सुकलेल्या तुळशीला मोजून फक्त आठ दिवसात या उपायाने १००% हिरवेगार होईल?

Uncategorized

मित्रांनो, आपला प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणात तुळशी असते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला खूप मोठी स्थान आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रामध्ये देखील या तुळशीला खूप मोठे स्थान आहे. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्यामुळे आपल्या घराच्या आसपास असणारी हवा तुळस शुद्ध करत असते. घरामध्ये कोणताही प्रकारचे जीव जंतू या तुळशीमुळे प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये या तुळशीला देवीचे स्थान आहे.

 

अशी मान्यता आहेत आणि ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. जर कोणती नकारात्मक शक्ती घराजवळ आली तर ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि जर असे होत असेल तर त्या घरातील तुळस सूकत असते. जर अशी तुळस सारखी सारखी सुकत असेल तर काही उपाय मुळे तिला पुन्हा हिरवीगार करता येते. त्याची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

तुळशीमध्ये खूप असे घटक असतात की ज्यामुळे ती कोणत्याही प्रकारची जीव जंतू आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही. त्याचबरोबर शास्त्रांमध्ये देखील तुळशीमध्ये असलेला शक्तीचे वर्णन केलेले आहे. ती जर तुळस सारखे सारखे सूकत असेल तर त्यात तुळशीची सूकलेली पाने व मंजुळा फेकून न देता ते काढून घ्यावी. व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. जर आसपास वाहते पाणी नसेल तर या तुळशीच्या सुकलेली पाने व काडी घेऊन ती जाळावी व ती राख तुळशीला खत म्हणून वापरता येते.

 

जर तुळस सुकलेली असेल तर तिला थोडेसे खरडून बघावे जेणेकरून ती जिवंत आहे की नाही हे कळते. जर त्यामध्ये थोडासा हिरवटपणा असेल तर ही तुळस जिवंत असते. अशा तुळशीला आपल्याला पुन्हा हिरवीगार करता येत. तुळशीचा जो भाग सूकलेला आहे तो काढून टाकावा आणि एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा हळद या प्रमाणामध्ये घेऊन ते व्यवस्थित मिक्स करावे व हे पाणी तुळशीला घालावे.

 

हे तयार केलेले पाणी आपल्याला पंधरा दिवसातून एकदा तुळशीला घालायचे आहे. त्यामुळे नक्कीच तुळस लवकरात लवकर हिरवेगार होईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण काड्या कट केलेल्या असतील त्या ठिकाणी हळद लावावी. यामुळे पुन्हा तुळस हिरवीगार होण्यास मदत होते. दुसरा उपाय म्हणजे चुना थोडासा पानांमध्ये मिक्स करावे तो व्यवस्थित रित्या मिक्स करावा आणि हे तयार झाले मिश्रण तुळशीला घालावे.

 

असे हे पाणी आपल्याला पंधरा दिवसातून एकदा तुळशीला घालायचे आहे. त्यामुळे देखील तुळस लवकरात लवकर बहरते. त्याचबरोबर आपण घरामध्ये दररोज चहा करतो त्या चहा केलेला भांड्यातील उरलेली चाय पत्ती ही व्यवस्थित सात आठ वेळा धुवून ती सुकवावी आणि ही सुकवलेली चहापत्ती तुळशीच्या रोपाच्या बाजूला खत म्हणून घालावे. यामुळे देखील तुळस लवकरात लवकर हिरवेगार होते.

 

अशा प्रकारे हे काही उपाय आहे की जे केला मुळे आपली तुळस लवकरात लवकर सुकलेली पुन्हा बहरते. हे उपाय एका वेळेस एकच करावे. सगळे उपाय एकदम करू नये. यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हे उपाय नक्की करून बघा. नक्की तुमच्या घरातील सुकलेली तुळस पुन्हा बहरेल. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *