काळी पडलेली मान गोरी करा आता फक्त मोजून दहा मिनिटांत या खास घरगुती उपायाने …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर दिसावा तसेच आपण चार चौघांमध्ये गेल्यानंतर आकर्षक दिसावे असे वाटत असते आणि त्यासाठी आपण मग अनेक उपायांचा वापर करत असतो. म्हणजे ब्युटी पार्लरला जाणे त्यांचा सल्ला घेणे त्यांनी सांगितलेल्या क्रिम्सचा वापर करणे अशा अनेक आपल्या पद्धती चालू असतात. जेणेकरून आपण आकर्षक दिसावे. परंतु काही वेळेस काय होते की आपण भरपूर साऱ्या क्रीम्स वापरतो किंवा अनेक उपाय करून देखील आपण चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. काही वेळेस आपला चेहरा काळपट पडलेला असतो. काही वेळेस आपले हातपाय काळे दिसतात. तर काही वेळेस आपल्या काळ्या मानेमुळे देखील आपल्या सुंदरतांमध्ये अडचण निर्माण होते.

बऱ्याच जणांची ही मान काळी पडलेली असते आणि त्यामुळे मग त्यांना खूपच अवघडल्यासारखे होते. तर या काळ्या पडलेल्या मानेवरती आज एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच या उपायाने तुमची काळी पडलेली मान ही गोरी नक्कीच होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे? यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे? याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अर्धा चमचा कॉफी घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये कॉपी ही उपलब्ध असते तर अर्धा चमचा आपल्याला कॉफी घ्यायची आहे. तसे पाहायला गेले तर आपला चेहरा गोरा करण्यासाठी देखील कॉफीचा खूपच वापर होतो. त्यासाठी अनेक उपाय देखील सांगितलेले आहे.

तर आपणाला या ठिकाणी अर्धा चमचा कॉफी घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये बेकिंग पावडर हे देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. तर बेकिंग पावडर आपणाला थोडीशी घ्यायची आहे. चिमूटभर पेक्षा थोडीशी जास्त आपणाला बेकिंग पावडर यामध्ये घालायचे आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा अर्धा लिंबूचा रस आपणाला यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.

त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपणाला जो आपण लिंबूचा रस काढलेला आहे आणि जो अर्धा लिंबूचा भाग राहिलेला असतो म्हणजे रस काढल्यानंतर जे त्यावरचे जे टरफल म्हणजेच जे चिलके असतात ते चिलके अर्ध्या लिंबूचे तसेच घ्यायचे आणि ते आपण मिक्स केलेली जी पेस्ट आहे त्यामध्ये बुडवायची आहे आणि त्या लिंबूच्या चीलक्याचया साहाय्यानेच आपणाला ती पेस्ट आपल्या मानेवरती लावायची आहे.

ही पेस्ट लावल्यानंतर आपणाला पाच मिनिटे तशीच पेस्ट सुखण्यासाठी ठेवायचे आहे आणि नंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने ही आपली मान धुवायचे आहे. जर तुम्ही सलग तीन चार दिवस हा जर उपाय केला तर यामुळे तुमची काळी पडलेली मान अगदीच गोरी होईल आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता.

तर मित्रांनो अशा प्रकारे हा घरगुती उपाय करून तुम्ही आपली काळी पडलेली मान ही गोरी नक्कीच करू शकता. तर तुम्ही एक वेळेस हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *