2 वर्ष स्वामींची मनोभावे सेवा केली पण प्रचिती आलीच नाही आणि त्या दिवशी रागाने, स्वामींची मूर्ती गुंडाळून कपाटात ठेवली; पण त्यानंतर या ताईसोबत असं काही झालं की……

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, स्वामी समर्थ यांची लिला खूपच अगाध आहे. प्रत्येक भक्त मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची भक्ती करीत असतात. अनेक सेवा करीत असतात. परंतु मित्रांनो अनेक भक्तांचा असा प्रश्न असतो की मी एवढ्या सेवा करतो तसेच मी पूजा अर्चना करतो तरीदेखील माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही किंवा स्वामी याची प्रचिती देत नाहीत. परंतु मित्रांनो कधीही आपल्या मनामध्ये कोणतीही मागण्याची इच्छा ठेवून आपण ती सेवा करायची नाही. तर निस्वार्थ भावनांनी आपणाला स्वामींची भक्ती करायची आहे. मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही स्वामींची भक्ती केली तर याचे तुम्हाला शुभ फळ नक्कीच प्राप्त होते.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. ज्यांना स्वामींची प्रचिती आलेली आहे. तर मित्रांनो त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात. हा अनुभव औंढा येथील सौ सुप्रिया पारधी या ताईंचा आहे. अगदी काळजाच पाणी करणारा हा अतिशय भयानक असा अनुभव त्यांच्याच शब्दात.

मी सौ सुप्रिया आज मी माझा हा दिव्य अनुभव सर्वांनाच सांगणार आहे. अगदी हा अनुभव सांगताना मला खूप रडायला येत आहे. पण तेव्हा माझ्याकडून काही चुकाही झाल्या आणि तशा चुका तुमच्याकडून होऊ नये. कारण आपल्या काही चुकाच आपल्या कामांमध्ये अडथळा देखील बनतात.

मला लग्नाच्या अगोदर स्वामींच्या कोणत्याच सेवांबद्दल माहिती नव्हतं. लग्नानंतरच मी या स्वामींच्या सेवेबद्दल जाणून घेतलं. मी लग्नाआधी कोणत्या धार्मिक कार्यातही जात नव्हते किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवा देखील करत नव्हते.

असे काही प्रसंगच माझ्यासोबत घडले. ज्यामुळे मला धार्मिक कार्यात यावच लागलं. माझं लग्न झालं आणि लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली त्यावेळेस खूपच सर्वांना प्रेशर आलं म्हणजे मला मूल नव्हतं. म्हणजेच माझ्याबरोबर ज्यांची लग्न झाली होती त्यांना मुले झाली होती. त्यामुळे घरातील खूपच निराश होते.

त्यावेळी आमची परिस्थिती खूपच हलाखीची होती. माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता. त्यावेळी कोरोनाचा काळही होता. घरामध्ये जे काही पैसे येत होते ते पैसे देखील राहत नव्हते. पैशासंबंधी खूपच किटकिट होत होती. म्हणजेच आलेला पैसा घरात टिकत नव्हता. सतत काही ना काही आजार हे आमच्या घरांमध्ये सुरू होते. तशातच मी तीन वेळा प्रेग्नेंट झाले परंतु ते मिसकॅरेज माझं झालं. सतत आयुष्यात असे भयानक प्रसंग येत होते.

कशामध्येच आम्हाला सुख भेटत नव्हतं. त्यावेळची वेळ आठवली की मला खूप रडू येतं. त्यावेळी मी स्वामींचे खूप व्हिडिओ तसेच अनुभव ऐकले आणि शेवटचा पर्याय म्हणून मी स्वामींची सेवा चालू केली. मी स्वामींची सेवा याआधी कधीच केलेली नव्हती. परंतु मित्रांनो मी त्यावेळेस स्वामींचे अनुभव ऐकून स्वामींची सेवा म्हणजेच स्वामींचे गुरुचरित्र, स्वामी पारायण तसेच सारामृत वाचले. तसेच स्वामींचे ११ गुरुवारचे व्रत देखील मी केले. परंतु तरीदेखील आमची परिस्थिती बदली नाही. आम्हाला अनेक अडचणी येऊच लागल्या.

मला त्यावेळेस खात्री होती की स्वामी मला या सर्वांतून बाहेर काढतील. परंतु मित्रांनो आमची परिस्थिती आहे तशीच होतील. सकाळी मी चार वाजता उठून सर्व सेवा करत होते. दोन्ही टाईम मी स्वामींची सेवा न चुकता करत होते. तसेच जर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक देखील करत होते. हे माझं सर्व न चुकता चालू होतं. तरीही मला काहीच फरक येत नव्हता स्वामींची प्रचिती येत नव्हते. तशातच आई वारल्या त्यामुळे माझा एक आधारच गेला त्यावेळेस मग मी मात्र खूपच खचले.

घरात खूप वाईट कंडिशन आली. घरातील सर्व सोने विकले तरीही आमचे वाईट दिवस गेले नाहीत. त्यावेळेस मग मात्र मला खूपच राग आला आणि मी स्वामी खोटे आहेत युट्युब चे व्हिडिओ सर्व खोटे आहेत. स्वामी तुमची काहीच प्रचिती नसते. तुम्ही या जगात नाही असे वाईट मी खूप स्वामींना बोलले आणि स्वामींची ची मूर्ती होती ती कापडात गुंडाळून  मी कपाटामध्ये ठेवून दिली.

कारण माझा असा समज झाला की, स्वामींना घरी आणलं आणि त्यानंतरच अतिशय वाईट दिवस सुरू झाले आहेत.  असेच ते पाच दिवस गेले आणि माहिती नाही काय झालं त्या गुरुवारी अचानक मिस्टरांना जॉब साठी एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीतून कॉल आला आणि पुढच्याच गुरुवारी मी प्रेग्नेंट असल्याची पुन्हा एकदा मला गुड न्यूज भेटली. असेच काही गुरुवार गेले आणि प्रत्येक गुरुवारी मला काही ना काही प्रचिती यायला लागली.

माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले की प्रत्येक गुरुवारी असा कसा चमत्कार होऊ लागला आहे. सर्व व्यवस्थित चालू लागलं. एके दिवशी एक साधू आमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. तेव्हा ते मला म्हणाले की, आम्हाला मोकळं करा. आम्हाला बाहेर आणा. मला ते साधू काय म्हणतायेत हे काहीच कळेना. त्यावेळेस मला एक कॉल आला आणि मी फोन घेण्यासाठी आत मध्ये आले आणि अगदी दोन मिनिटाचाच टाईम होता. जेव्हा मी आतून बाहेर आले त्यावेळेस साधू मला कोठेच दिसेनात. त्यावेळेस मी आजूबाजूला चौकशीही केली. परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी कोणते साधू आले नाहीत असे सांगितले.

तेव्हा मी विचार करू लागले की, असं कस काय झाले. दिवसापासून मला सततच स्वामी दिसू लागले. म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये, दिव्यामध्ये, चपातीवर अशा बऱ्याच ठिकाणी मला स्वामी दिसू लागले. मग त्यावेळेस मी स्वामींना कपाटात ठेवलं त्यामुळे मी खूपच रडू लागले आणि मग मी स्वामींची मागे माफी मागितली.

त्या दिवशी गुरुवारी मी मानाने स्वामींना पुन्हा घरात आणलं. त्यांचा अभिषेक करून त्यांची प्रतिष्ठापना पुन्हा माझ्या घरामध्ये केली आणि तेव्हापासून मी स्वामींची अगदी मनापासून सेवा करू लागले आणि जिवापेक्षाही जास्त मी स्वामींना जपू लागले. मित्रांनो आपल्या प्रत्येक अडचणीतून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्या अडचणीमध्ये स्वामी खरंच धावून येतात. याची प्रचिती मला मिळाली.

आपल्या प्रत्येक गोष्टीत मदत करतात. कधी कधी परीक्षेचा काळ असतो फक्त आपण टिकून राहणं हे खूपच महत्त्वाच आहे हे मला खरंच अनुभवातून शिकायला मिळालं.

तर मित्रांनो अशा प्रकारे असा हा ताईंचा अनुभव आपण त्यांच्या शब्दात जाणून घेतला. ताईंना देखील त्यांच्या अडचणीतून बाहेर स्वामींनीच काढलं. फक्त आपणाला थोडा वेळ स्वामींना द्यावा लागतो. परंतु आपल्याला सर्व अडचणीतून बाहेर ते नक्की काढतात. आपल्या अडचणी या त्यांच्या होतात. प्रत्येक संकट ते आपल्यावर ओढवून घेतात. हे मात्र आपणाला खरंच या ताईंच्या अनुभवातून नक्कीच जाणवलं असेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *