पुणे येथे घडला मोठा स्वामीचमत्कार! स्वामिनी दिली दिव्य प्रचिती; स्वामी भक्तांला आलेला थरारक स्वामी अनुभव ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी आहेत. अगदी आपण मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न असतो. कारण स्वामी हे प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात असा विश्वास आपल्याला प्रत्येकालाच असतो. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. तर असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव पुणे येथील रवींद्र पाटील यांना आलेला आहे आणि हा अनुभव इतका दिव्य आहे की या अनुभवामुळे आपल्या देखील अंगावर नक्की शहारे येणारे आहेत. तर आपण आज त्यांच्याच भाषेमध्ये त्यांचा हा स्वामींचा दिव्य अनुभव जाणून घेणार आहोत.

 

नमस्कार मी रविंद्र पाटील. मी पुण्याच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये नोकरीला होतो आणि माझी त्यावेळेस icu मध्ये ड्युटी होती आणि एका रात्री इतका थरारक मला अनुभव आला की त्या दिवशी अचानक संध्याकाळी एक अक्सिडेंटची केस आली आणि तो एक्सीडेंट इतका मोठा होता की त्या तरुणाला इतक्या खूपच इजा झालेली होती म्हणजे त्याच्या बरकड्या खूपच विस्कळीत झालेल्या होत्या. डोक्याला मार लागलेला होता. फक्त त्याचा श्वास चालू होता.

 

ती एक्सीडेंट ची केस समोर आल्यानंतर आम्ही सर्वजणच खूपच घाबरलेलो होतो. कारण त्या तरुणांमध्ये आता काहीच राहिलेले नव्हतं. कारण त्याची कंडिशन खूपच क्रिटिकल होती आणि त्याचा फक्त श्वास चालू होता आणि त्यावेळेस आमच्या सीनियर डॉक्टरांनी देखील आम्हाला सांगितलेलं होतं की त्या तरुणांमध्ये आता काहीच राहिलेलं नाही. नंतर त्या तरुणाला आम्ही व्हेंटिलेटर वर ठेवलेलं होतं. त्यांच्या कुटुंबीयातील सर्वजण आम्हाला आमच्या मुलाला वाचवा असे म्हणत होते आक्रोश करत होते विनवणी करत होते.

 

परंतु आम्ही फक्त त्यांना आधार देत होतो की सर्व काही ठीक होईल. परंतु आम्हाला देखील माहिती होतं की त्या तरुणांमध्ये आता काहीच राहिलेलं नाही. फक्त त्याचा श्वासच फक्त चालू होता आणि तो श्वास कधी बंद पडेल हे कोणालाच माहिती नव्हतं. नंतर नातेवाईकांनी आपल्या स्वामीचा धावा सुरू केला. म्हणजे स्वामींना प्रार्थना केली की आमच्या मुलाला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढा.

 

नंतर हा तरुण icu मध्येच होता. व्हेंटिलेटर वरच ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस एक अचानकच एक आजोबा माझ्याजवळ आले आणि त्या तरुणाला भेटायचं आहे असे म्हणाले. त्यावेळेस मी त्या आजोबांना म्हणालो की आजोबा त्या तरुणांमध्ये आता काहीच राहिलेलं नाहीये तो शेवटची घटका मोजत आहे आणि तुम्ही त्याला भेटू शकणार नाही. त्यावेळेस ते आजोबा मला खूपच रागावले आणि म्हणाले की तू कोण आहे त्याची शेवटची घटका मोजणारा? मला त्याला भेटायचं आहे.

