पायांच्या टाचांवर पडलेल्या कितीही जुनाट भेगांवर आतापर्यंतचा आयुर्वेदातील अत्यंत प्रभावी १००% असा घरगुती उपाय ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो वातावरणात बदल झाला की आपल्या शरीराच्या त्वचेत सुद्धा हळू हळू बदल व्हायला सुरू होतो. त्वचा कोरडी पडायला सुरू होते. थंडीचे दिवस चालू झाले की आपल्या त्वचेत फरक पडायला सुरू होतो, पायाला चिरा पडतात. अत्ता तुम्हाला वाटत असेल की हे एवढं काय पण बोलायला खूप सोपे आहे. पण ही समस्या खूपच बिकट असते. काही लोकांच्या पायमधून म्हणजेच त्या भेगातून रक्त यायला चालू होते. मग त्यामध्ये छोटी मुले असो किंवा मग मोठी व्यक्ती असो अथवा वय झालेले लोक असो आपल्यातील प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी या टाचांच्या समस्यांना सामोरे जावे लागतेच.

त्याचबरोबर मित्रांनो ही पायांच्या भेगांची समस्या हा खरंतर कमीत कमी त्रासदायक आजार आहे. परंतु, या भेगा खोलवर जातात, तेव्हा डॉक्टरांकडून उपचारही घ्यावे लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच लक्ष दिले तर पुढील नुकसान-उपचार टाळता येणं शक्य आहे.

विशेषतः ज्यांना डायबेटिस झाला आहे, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे, या भेगा खोलवर गेल्यास संसर्ग होऊन पाय सडण्याची क्रिया सुरू होऊ शकते. त्यामु‍ळेच डायबेटिसच्या रुग्णांनी पायाला खूप महत्त्व दिलं पाहिजे व त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

त्याचबरोबर हिवाळ्यात त्वचे संबंधित आणि त्याचबरोबर भेगा पडलेल्या टाचा संबंधित अनेक समस्या जास्त होऊ लागतात. कारण मित्रांनो थंडीत पाण्यात खूपवेळ राहिल्य़ानं किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. टाचांमधून रक्त येतं किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो.

त्यासाठी बऱ्याचवेळा आपण क्रीमचा वापर करत असतो. काहीवेळा क्रीमने तात्पुरता आराम मिळतो आणि आपल्याला ही जखम बरी झालेली आहे असं वाटतं मात्र हा त्रास तात्पुरता बरा होतो. काहींना क्रीमची एलर्जी असते अशावेळी थोडी आपली आपण काळजी घेतली आणि घरगुती उपाय केले तर थंडीतही तुमच्या टाचा मुलायम राहातील.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली त्यामुळे काही दिवसांमध्ये आपल्या टाचांवर ज्या काही भेगा पडलेल्या आहेत किंवा त्यातून वारंवार जे रक्त येणारी समस्या आहे तीही लवकरात लवकर कमी होईल.

आपली टाच अत्यंत मुलायम होईल. तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला या उपायांमध्ये दोन स्टेप्स करायचे आहेत. मित्रांनो पहिली स्टेप करत असताना सर्वात आधी आपल्याला एक बादली गरम पाणी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे गरम पाणी आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचा आहे. मित्रांनो हे भांड आपल्याला थोडसं मोठं घ्यायचं आहे.

कारण त्या भांड्यामध्ये आपण आपले दोन्ही पाय ठेवायचे आहेत म्हणूनच आपले दोन्ही पाय मावतील एवढे भांडे आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे गरम केलेले पाणी थोडसं नॉर्मल झाल्यानंतर आपल्याला या पाण्याने आपले दोन्ही पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

मित्रांनो तुम्ही हे पाय धुत असताना साबण चा वापर करून अगदी स्वच्छ पाय धुऊन घ्यायचे आहेत आणि मित्रांनो पहिल्या स्टेप मध्ये अशा पद्धतीने आपले पाय स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप करायचे आहे. या दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला सर्वात आधी एक चमचा कोलगेट घ्यायचा आहे.

मित्रांनो आपण जे पांढर कोलगेट वापरतो ते आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे एक चमचा कोलगेट आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक ते दोन विटामिन ई जी जी कॅप्सूल असते त्या कॅप्सूलमध्ये जे आतल्या बाजूस लिक्विड असते ते लिक्विड आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.

मित्रांनो साधारणता एक ते दोन कॅप्सूलमधील लिक्विड आपल्याला त्या कोलगेट मध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच एक पाच ते सहा लिंबाच्या रसाचे थेंब सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत.

अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे पेस्ट व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो रात्री झोपताना ही पेस्ट आपल्याला आपल्या पायांवर लावायचे आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला प्लास्टिकचा कागद बांधायचा आहे आणि त्याचबरोबर असा प्लॅस्टिकचा कागद बांधल्यानंतर आपल्याला त्यावर सॉक्स सुद्धा घालायचे आहेत आणि असंच रात्रभर आपल्याला ती पेस्ट आपल्या टाचांवर पडलेल्या भेगांवर राहू द्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने टाचांवर ही पेस्ट आपल्याला रात्री लावून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला पाय आपले स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो रात्री झोपताना तुम्ही हा उपाय केला तर यामुळे एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या पायांच्या टाचांवर असणारे ज्या काही भेगा आहेत त्या निघून गेलेल्या दिसतील.

त्याचबरोबर मित्रांनो त्यामधून जर रक्त येत असेल किंवा त्यामधून वेदना होत असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. यामुळे तुमच्या पायांवर कुठेही असणाऱ्या भेगा निघून जातील आणि त्याचबरोबर त्यामधील वेदनाही दूर होतील. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *