दात, या दाढ, काढण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय दाढेतील किड दहा सेकंदात बाहेर फेका, कसलीही दात दुखी कायमची मुळापासून बंद ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येकाची विशेष अशी काळजी घेणे गरजेचे आहे. कोणता आहार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. दात हा आपल्या शरीरामधील एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु आजकाल बऱ्याच जणांचे दात किडलेले आपल्याला पाहायला मिळतात. जरासेही आपण गोड खाल्ले की आपल्या दाताला झणझणीत मारल्यासारखे होते. बऱ्याच जणांना दात कीडल्यामुळे दात काढण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. तसेच रूट कॅनलचा देखील सल्ला देत असतात.

परंतु मित्रांनो असे काही आपण घरगुती उपाय जर केले तर यामुळे आपल्या दातातील कीड सेकंदामध्ये गायब होऊ शकते. दात दुखी आपली लगेच बंद होऊन दात काढण्याची देखील आपल्याला गरज भासत नाही.

मित्रांनो, आपण दात व्यवस्थित न घासल्यामुळे आणि जेवणानंतर चूळ न भरल्यामुळे, ते अन्नाचे कण दातामध्ये अडकल्यामुळे आपल्याला दाताचे आजार होतात. म्हणजेच दात किडणे किंवा तरुण वयातच दात पडणे किंवा दात दुखणे यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

तर मित्रांनो आज आपण जो घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे दातातील कीड नक्कीच दूर होईल. अगदी कमी खर्चिक असा हा घरगुती उपाय आहे. चला तर मग या उपायासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि तो नेमका कसा करायचा आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला वावडिंग लागणार आहे.

तर मित्रांनो बऱ्याच मुलांना पोटामध्ये जंत तसेच किडे होतात तर अशा वेळेस तुम्ही मुलांना या वावडिंगच्या बियांची पावडर बनवून अर्धा चमचा पावडर देऊन त्यावरती कोमट पाणी प्यायला दिल्यानंतर मुलांचा जे काही पोटामध्ये जंत झालेली असतात ते नक्कीच बाहेर पडतात.

तसेच अनेक लोकांचे जर पोट मोठे असेल तर अशा लोकांनी देखील वावडिंगची पावडर बनवून एक अर्धा चमचा घेऊन त्यावरती कोमट पाणी पिले तर हा त्रास त्यांचा कमी होतो.

मित्रांनो जर तुमचा दात दुखत असेल तर तुम्ही एखादी लवंग घेऊन त्या दुखणाऱ्या दातांमध्ये धरायची आहे. पाच मिनिटे धरल्यानंतर तुम्हाला दात दुखण्याचा त्रास नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो आपली दातांची कीड आहे ती घालवण्यासाठी आपणाला वावडिंग एक चमचा घ्यायचा आहे आणि थोडेसे ताक घेऊन त्यामध्ये आपल्याला हे वावडिंग भिजत घालायचे आहे.

पाच मिनिटे आपणाला ते वावडिंग तसेच भिजत ठेवायचे आहे. नंतर आपणाला हे वावडिंग त्या ताकामधून काढून घ्यायचे आहेत आणि आपणाला हे वावडिंग वाळवायचे आहेत. हे वावडिंग जे वाळलेले आहेत याचाच वापर आपणाला करायचा आहे.

तर मित्रांनो एक जाळीदार कापड घेऊन त्या वावडीच्या बिया त्यामध्ये घालायच्या आणि त्याची पुरचुंडी आपणाला बनवायचे आहे आणि ही पुरचुंडी आपण दातामध्ये जिथे कीड लागलेली आहे तिथे धरायची आहे.

आपणाला ही पुरचुंडी अर्धा तास त्या दात किडलेल्या जागेवरती तशीच ठेवायची आहे. म्हणजेच दाबून धरायची आहे. नंतर जी काही लाळ असते ही लाळ तुम्ही न गिळता थुंकायची आहे. अर्धा तास ही पुरचुंडी आपल्या कीड लागलेल्या दातांमध्ये धरल्यानंतर जी कीड आहे ती जाळीदार त्या कापडाला लागलेली नक्कीच तुम्हाला दिसेल.

यामुळे तुमची जी काही दात दुखण्याची समस्या आहे तसेच कीड लागल्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतो तो त्रास देखील नक्कीच कमी होणार आहे. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *