मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरतात. तर बऱ्याच वेळा या वनस्पतींचा फायदा आपल्याला माहिती नसल्याकारणाने आपण याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजेच अनेक घरगुती उपाय करणे आपण टाळाटाळ करतो आणि मग आपणाला दवाखान्यात खूप सारा पैसा हा खर्च करावा लागतो. परंतु असे काही घरगुती उपाय जर आपण केले तर यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदा होतो आणि आपली ती समस्या देखील नक्कीच लवकरात लवकर कमी देखील होते.
तर आज मी तुम्हाला कंबर दुखी, गुडघेदुखी तसेच जर तुम्हाला खाज खुजली असेल दात दुखी असेल तर या सर्वांवरती आपल्या आसपास असणारी एक वनस्पती खूपच फायदेशीर ठरते. म्हणजेच याचा वापर तुम्ही जर केला तर यामुळे तुमचे जे काही आजार आहे ते नक्कीच पूर्णपणे कमी होणार आहेत. तर हे उपाय करण्यासाठी आपल्याला नेमके काय करायचे आहे याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.
तर मित्रांनो आपल्या परिसरामध्ये तुम्ही झेंडूचे झाड हे पाहिलेच असेल आणि झेंडूची फुले ही आता दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये खूपच याची मागणी होत असते आणि देवपूजे मध्ये आपण झेंडूच्या फुलांचा वापर देखील करतो. तर झेंडू हे झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. तर या झेंडूच्या झाडाचे फुल, फळ, पान याचा खूपच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होतो.
जर तुमचे हात पाय फुटत असतील तर तुम्ही झेंडूच्या पानांचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे व्ह्यस नील मिक्स करून आपल्या हातापायांना जर लावला तर तुमचे हात पाय फुटत आहेत त्यापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळतो आणि हात पाय आपले कोमल देखील होतात.
तसेच तुम्ही दहा ग्रॅम झेंडूचे पाने घ्यायचे आहेत. तसेच दोन ग्रॅम काळीमिरी घ्यायची आहे आणि हे दोन्हीही तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजेच झेंडूची पाने आणि काळीमिरी बारीक एकदम करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि तुम्ही याचा वापर जर तुम्हाला मुळव्याध झाला आहे यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. बवासीर तुमचा नक्कीच कमी होईल.
तसेच मित्रांनो झेंडूची ज्या बिया आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला समप्रमाणातच खडीसाखर मिक्स करायची आहे आणि खडीसाखर आणि बिया चे जे आपण मिश्रण बारीक केलेले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक चमचा पाण्याबरोबर म्हणजेच एक ग्लास पाण्याबरोबर एक चमचा असे तुम्ही दोन-तीन वेळा दिवसभरात जर पिला तर यामुळे तुमची सर्दी खोकला दमा याचा त्रास नक्कीच कमी होतो.
तसेच तुम्हाला जर कानामध्ये खूपच त्रास होत असेल म्हणजे कानामध्ये दुखत असेल तर तुम्ही झेंडूच्या पानांचा रस करून जर कानामध्ये घातला तर तुमची कान दुखी नक्कीच कमी होईल. तसेच तुम्ही झेंडूची पाने घेऊन ते पाण्यामध्ये उकळवायचे आहेत आणि उकळल्यानंतर या पाण्याने तुम्ही जर गुळण्या केल्या तर तुमची दात दुखीची समस्या आहे ही देखील नक्कीच कमी होणार आहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही झेंडूच्या पानांचा अशा पद्धतीने वापर केला तर तुमच्या या सर्व समस्या नक्कीच दूर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही असे घरगुती उपाय अवश्य करून पहा.