मित्र मैत्रिणींनो तुम्ही ही रोज अंडी खात असाल तर ही महत्वपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी, अंडी खाण्याचे फायदे आणि नुकसान ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, शरीराला अंडी ही अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु काहीजणांना अशी सवय असते की, अंडी खाल्ल्यानंतर ते काहीतरी खात असतात. तर मित्रांनो आज या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहित नसेल. मित्रांनो अंड खाणं कुणाला आवडत नाही. लहान मुलांमध्ये तर अंड्याचे पदार्थ खूप प्रिय आहेत. जसे की आमलेट, बुर्जी, खांडोळी असे विविध पदार्थ आहेत. अंडी खाण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले शरीर मजबूत तसेच शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते आणि मित्रांनो अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो याला सुपर फूड देखील म्हंटले जाते.

मित्रांनो अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.

तर मित्रांनो निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आहारात प्रत्येक पदार्थाचा समावेश करणं गरजेचं आहे. पालेभाज्या, कडधान्य, फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, कॅल्शिअम मिळत असतात. आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात आणि अंडी खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

तर मित्रांनो अशा या अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि ‘ड’ जीवनसत्व असते. या घटकांमुळे शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत होते. हाडांना दिवसेंदिवस मजबूत बनवायचे असल्यास त्यासाठी नियमितपणे अंड्याचे सेवन केल्यास चांगला फायदा मिळतो. दररोज दोन अंड्यांचे सेवन शरीरातील अपायकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. यामुळे शरीरासाठी चांगले ठरणाऱ्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढीस लागून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हृदयासंदर्भातील आजार असणाऱ्या व्यक्तीने नियमित अंड्यांचे सेवन केल्यास अशा आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

शरीरात रक्तवाढ करावयाची झाल्यास अंड्यांचे सेवन उत्तम आहे. शारीरिक कमजोरी किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे उद्भवणारे विकार अंड्याच्या सेवनाने नष्ट होऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडी शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दररोज सकाळचे वेळी जर आपण उकडलेली गरमागरम अंडी खाल्ली तर यामुळे आपल्या घशामध्ये जे इन्फेक्शन असते ते देखील दूर होते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, छातीतील कफ यांसारख्या समस्यांपासून ही आपल्याला आराम मिळतो.

त्याचबरोबर मित्रांनो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंड्यांचे सेवन हे तुमच्या शारीरिक गरजा आणि हालचालींवर अवलंबून असते. पण अंड्याच्या पिवळ्या भागात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असते. ज्यामुळे हृदयविकार वाढू शकतात. मात्र वॉशिंग्टनच्या सरकारी आरोग्य वेबसाइटनुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि हृदयरोग टाळण्यासाठी तुम्हाला दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल मिळायला हवे. त्यामुळे हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी रोज एक अंड्याचे सेवन करावे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त अंड्याचे सेवन केले गेले तर ते तुम्हाला आजारी देखील पाडू शकते.

तर मित्रांनो असे हे अंड्याचे फायदे आपल्या शरीराला होतात. अनेक आजारांपासून सुटका हे अंडी करीत असतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *