मरून जा पण या पाच लोकांबरोबर कधीही कोणतेही नाते ठेवू नका…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीही काही अशा असतात की जे आपले चांगले झालेले त्यांना बघवत नसते. कशा काही पाच व्यक्तींबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही ज्यांची संगत आपण कधीही करू नये. त्यांच्याबरोबरचे कोणतेही नाते आपण ठेवू नये. या व्यक्ती कोणत्या? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .

 

त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे फक्त कामापुरता आपला विचार करणारी व्यक्ती. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना फक्त त्यांचे काम आपल्याकडून साधून घ्यायचे असते. गोड गोड बोलून ते आपल्याकडून त्यांचे काम करून घेतात व काम झाले की आपल्याला ते विचारात देखील घेत नाही. या उलट जर आपल्याला त्यांची गरज असेल तर त्यावेळी ते सरळ सरळ नकार देतात.

 

अशा व्यक्तींना आपल्यापासून दूर ठेवणे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. कारण ती व्यक्ती आपल्या कधी उपयोगी येत नसते. मात्र ती व्यक्ती आपल्याकडून सर्व कामे करून घेत असतात. जर अशी व्यक्ती आपला कामेच येणार नसेल तर त्या व्यक्तीला आपण कधीही आपला जवळ करू नये. व तिला देखील आपण नकार द्यायला शिकावे.

 

दुसरी व्यक्ती म्हणजे जाणून बुजुन तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती. आपल्याला पाहण्यात असलेली एखादी अशी व्यक्ती ही असते जी आपल्याला जाणून बोजून इग्नोर करत असते. ती आपल्याकडे लक्ष देत नाही. परंतु आपण त्यांच्यासाठी खूप काही करत असतो. एखाद्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती असते की जी त्या व्यक्तीला इग्नोर करत असते.

 

म्हणजेच त्या व्यक्तीचा असण्याचा खूप त्रास होतो. म्हणून त्या व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा त्या व्यक्तीपासून दूर राहायला शिका. जेणेकरून त्या व्यक्तीला आपली किंमत कळेल. अशा व्यक्तींच्या मागे जर आपण लागत राहिलो तर तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमवू शकता. अशा व्यक्तींच्या मागे लागून तर रिस्पेक्ट गमवू नये. जर आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट गमावली तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर काहीही एक होत नाही तो आपल्यालाच भूगावा लागतो.

 

तिसऱ्या व्यक्ती म्हणजे वाईट सवयी लावणाऱ्या व्यक्ती. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की वाईट सवयी असणाऱ्या व्यक्तींपासून आपण दूर राहिले पाहिजे. कारण त्यांच्या सवयी आपला लवकरात लवकर रुजू होतात. म्हणून अशा लोक पासून आपण दूर राहत असतो. आपल्या आई वडील देखील आपल्याला आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी पाहत असतात. की जेणेकरून आपल्या मुलाला त्या सवयी लागू नयेत.

 

कारण चांगल्या सवयी या लवकरात लवकर लागत नाही जर आपल्या संकेत वाईट संस्थेची व्यक्ती असेल तर तिच्या वाईट सगळी आपल्याला लवकरात लवकर लागतात. जर आपण कशा वाईट सवयी लावणाऱ्या व्यक्तींनी सोबत राहत असतो तर कितीही नाही म्हटले तरी त्या सवयी लागते आणि ती सोडवणे खूप कठीण होऊन जाते. म्हणून अशा व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे.

 

चौथी व्यक्ती म्हणजे स्वतःच्या बढाई मारणारे लोक. आपल्या आजूबाजूला हे व्यक्ति तर असतातच. की जे आपलीच फक्त बढाये मारत असतात. दुसऱ्यांचे काय ऐकून घेत नसतात. म्हणजेच आपल्या पाहण्यात एक असा व्यक्ती असतो की जो स्वतःबद्दलचा सर्व बढाया मारत असतो. आपण त्याचे सर्व काही ऐकून घेतात. पण जेव्हा आपण काहीतरी सांगायला जातो तेव्हा तो ऐकून घेत नाही. तर अशा व्यक्तींपासून आपण दूरच राहिले पाहिजे. कारण त्यांचे बढाये ऐकून घेणार आपण आपला किमती वेळ वाया घालवत असतो आणि हा वेळ त्यांच्यासाठी घालवण्यापेक्षा आपण दुसरे चांगले काम करण्यात घालवलेले कधीही चांगले.

 

पाचवी व्यक्ती म्हणजे नेहमी चुका काढणारी व्यक्ती. आपल्या आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात की ज्या फक्त आपल्यातील चुका काढत असतात. आपण केलेले कोणत्याही कामांमध्ये त्यांना कोणती ना कोणती चूक ही दाखवायचेच असते. ते कधीही आपल्या कामाला चांगले म्हणत नाही सतत निगेटिव्हिटी चा विचार करत असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. आपल्यावर सकारात्मक प्रभावच पडत नाही. कायम नकारात्मक प्रभाव पडत जातो आणि त्यामुळे आपली मानसिकताही नकारात्मक होऊन जाते व त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण कधीही दूर राहिलेले चांगले.

 

अशाप्रकारे या काही पाच व्यक्ती आहेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगले करणार असाल तर अशा व्यक्तींपासून आपल्याला दूरच राहणे चांगले आहे. कारण या व्यक्तीमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *