मित्रांनो आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे दात. आयुर्वेदामध्ये असे म्हटले जाते कि ज्याचे दात चांगले त्याची प्रकृती चांगली. पण याच दातांकडे आपण पाहिजे तितके लक्ष देत नाही. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की जेवल्यानंतर चूळ भरावी. तसेही कोणताही पदार्थ किंवा गोष्ट आपण खाल्ली तर त्यानंतर चूळ भरणे फार महत्त्वाचे आहे कारण मित्रांनो जेवल्यानंतर किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर काही अन्नाचे कण आपल्या दातात अडकून बसतात. काही अन्नकण दाताला चिकटून बसतात. हे जर रात्रभर दातावर असेच राहिले तर दात किडायला सुरवात होते. म्हणून जेवल्यानंतर चूळ भरावी. कोणतेही पदार्थ खाल्ले तर चूळ भरावी. रात्री झोपताना दात घासणे खूप आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.
मित्रांनो दुधाचे दात पडल्यानंतर पुन्हा जे नवीन दात येतात त्या दातांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे दात पडले तर पुन्हा येत नाहीत. म्हणून दातांच्या स्वच्छतेची विशेष काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अन्यथा दात किडतात-सडतात आणि त्यानंतर ज्या वेदना होतात त्या आपल्याला असह्य होतात. यासाठी कोणताही पदार्थ आपण खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे खूप महत्त्वाचे आहे आणि मित्रांनो दात स्वच्छ न केल्यामुळे काही वेळ किडून पडतात, सडतात, हिरड्या सुजतात व वेदना असह्य होतात. दवाखान्यात जाऊन खूप औषधे घेतली तरी हा त्रास कमी होत नाही. काही वेळा दाढ किंवा दात काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
मित्रांनो काही लोकांना व्यसनाची सवय असते. त्यामुळे अशा लोकांचे दात लाल पिवळे झालेले दिसतात. असे लोक बोलताना आणि हसताना खूप वाईट दिसतात. काही लोकांना व्यसन करण्याची सवय असते. त्यामुळे दात लाल-पिवळे पडतात पण चारचौघात तोंड उघडायला अशा लोकांना लाजही वाटत असते. कारण कधीही स्वच्छ मोत्यासारखे दात सर्वांनाच आकर्षित करत असतात आणि मित्रांनो वरील सर्व समस्यांसाठी आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुमची दाढदुखी कायमची पळून जाईल. दातातील किडे निघून जातील. चला तर पाहूया कोणता आहे तो उपाय.
मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार दंत रक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी भरपूर आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला झोप प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे वावडिंग, हे वावडिंग तुम्हाला मसाल्याच्या दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या मिळून जाईल मित्रांनो साधारणता एक उपायासाठी आपल्याला एक चमचा वावडिंग लागणार आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक चमचा वावडिंग पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो साधारणता 20 ते 30 मिनिट आपल्याला हे वावडिंग पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत.
आणि वीस ते तीस मिनिटानंतर आपल्याला एक पांढरा सफेद कापड घ्यायचा आहे म्हणजेच एक कापड किंवा एक पांढरा रुमाल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या रुमालमध्ये आपल्याला मधोमध हे भिजलेले चिमूटभर वावडिंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याची एक पुरचुंडी बनवायची आहे आणि पुरचुंडी आपण तयार केलेली आहे ही आपल्याला आपला जो दात किडलेला आहे किंवा जी धाड आपल्याला किडलेले आहे असे वाटते ते किडलेल्या दाढीवर किंवा दातावर आपल्याला ही पुरचुंडी साधारणतः एक तासांपर्यंत धरायचे आहे आणि मित्रांनो ही पुरचुंडी एक तास दातामध्ये धरल्यानंतर जी लाळ तयार होणार आहे ते आपल्याला बाहेर थुकुन द्यायचे आहे चुकूनही ती लाड आपल्याला घ्यायची नाही.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला वावडिंग यांचा उपयोग करून आपल्याला जी काही दात दुखी किंवा दात किडलेली समस्या आहे ती दूर करायची आहे दातामध्ये धरलेली पुरचुंडी बाहेर काढा तेव्हा तुम्हाला असे दिसून येईल की त्या कापडावर किंवा रुमाला बरोबर तुमच्या दातांमध्ये जी काही कीड होती तीही बाहेर आलेले आहेत तर मित्रांनो असा अत्यंत सोपा पण प्रभावी असा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.