श्रावण मास संपण्याअगोदर हे १ फुलं कुठे दिसले तर अजिबात सोडू नका, हे फुलं कितीही कठीण इच्छा पूर्ण करेल….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आताच काही दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिना म्हटला की भगवान महादेव यांचा महिमा आलाचं. भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरीत प्रसन्न होतात. आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात. श्रावन महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण, यावेळी जर का पूजा करतांना चूक झाली तर त्याचाही विपरीत परिणाम होतो.

 

श्रावण हा असा महिना आहे जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीला वरदान दिले होते की, मी तुला आपली पत्नी म्हणून स्विकारील आणि जो कोणी या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याच बरोबर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी व आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत की जो उपाय केल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील

 

वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.

 

गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख-शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूची कृपा मिळते, माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते, असे मानले जाते.

 

यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. गोकर्ण फूल घरामध्ये वास्तु नियमानुसार लावावे, तरच त्याचे फायदे मिळतात. वास्तु शास्त्रानुसार गोकर्ण, उत्तर, ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडिया मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते.अशाप्रकारे या गोकर्णचे काही महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर आपल्याला हे गोकर्णचे फुल दिसले तर ते अजिबात सोडू नका.

 

कारण यामुळे आपले सर्व समस्या दूर होण्याची ताकद या फुलांमध्ये आहे. त्याचबरोबर जी काही आपल्या आर्थिक समस्या असेल तर तीही निघून जाते. घरामध्ये ज्या काही पैशाच्या संबंधित समस्या असतील तर त्या गोकर्ण चा उपाय केल्यामुळे निघून जातात. जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये हे फुल दिसले असेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा श्रावण सोमवारी जर हा उपाय केला तर खूपच चांगले होईल. अशाप्रकारे जर तुम्हाला हे गोकर्णचे निळ्या रंगाचे फुल दिसले तर ते आपण तोडून आणायचे आहे आणि घरामध्ये आपल्याला एक कलशाचा तांब्या घ्यायचा आहे.

 

त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. त्या पाण्यात 21 काळे तीळ आपल्याला घालायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध घालायचे आहे व हे गोकर्णचे फुल यात घालायचे आहे आणि दोन अगरबत्ती घेऊन या कलशाचे पाणी घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय आपल्याला शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे. हा उपाय तुम्हला घरात करता येणार नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम आपण ज्या दोन अगरबत्ती घेऊन गेलेला आहे त्या प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर या कश्यातील पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे.

 

आणि हे गोकर्णचे फुल थोडेसे पाण्यामध्ये बुडवून ते शिवपेंडीवर अर्पण करायचे आहे. तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याविषयीची महादेवांना प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर जे तुम्ही अर्पण केलेले गोकर्णचे फुल घ्यायचे आहे व घरी यायचे आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे धन ठेवत असाल त्या ठिकाणी हे फुल ठेवायचे आहे. तुमच्या ज्या काही धनासंबंधीच्या अडचणी असतील त्या सर्व निघून जातील.

 

अशा प्रकारे हा प्रभावी असा एक उपाय आहे नक्कीच तुमच्या सर्व समस्या निघून जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *