मित्रांनो, आपल्या इंद्रियांपैकी डोळे हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. याची व्यवस्थित काळजी घेणे खूपच गरजेचे असते. अनेक वेळा डोळ्यांवर अति ताण पडल्यामुळे आपणाला खूपच त्रास सहन करावा लागतो. खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा, सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे. लवंग आपल्या घरामध्ये असतेच. याने तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहुयात.
मित्रांनो प्रतिकारशक्ती कमी होणे, अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व साठतात. जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते. पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते. तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो आपनाला एक कप पाणी उकळवून घ्यायचे आहे. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायच आहे. या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे.
आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे. रांजणवाडीची सूज, वेदना, जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होतील आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल. त्याचबरोबर लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते. मित्रांनो दुसरा महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची आहेत. व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या. व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा.
त्यानंतर एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे आणि थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका.परत दुसरे पान घ्या. ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा. असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा. असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा. अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज, वेदना आणि जळजळ थांबणार आहे. रांजणवाडीमुळे डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे. यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल.
मित्रांनो हे घरगुती उपाय करा. परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ, साखरेचे पदार्थ, मांसाहारी, चरबीयुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी, चहा, अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा. मित्रांनो तुम्हाला नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे, धान्य,भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा. आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच तुम्हाला होणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.