मित्रांनो आजकालचे जीवन हे खूपच धकाधकीचे जीवन आहे म्हणजेच प्रत्येक जण हा आपल्या कामांमध्ये इतका व्यस्त झालेला आहे की त्यांचे आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष राहत नाही. आजकाल खूप सारे आजार हे डोके वर काढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक आजार आपणाला होत असल्यामुळे आपण खूपच टेन्शनमध्ये येतो. तर अनेकांना गुडघेदुखी तसेच सांधेदुखी हाता पायांना वेदना होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागते आणि जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे या आजारांचा आपणाला प्रत्येकालाच सामना करावा लागतोच.
म्हणजेच गुडघेदुखीचा त्रास असेल, सांधेदुखी असेल किंवा हात पाय दुखणे या समस्या सर्वांनाच भेडसावत असतात. तर त्यासाठी आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतो तसेच काही घरगुती उपाय करतो किंवा आयुर्वेदिक उपाय करत असतो. तरी देखील काही परिणाम आपणाला होत नाही आणि आपला हा त्रास आपल्याला कायमच सहन करावा लागतो.
तर आज मी तुम्हाला या तुमच्या गुडघेदुखीवर, सांधेदुखीवर तसेच हातापायांच्या वेदना यावर घरगुती उपाय सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचा हा त्रास कमी होणार आहे. या उपायासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. अगदी आपणाला सहजतेने मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून हा उपाय करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय नेमका कसा करायचा तो.
तर पहिल्यांदा आपणाला जी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे कोरफड. कोरफड ही प्रत्येकाने पाहिलेली आहे आणि आजकाल तर आपल्या घरातील आसपासच्या बागेमध्ये कोरफड ही सर्रास पाहायला मिळते. केस गळती वरती अनेक महिला कोरफडीचा वापर करतात. तसेच त्वचेला देखील कोरफडीचा खूप चांगला फायदा होतो. तर तुम्ही एक कोरफडीचे पान आणायचे आहे आणि त्यावरती जी साल आहे ही साल तुम्ही काढून घ्यायची आहे आणि त्यातील जो आपला गर आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे.
साधारणतः अर्धी वाटी तरी हा गर आपणाला काढून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही हा गर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या हातानेच तो तुम्ही गर मिक्स करून घेऊ शकता. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो आणि कोरफड ही आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही कोरफडीचा गर अर्धी वाटी काढून घ्यायचा आहे.
नंतर तुम्हाला एक चमचा हळद एका पातेल्यामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला हळदीमध्ये तुम्हाला हा कोरफडीचा गर घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे. थोडे गरम करून घ्यायचे आहे. थोडेफार म्हणजेच एक दोन तीन मिनिटे तरी तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही ते बाजूला काढून घ्यायचे आहे आणि नंतर हा जो तयार झालेला लेप आहे हा तुम्ही आपल्या गुडघेदुखीवर तसेच सांधेदुखीवर कंबरदुखी असेल त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या पेस्ट वरती एखादे सुती कापड तुम्ही बांधू शकता.
एखादी खराब झालेले कापड तुम्ही बांधू शकता किंवा ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही जे कोरफडीची साल काढलेली आहे ती साल त्या पेस्ट वरती ठेवून नंतर त्यावरती कपडा बांधला तरी देखील चालेल. तुम्ही हे पेस्ट आहे ही संध्याकाळी आपल्या गुडघ्यावर आपल्या कमरेवरती किंवा जिथे तुम्हाला त्रास होतो म्हणजे वेदना होतात त्या ठिकाणी लावायचा आहे आणि हे सुती कापड त्यावरून बांधायचे आहे.
रात्रभर ही पेस्ट तसेच ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या वेदना या कमी झालेल्या जाणवतील. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही देखील आवश्यक करून पहा. यामुळे तुमच्या सर्व काही ज्या गुडघेदुखीचा त्रास असेल तसेच कंबर दुखी असेल किंवा सांधेदुखी असेल सर्व काही नक्कीच कमी झालेले जाणवेल. तर असा हा घरगुती उपाय एक वेळा अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.