मित्रांनो, आपल्या शरीरासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते आणि पौष्टिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो आपल्या शरीरासाठी बदाम हे एक खूपच पौष्टिक आहे. याचा आपल्या आहारात असणे खूप गरजेचे आहे. परंतु मित्रांनो अनेक जण बदामाचा आपल्या आहारामध्ये समावेश करतात. परंतु बदाम कसे खावे? त्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणत्या प्रकारचे बदाम खावेत? याची माहिती आपल्याला माहीत नसल्याकारणाने त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्यावर होऊ शकतो. कोणत्या प्रकारचे बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि ते किती व कसे खावे याची आज मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो बदाम हे संध्याकाळी भिजत घालावे. ते रात्रभर तसेच भिजत ठेवावेत म्हणजेच बदाम हे सात ते आठ तास भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यानंतर या बदामा वरची साल काढून हे बदाम खावेत. अनेक जण असे म्हणतात की, या बदामाच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म सामावलेले असतात. पण मित्रांनो जर तुम्ही बदाम वरची साल आहे तशीच खाल्ली तर आपल्याला बदामापासून मिळणारे पौष्टिक घटक अडवून ठेवण्याचे काम ही साल करीत असते. त्यामुळे संपूर्ण शरीराचे पोषण ही साल करू देत नाही. त्यामुळे बदामाचे फायदे आपल्या शरीराला होत नाहीत.
त्यामुळे या सालीचे सेवन करू नये. सकाळी उठल्यानंतर बदामा वरची साल काढूनच हे बदाम खावेत. तसेच जर तुम्ही बदामाची साल खाल्ली तर बदामाचे व्यवस्थित पचन देखील होत नाही. त्यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या होत राहतात.
बदामाची खाण्याची आणखी एक पद्धत खूपच चांगले आहे. म्हणजेच बदामाला अंकुरित करून हे बदाम खायला हवेत. मित्रांनो एक दिवस हे बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यातील संपूर्ण पाणी बाजूला काढून दोन ते तीन दिवस हे बदाम तसेच ठेवायचे आहे. तुम्हाला तिसऱ्या दिवशी कळेल की बदामाला अंकुर फुटलेले आहे. असे अंकुरित असलेले बदाम आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. म्हणजेच त्यातील पौष्टिक घटक वाढवण्यास हे अंकुर उपयोगी ठरतात म्हणूनच अंकुरित बदाम खाल्ल्याने त्या बदाम मधील पौष्टिक तत्वे ही 30 ते 35 टक्क्यांनी वाढतात.
तर मित्रांनो असे हे बदाम आता किती प्रमाणात खावे याविषयी जाणून घेऊया. जगभरात केलेल्या संशोधनानुसार बदाम अति प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरात गॅसेस, अपचन सारख्या समस्या होऊ शकतात. तसेच विटामिन ई हे आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात जाते. त्यामुळे विटामिन ई च्या प्रभावाचा वाईट दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतो.
तसेच बदामाचे अति प्रमाणात सेवन केल्याने पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे जगभरात संशोधन केलेल्या निष्कर्षानुसार दिवसभरात जास्तीत जास्त प्रौढ लोकांनी वीस पेक्षा जास्त बदाम खाऊ नये. पण मित्रांनो प्रौढ व्यक्तींनी दिवसाला आठ ते दहा बदाम खावे. तसेच लहान मुलांनी म्हणजेच दहा ते बारा वर्ष वयोगटातील मुलांना चार ते पाच बदाम पुरेसे आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे बदामाचे तुम्ही जर सेवन केले तर त्याचा फायदा आपल्याला शरीराला खूपच चांगला ठरेल. अतिप्रमाण देखील बदामाचे आपल्या आहारामध्ये करू नये. कारण त्याचा वाईट दुष्परिणाम देखील आपल्यावर होऊ शकतो. तर मित्रांनो तुम्हाला बदाम खाण्याची योग्य पद्धत तसेच बदाम किती खावे? कशा पद्धतीने खावे? तसेच अंकुरित बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला पौष्टिक घटकांचा जास्त फायदा मिळू शकतो हे समजले असेलच. तर अशा पद्धतीने तुम्ही बदामाचे आपल्या आहारामध्ये सेवन अवश्य करू शकता आणि निरोगी राहू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.