मित्रांनो, अगदी कसल्याही प्रकारच तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल, जांगेत झालेले असेल आणि कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल कुठल्याही प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल, खरुज असेल, खाज असेल तर कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिससारखा त्वचारोग असेल तरी कसलाही त्वचारोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आपल्यातील अनेक लोक त्वचारोग, गजकर्ण आणि नायटा यांसारख्या रोग दूर करण्यासाठी दोन दोन वर्ष ट्रीटमेंट करतात. सहा महिने गोळ्या खाऊनही त्यांचा हा त्वचारोग आहे तो बरा होत नाही आणि मग अशासाठी आपल्याला आयुर्वेदाचा सहारा घ्यावा लागतो.
मित्रांनो, आयुर्वेदामध्ये यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याचा वापर करून कसल्याही प्रकारचा त्वचारोग अगदी दोन-तीन वेळेस जर तुम्ही हे औषध लावले तरी पूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काहीही आणायची गरज नाही. अगदी फुकटामध्ये तुमचा त्वचारोग बरा होतो.
तर यासाठी आपल्याला जे दोन घटक लागणार आहे त्यामधला जो पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल. मित्रांनो ऑलिव्ह ऑईल हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
त्याच बरोबर मित्रांनो केस आणि त्वचेच्या काळजीशी संबंधित विविध समस्यांमुळे प्रत्येकजण त्रस्त आहेत आणि जर तुम्हाला देखील या समस्यांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. म्हणूनच मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपण या ऑलिव्ह ऑईलचा वापर करणार आहोत. तर मित्रांनो यानंतर पुढचा आणि दुसरा जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे मीठ.
मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ हे असतं. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की, मिठ हे आपल्या त्वचेसाठी कसं काय फायदेशीर असू शकेल? कारण जर मिठाचा आपल्या त्वचे सोबत जर संपर्क झाला तर यामुळे आपल्याला आग उठते.
परंतु मित्रांनो संपर्क झाल्यावरच आग उठते. जर एखाद्या पदार्थासोबत मीठ आपल्या त्वचेच्या संपर्कात आले तर याचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होत नाही आणि म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला ऑलिव्ह ऑइल सोबत मीठ देखील लागणार आहे. तर मित्रांनो सर्वात आधी एक किंवा दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घ्यायच आहे.
त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायच आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायच आहे आणि याची व्यवस्थित पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर कापसाच्या सहाय्याने लावायच आहे.
परंतु हे मिश्रण लावण्याआधी आपल्याला आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो स्वच्छ चेहरा धुतल्यानंतर आपल्याला कापसाच्या साह्याने हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावायच आहे. मित्रांनो जर तुम्हाला हाताला किंवा पायाला इतर ठिकाणी त्वचारोग झाला आहे आणि त्या ठिकाणी हे मिश्रण लावणार असाल तर तुम्ही शक्यतो सकाळी आंघोळीच्या पूर्वी हे मिश्रण लावायच आहे.
त्यानंतर थोड्यावेळाने आंघोळ करायचे आहे आणि मित्रांनो हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण लावायचं नाही. कारण यामुळे आपल्या हातावर असणारे बॅक्टेरिया आहे त्यामध्ये मिक्स होतात किंवा त्यांचाही संपर्क आपल्या त्वचेला होतो आणि त्यामुळे आपली समस्या जास्त वाढू लागते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्येच याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर आणि तुमच्या समस्येवर झालेला दिसून येईल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. तुम्हाला असणारा त्वचारोग, गजकर्ण, नायटा यांसारख्या सर्व समस्या नक्की दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.