मित्रांनो आजकाल आपण प्रत्येकजण आपल्या घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो. तसेच आपले घर कसे सुंदर दिसावे म्हणजेच आपला आजूबाजूचा परिसर हा हिरवागार कसा राहील याकडे प्रत्येक जण लक्ष देत आहे. अनेक जण वेगवेगळ्या फुलांची, फळांची झाडे लावत असतात. यामुळे हवा शुद्ध देखील राखली जाते आणि आपले आरोग्य देखील व्यवस्थित राहते. तर आपल्या आरोग्यासाठी ह्या वनस्पती खूपच फायदेशीर आहेत. जर हवा शुद्ध असेल तर आपले आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडे ही लावायलाच हवी.
तर तुम्हाला आज मी एका वनस्पती बद्दल सांगणार आहे ही वनस्पती तुम्हाला अनेक आरोग्याच्या बाबतीत फायदेशीर ठरणारी अशी आहे. ही वनस्पती तुम्ही देखील पाहिलेली असेल तर नदीकाठच्या ठिकाणी तसेच आजूबाजूला रस्त्याकडेला देखील तुम्हाला नक्कीच ही वनस्पती दिसेल. तर ती वनस्पती म्हणजेच आळू.
आज-काल शहरात देखील अनेक कुंड्यांमध्ये अळूचे झाड आपल्याला पाहायला मिळते. अनेक जण आळूची वडी तसेच आळूची भाजी देखील करतात आणि हे आळूचे झाड म्हणजेच आळूची पाने खूपच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर प्रत्येकालाच आळूची वडी किंवा आळूची भाजी हे फक्त आपल्यासाठी चांगले आहे हे माहिती आहे. परंतु आपल्या अनेक आजारांवरती देखील हे आळूचे पान खूपच फायदेशीर ठरते.
तर अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन बी अशी पोषकतत्वे आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तर अशा या अळूच्या पानांचा आपल्या अनेक आजारांवरती देखील आपल्याला फायदा होतो आणि तो फायदा कसा करून घ्यायचा आहे आज आपण जाणून घेऊयात.
तर तुम्हाला एखादी जखम झाली असेल आणि ती काही केल्या भरून निघत नसेल तसेच तुम्हाला कानाबाबत काही समस्या असतील तसेच तुम्हाला जर एखाद्या विंचवाने चावले असेल यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागत असेल तसेच कॅल्शियमची कमतरता तुमच्या शरीरामध्ये असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर या सर्वांवरती हे आळूचे पान खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर आता आपण जाणून घेऊयात या सर्वांवरती आळुच्या पानांचा आपण कसा वापर करायचा ते.
तर तुम्हाला कानाच्या बाबतीत काही समस्या असेल तर तुम्ही अळूचे कोवळे पाने घेऊन ते स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि हे पान तुम्ही वाटून घ्यायचे आहे आणि याचा रस काढायचा आहे आणि याचा रस तुम्ही गाळून घेतल्यानंतर तुम्हाला एक ते दोन थेंब आपल्या कानामध्ये घालायचा आहे. यामुळे कानाबाबत जी काही समस्या असेल ती नक्कीच दूर होणार आहे. म्हणजेच कानामध्ये तुम्हाला जर दुखत असेल तर ही समस्या तुमची नक्कीच निघून जाणार आहे.
तसेच तुम्हाला खूप दिवसांपासून एखादी जखम झाली असेल आणि ही जखम काही केल्याने भरून निघत नसेल त्यातून रक्त येत असेल तर त्यासाठी देखील अळूच्या पानांचा उपयोग होतो. तर तुम्हाला अळूची कोमल पाने तोडून आणायचे आहे. ती स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि ही पाने तुम्ही वाटून घ्यायची आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झाली असेल किंवा एखादा घाव असेल तो काही केल्याने ठीक होत नसेल भरून निघत नसेल जखम तर त्या ठिकाणी तुम्ही या अळूची पाने जी आपण वाटलेली आहे ती लावायची आहेत यामुळे तुमची नक्कीच जखम भरून निघेल.
जर एखादा विंचू तुम्हाला चावला असेल आणि त्याच्या खूपच वेदना तुम्हाला होत असतील तर तुम्ही अळूच्या पानांचा रस ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी जर लावला तर यामुळे देखील जो काही विंचू चावल्यामुळे होणारा त्रास आहे वेदना आहे त्या नक्कीच कमी होणार आहेत.
तसेच आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही अळूच्या पानांची भाजी जर आपल्या आहारामध्ये सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारे कॅल्शियमची कमतरता देखील दूर होईल. तसेच जो काही गुडघेदुखीचा त्रास असेल तर हा देखील त्रास नक्कीच कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अळूच्या पानांचा वापर आपल्या आहारामध्ये नक्की करायचा आहे.
यामुळे तुमच्या अनेक आजारांवरती याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि तुमचा जो काही आजार आहे तो नक्कीच बरा होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या जीवनामध्ये अळूच्या पानांचा अवश्य वापर करायला हवा.