मित्रांनो एक चमचा दूध अशा पद्धतीने आपण वापरायचे आहे की त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग हे दूर होतील, काळा पडलेला चेहरा गोरा, पांढरा शुभ्र आकर्षक दिसेल. त्यामुळे साहजिकच आपल्याला एक वेळ पाहून पुढे जाणारे लोक नक्कीच मागे वळून पाहतील. हो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपला चेहरा स्वच्छ व सुंदर तसेच तजेलदार फ्रेश राहण्यासाठी अत्यंत साधा व घरगुती उपाय.
मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असतं की आपण सुंदर दिसावं. खास करून या बाबी युवती, महिला, लहान मुली यांना या गोष्टीचा खूप आकर्षण असतं. त्याचबरोबर अनेक तरुणांचे देखील याबाबत विशेष प्रयत्न असतात. आणि मित्रांनो या सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण चेहऱ्याला काही ना काही लावत असतो. पण यामुळे यातील काही विषारी तसेच घातक पदार्थांमुळे आपल्या चेहऱ्याचे सुंदर दिसण्याऐवजी मोठे नुकसान होते. आणि काही दिवसांनी आपली त्वचा आणखी काळी पडते.
मित्रांनो चेहऱ्यावर डाग उठण्याला किंवा चेहरा काळा दिसण्याला अनेक करणे असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने काही मंडळींचे उन्हात फिरणे, रस्त्यावरील धूळ, त्याचबरोबर सतत ताणतणावाची जीवन अशा देखील गोष्टी कारणीभूत ठरतात. याचबरोबर वारंवार चेहऱ्याला हात लावल्याने देखील आपल्या चेहऱ्याची त्वचा काळी पडत असते. तर मित्रांनो प्रामुख्याने अशा सर्व गोष्टी होईल तितक्या टाळाव्यात. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.
तर मित्रांनो ही झाली आता चेहऱ्याची घ्यावयाची काळजी. याशिवाय मित्रांनो ज्या काही मंडळींना चेहऱ्यावर विविध प्रकारचे डाग असतात, वांग असतात. तर काही मंडळींना अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे चेहऱ्यावरच मानेवर काखेत तसेच अन्य इतर भागावर घाण साचून राहते आणि तो भागही काळा पडतो. तर मित्रांनो अशा सर्व बाबीसाठी उपयोगी पडेल आणि खास करून आपला चेहरा गोरा दिसेल असा घरगुती उपाय आपण आता जाणून घेऊया…
मित्रांनो यासाठी आपणाला लागणार आहे ते म्हणजे एक चमचा कच्चे दूध, अर्धा चमचा लिंबूचा रस, अर्धा चमचा बेसन पीठ, आणि अर्धा चमचा हळद. मित्रांनो या सर्व वस्तूंचे वेगवेगळे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत की ते कार्यरत झाल्यामुळे आपल्या शरीराला त्याच्या पद्धतीने उपयोगी ठरतात. आता या सर्व वस्तूंचे विषयांतर न पाहता करावयाची कृती हे पाहू…
मित्रांनो सुरुवातीला यासाठी एका छोट्याशा भांड्यामध्ये एक चमचा दूध घ्यावे यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस घालावा त्यानंतर अर्धा चमचा बेसन पीठ घालावे आणि शेवटी या तीन वस्तू एकत्र केल्यानंतर हळद अर्धा चमचा घालावी. त्यानंतर या चारही वस्तू एकत्र करून घट्ट एकजीव होण्यासारखे मिसळून घ्यावे.
आणि यानंतर जो लेप तयार होईल तो आपल्या चेहऱ्यावर तसेच ज्या ठिकाणी आपणाला आपला शरीरावरील त्वचेचा काळा भाग झाला आहे असे वाटते त्या ठिकाणी लावावे. हा लेप आपल्या चेहऱ्यावर साधारणपणे अर्धा तास होईल इतका वेळ लावून ठेवावा. आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवावा. मित्रांनो हा उपाय आपल्याला आठवड्यातून तीन दिवस या पद्धतीने दोन महिने तरी करावयाचा आहे.
मित्रांनो या घरगुती उपायामुळे आपल्या चेहऱ्यावरील तसेच अंगावरील काळवटलेली जुनाट त्वचा दूर होऊन आपली त्वचा गोरी दिसेल. मित्रांनो हा उपाय अत्यंत साधा व सोपा आणि घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंवरच सहजरीत्या करता येत असल्याने आपण नक्की करून पहावा आपल्याला नक्कीच याचा फरक दिसून येईल हे आम्ही खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.