मित्रांनो, आपले शरीर हे आपल्या अवयवांवर अवलंबून असते. अनेक प्रकारचे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात. हे अवयव आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे कार्य करीत असतात. त्यामुळे या अवयवांची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. एक जरी अवयव खराब झाला तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो योग्य ती देखभाल, काळजी ही घेतलीच पाहिजे. त्यासाठी योग्य प्रकारचा आहार, योग्य व्यायाम तसेच कोणत्याही गोष्टीचे व्यसन करता कामा नये. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या अवयवांवर होऊन आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो यकृत लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लिव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर खूप मोठ्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.
लिव्हर बाबतीत योग्य ती काळजी घेणे खूपच महत्त्वाचे असते. लिव्हर जर खराब झाले तर हा आपणाला प्राणघातक ठरू शकतो. लिव्हर खराब होण्याची अनेक कारणे आपल्याला माहीत असतीलच. दारूचे व्यसन, अल्कोहोलचे व्यसन तसेच कावीळ अशा अनेक कारणामुळे लिव्हर खराब होऊ शकते. तसेच गोळ्यांच्या, औषधांच्या रियाक्शन मुळे देखील लिव्हर खराब होण्याचा धोका आपणाला संबोधतो. या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे लिव्हर खराब झालेले आपण पहातोच. त्यामुळे त्यांना मृत्यू ओढवतो. मित्रांनो लिव्हर कधी खराब होते हे त्या व्यसनी माणसाला देखील कळत नाही.
तर मित्रांनो लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हर खराब झाले आहे हे नाही कसे ओळखावे. त्यानुसार तुम्ही आपल्या लिव्हरचे चेकअप करू शकता आणि हे निधान करू शकता की आपले लिव्हर हे खराब झाले आहे की नाही. तर त्यासाठीच मी तुम्हाला काही लक्षणे,संकेत सांगणार आहे. हे संकेतवरून आपणाला कळते की, आपले लिवर हे खराब झालेले आहे की नाही हे आपल्याला समजून जाते. चला तर मग जाणून घेऊयात हे संकेत, लक्षणे नेमके कोणते आहेत ते.
त्यातील पहिला संकेत म्हणजे आपला चेहरा हा पिवळसर होतो म्हणजेच आपल्या आपल्या चेहऱ्याचा कलर बदलतो. तो पिवळसर रंगाचा दिसतो. बाईलरुपीन नावाचा जो घटक आपल्या रक्तामध्ये असतो त्याचा रंग पिवळा पिवळा असतो. तसेच आपल्या डोळ्यांमधील जो काही पांढरा भाग असतो त्याचा रंग देखील पिवळसर होतो. म्हणजेच मित्रांनो या बायरुपिन नावाचा घटकाचे रक्तातील प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढत राहिल्याने आपल्या त्वचेचा तसेच डोळ्यांमध्ये असलेल्या पांढऱ्या रंगाचा कलर हा पिवळसर होतो. यावरून तुम्ही ओळखू शकता की आपले लिव्हर हे खराब होऊ लागले आहे.
दुसरे लक्षण आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या शौचाचा कलर हा नॉर्मल शौचाच्या कलर पेक्षा फीखट दिसत असेल त्या त्या वेळेस तुम्ही समजून जा आपल्या यकृतामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण झालेल्या आहे. जसा नॉर्मल शौचाचा कलर असतो त्यापेक्षा हा कलर वेगळाच दिसून येतो म्हणजेच आपले लिव्हर हे खराब झालेले असू शकतो व असे जर आढळून आल्यास तर आपल्या लिव्हरचे चेकअप करणे गरजेचे आहे.
तिसरे लक्षण आहे ते म्हणजे एखाद्या वेळेस आपले पाय सुजणे आणि आपले पोट फुगणे. हेदेखील लक्षण आपले लिव्हर खराब झाल्याचे दर्शवते. त्यावेळेस आपल्याला लिव्हरमध्ये कशाचे तरी इन्फेक्शन झाल्यामुळे हे लिव्हर ॲप नॉर्मली आपल्या पोटात पाणी साठवून ठेवत असते. त्यामुळे पाय सुजणे तसेच पोट फुगणे हे लक्षणे आपल्याला आढळून येतात आणि ही लक्षणे जर आढळून आली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. कारण ही लक्षणे लिव्हर खराब होण्यामागचे असू शकतात. त्यामुळे एकदा तरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
चौथे लक्षण आहे ते म्हणजे आपल्या शरीराला एखादी जरी जखम झाली तर त्या जखमेतून जो काही रक्तस्त्राव होत असतो तो काही केल्याने थांबत नाही. मित्रांनो आपल्या शरिरामध्ये असे एक प्रोटीन असतं की ते आपल्या शरीराला जखम झाली की रक्तस्त्राव थांबविण्याचे काम हे प्रोटीन करीत असते. मित्रांनो ज्यावेळेस आपल्या लिव्हर मध्ये काही इन्फेक्शन झाले असेल किंवा लिव्हर खराब झालेला असेल किंवा लिव्हरला सूज आली असेल तर या वेळेस या गोष्टींचे उत्पादन होत नाही किंवा त्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळेच मित्रांनो शरीरांमध्ये एखादी जखम झाली तर रक्तस्त्राव थांबतच नाही. त्यामुळे मित्रांनो तुमच्या शरीराला कुठेही एखादी जखम झाली आणि त्यातून होणारा रक्तस्त्राव हा थांबतच नसेल तर तुम्ही त्यामुळे समजुन जा की आपल्या लिव्हरला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे.
पाचवे लक्षण आहे ते म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा तुमच्या हाताला विनाकारण खाज होत असेल आणि हे खाज नंतर पायाला असे करत संपूर्ण शरीरभर तुम्हाला जर खाज होत असेल तर हे लक्षण म्हणजेच तुमच्या लिव्हरला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे हे दर्शवते. मित्रांनो विनाकारण आपल्या शरीराला खाज होणे हे एखादे दुर्लक्ष करणारी गोष्ट नाही तर आपल्या लिव्हर ला काहीतरी गडबड झालेली आहे हे दर्शवते. तर मित्रांनो त्यावेळेस तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला किंवा आपल्या लिव्हरचे चेकअप करणे गरजेचे आहे.
मित्रांनो वरील पैकी कोणतेही लक्षण तुम्हाला आढळल्यास तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर खूप मोठा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. तसेच मित्रांनो आपल्या यकृत, लिव्हरला काही इन्फेक्शन झाले असेल तर त्यावर मात देखील हे लिव्हर करू शकते. परंतु मित्रांनो इन्फेक्शनचे प्रमाण अधिक झाल्यास म्हणजेच हे इन्फेक्शन वाढतच गेले याचे कारण कोणतेही असो मग ते दारू पिणे असो, सिगारेट ओढणे असो किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन याचे प्रमाण वाढत गेल्यास या इन्फेक्शन चे प्रमाण देखील वाढते आणि त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या लिव्हरवर होतो.
आपल्या लिव्हरला काही प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या वेळेस ही लक्षणे होण्यास सुरुवात होतात. ही लक्षणे तुमच्या लिव्हरचा प्रोब्लेम पहिल्या स्टेजवरती असताना देखील होऊ शकतात. तर मित्रांनो अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.