर्श करू नये. या तुमच्या ज्या काही नित्य नियमाच्या गोष्टी असतात यांना अजिबात त्या स्त्रीचा स्पर्श होता कामा नये. अशा स्त्रियांनी आपली जी काही नित्यसेवा असते ति न करता तुम्ही नामस्मरण अवश्य करू शकता. ही एक प्रकारची पूजाच मानली गेलेली आहे.
तसेच तुम्ही जर नित्यनेमाने स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर मासिक पाळी आलेल्या स्त्रीने तो नैवेद्य बनवता कामा नये. तसेच आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया या तिसऱ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून देवघरांमध्ये प्रवेश करतात. परंतु हे खूपच चुकीचे आहे.
तर मासिक पाळी झालेल्या स्त्रियांनी पाचव्या दिवशी आपल्या डोक्यावरून अंघोळ करून नंतर आपल्या देवघरांमध्ये जाऊन देवतांना आंघोळ घालायची आहे आणि आपली नित्यसेवा चालू करायची आहे. म्हणजेच मासिक पाळी झालेल्या स्त्रियांनी त्या काळामध्ये देवघराच्या आसपास किंवा देवघरातील कोणत्याही वस्तूंना स्पर्श होणार नाही याची दक्षता अवश्य घ्यावी.
तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असाल तर मासिक पाळी झालेल्या स्त्रियांनी त्या पाच दिवसांमध्ये ती सेवा अजिबात करायची नाही. स्वामींचे फक्त नामस्मरण करायचे आहे म्हणजेच मासिक पाळी झालेल्या स्त्रियांनी पाच दिवस देवपूजा करायची नाही. फक्त तुम्ही जर नामस्मरण केले तर ती एक प्रकारची देवपूजा केल्यासारखेच आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.