 

असे म्हणून आजोबांनी मला बाजूला सरकावले आणि त्या तरुणापाशी गेले. मी ते लांबूनच पाहत होतो की त्या आजोबांनी त्या तरुणांच्या डोक्यावरून हात फिरवला. संपूर्ण शरीरावरून नंतर हात फिरवला आणि नंतर ते लगेच बाहेर गेले. मी आजोबांना पाहतो न पाहतो तर आजोबा कुठेच मला नंतर दिसले नाहीत. नंतर मग मी त्या तरुणापाशी थोड्यावेळाने आलो आणि एक अर्धा तासांनी त्या तरुणाचे सर्व काही बंद पडलेले शरीर होते ते पुन्हा नव्याने चालू झालं आणि सर्व जे काही ठोके हृदयाचे होते ते देखील आपोआप चालू झाले.

 

त्यावेळेस नंतर मी सिनिअर डॉक्टरांना बोलवले आणि त्यांनी देखील चेकअप केलं तर हा एकच चमत्कारच वाटला. कारण जे शरीर, ज्या बरकड्या त्याच्या व्यवस्थित साथ देत नव्हते ते सर्व काही शरीर साथ देत होतं. नंतर घरच्यांना त्यांच्या सांगण्यात आलं. त्यावेळेस सर्वजण खूपच खुश झाले आणि हे सर्व काही स्वामींची कृपा आहे असे म्हणाले आणि स्वामींचा जयजयकार करू लागले. त्यावेळेस मला दवाखान्यात असल्यासारखे असे वाटतच नव्हते. मी एखाद्या स्वामींच्या मठात आहे की काय असं वाटत होतं.

 

माझा देवावर जास्त मी विश्वास ठेवत नव्हतो. नंतर माझे खूपच विचार चक्र चालू होते. कारण जो तरुण शेवटचे घटका मोजत होता आणि तो एकदम अचानक असा बरं होणे या मग काहीतरी रहस्य आहे असं वाटतं होत आणि नंतर मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझ्या डोक्यात तेच विचार येऊ लागले आणि त्यावेळेस हा डोक्यात विचार आला की त्या दिवशी आजोबा आलेले आणि आजोबा येऊन गेल्यानंतरच हा चमत्कार घडला आहे.

 

नंतर मी सकाळ होण्याची वाट पाहिली आणि सकाळ झाल्यानंतर मी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तर त्या कॅमेरा मध्ये काहीच दिसले नाही. म्हणजे ते आजोबा कुठे दिसत नव्हते आणि त्यावेळेस मात्र मला खूपच चमत्कारच वाटला आणि मी नंतर त्या तरुणाच्या नातेवाईकांशी बोललो आणि त्यांना म्हणालो की, तुमचे कोण नातेवाईक म्हणजे आजोबा वगैरे होते का आणि ते या तरुणाला भेटायला आले होते.

 

त्यावेळी त्यांच्या नातेवाईकाने सांगितले होते की आम्ही सर्व नातेवाईक तर इथे दवाखान्यातच आहोत आणि त्या तरुणाची आजी आजोबा तर नाहीतच. त्यावेळेस मात्र मला खूपच आश्चर्य वाटले आणि मी त्यांना सांगितले की त्या दिवशी आजोबा भेटायला आले होते आणि त्यानंतरच तुमच्या मुलग्यामध्ये फरक झाला. त्यावेळेस त्या मुलग्याची आई म्हणाली की हे तर माझे स्वामीच होते.

 

स्वामींनीच माझ्या मुलाला वाचवले आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी भेटायला आलेले हे माझे स्वामीच असणार व त्यावेळेस माझा मात्र स्वामी वरचा विश्वास अतुट झाला. कारण त्यावेळेस मला ते आजोबा म्हणाले होते की त्या तरुणाची शेवटची घटका मोजणारा तू कोण आणि हेच वाक्य माझ्या सतत काणी पडू लागले आणि खरंच मी तेव्हापासून मात्र स्वामीवर विश्वास ठेवला आणि तेव्हापासून मी देखील स्वामींच्या सेवेमध्ये आलो. कारण त्या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे फक्त स्वामी होते. कारण स्वामींनी त्यांच्या भक्तांची हाक ऐकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *