पूजेच्या दिव्यात फुल का बनते? त्या फुलाचे काय करावे? आणि अश्याच लोकांच्या घरी दिव्यात बनते फुल ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण जी काही देवाची आराधना करतो. देवाची पूजा करत असतो. व्रतवैकल्य करत असतो. हे सर्व आपण अत्यंत भक्तीने आणि मनोभावाने करत असतो. परंतु हे करून आपल्याला असे वाटत असतील की, ही आपली पूजा देवापर्यंत पोहोचते का नाही? असे सर्वांनाच वाटत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करण्यामध्ये दिव्याला खूप मोठ स्थान आहे. दिवा लावल्याशिवाय आपण कोणतीही पूजा अर्चा करत नाही .

 

दिवा लावल्याशिवाय केलेली पूजा ही मान्य ही होत नाही. कारण दिवा हा प्रत्यक्षात अग्नीदेवता असतो. आपली ही सेवा फलित होत आहे की नाही याचे उत्तर ते तो दिवा देत असतो. या दिव्यांमध्ये काही वेळेस आपल्याला फुल तयार झालेले दिसते. हे फुल नेमके आपल्याला काय सांगत असते व हे कोणाच्या घरी होते त्याचबरोबर या फुलाचे काय करावे? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

कधी कधी काही जणांच्या बाबतीत असे होते की, आपण जो दिवा देवासमोर लावतो त्या दिव्यामध्ये एक फुल तयार होतं. हे फुल काही वेळेस गुलाबाचे असू शकते किंवा काही वेळेस कमळाचे देखील असू शकतात. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही. जे लोक मनापासून श्रद्धा करतात. पूजा करत असतात. त्यांच्या बाबतीत ही घटना घडून येते.

 

आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्याला एक काजळी निर्माण होते. या काजळीतच फुलाचा आकार तयार होतो. याचा अर्थ असा होतो की, आपण जी सेवा करत आहोत जी भक्तिभावाने पूजा करत आहोत ती देवापर्यंत पोहोचत आहे आणि साक्षात अग्नी देवता तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. की तुम्ही केलेल्या पूजेचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. यामध्ये यश तुम्हाला मिळणार आहे.

 

हे असे प्रत्येकाच्या बाबतीत घडते असे नाही व ही गोष्ट किंवा हे दिव्यात तयार होणारे फुल रोजच घडेल असे देखील काही नाही. काहींच्या बाबतीत ते रोज घडते तर काहींच्या बाबतीत एक दिवस आड, दोन दिवस आड किंवा महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा असे घडत असते. याचा अर्थ असा मानला जातो की, जी काही आपण मनोभावे सेवा करत आहोत, पूजा करत आहोत, व्रतवैकल्य करत आहोत हे सर्व देवापर्यंत पोहोचत आहे.

 

आणि त्याचा संकेत हा आपल्याला मिळत आहे. हे फुल तयार झाल्यानंतर याचे काय करावे? असा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर ज्यांच्या घरामध्ये असे फुल तयार होते त्यांनी हे फुल म्हणजेच ही काजळी काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हळद, कुंकू व त्या दिव्यातील तेल घालायचे आहे. हे सर्व मिक्स करून आपण कोणत्याही चांगला कामासाठी जर बाहेर जात असाल किंवा घरातील एखादी व्यक्ती घरातून कोणते तरी चांगले काम करण्यासाठी बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला हा मिश्रणाचा टिळा लावावा.

 

किंवा घरातील सर्व व्यक्तींनी देखील या मिश्रणाचा टिळा लावला तरी देखील चालू शकतो. हा टिळा म्हणजे साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो की, जो सांगत असतो की हा तुमच्या कामांमध्ये यश येणार आहे. तुमच्या घरात धन धान्याची बरकत होणार आहे. घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन घरात सकारात्मक शक्तींचा प्रवेश होणार आहे. तुमच्या घरातील सर्व बाधा दूर होणार आहेत. भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावर होणार.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये जर हे दिव्यामध्ये फुल तयार होत असेल तर, त्या फुलाच्या काजळी काढून त्याचा टिळा लावावा. नक्कीच भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील व तुम्हाला सर्व कामांमध्ये येईल.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांची माहिती घेण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *