मित्रांनो आपल्यापैकी अनेक व्यक्तींचे वय कमी असतं परंतु अनेक जण आपल्याला विचारत असतात की तुमचे वय जास्त आहे का.? कारण आपले वय प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वाटू लागते त्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पडणारे सुरकुत्या. अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.
अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत. हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी एक फेशियल तयार करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे.
मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्याचे वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे विटामिन सी असते म्हणून आपलं चेहऱ्यावर जे काही वांगाचे डाग असतील किंवा काळे डाग असतील हे सर्व निघून जाण्यास मदत होते मित्रांनो आपण या ठिकाणी जो बटाटा घेतलेला आहे तो एकदम बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे .
आणि त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये खलबत्ता असेल किंवा जी कोणती वजनदार भांडे तुमच्या घरामध्ये आहे त्याच्यामध्ये घालून ते चेचून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये थोडे देखील तुम्हाला पाणी ऍड करायचे नाहीत बिना पाण्याचा तुम्हालाही पेस्ट तयार करायची आहे आणि याच्या नंतर जी आपल्याला सामग्री लागणार आहे.
ते म्हणजे कापूर कापूर देखील आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते कापराचे असे काही अनेक वेगवेगळे फायदे देखील आहेत. कापरामुळे पूर्ण चेहरा थंड होऊन जातो तुम्हाला या ठिकाणी दोन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याची एकदम बारीक अशी पूड करून तुम्हाला त्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि एकजीव करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे लागणार आहे.
ते म्हणजे गुलाब पाणी या ठिकाणी आपल्याला एक चमचा गुलाब पाणी घ्यायचा आहे जोपर्यंत गुलाब पाणी आणि ते मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवायचा आहे आणि तुम्ही एका वेळेस जास्त जरी करून ठेवला तरी देखील चालू शकते पुन्हा पुन्हा तुम्हाला ते वापरता देखील येते तुमच्या चेहऱ्यावर लावल्यामुळे तुम्हाला येत असलेले डार्क सर्कल काळे डाग वांगाचे डाग किंवा जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्या देखील निघून जाण्यास मदत होणार आहे .
तुम्ही थोडं नॉर्मल गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे किंवा त्याची वाफ घेतला तर ते अति उत्तमच असणार आहे आणि त्याच्यानंतर नेका स्वच्छ कापडाने आपल्याला चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी डाग आहेत किंवा सुरकुत्या पडलेले दिसत आहेत त्या ठिकाणी लावला तरी देखील चालू शकते किंवा जर तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर लावणार असला तरी देखील चालू शकतो ही पेस्ट लावून तुम्हाला वीस मिनिटं तसेच तुमच्या चेहऱ्यावर ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर एकदम स्वच्छ ताज्या पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फायदाच होणार आहे.