मित्रांनो, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खुपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खुप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे.
आणि मित्रांनो याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. मित्रांनो घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरात सकारात्मक उर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. भांडण- तंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रकार ज्या गोष्टी सांगतात. त्या अगदी नित्यनेमाने फॉलो करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या दारात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते.
तुळशीची पाने छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो. कधीकधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो. म्हणजे तुळशीची पाने गळू लागतात. तुळस सुकू लागते. आणि जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण घरातील तुळस काही संकेत देत असते. तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया.
मित्रांनो सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नाही. सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. काही कारणास्तव तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण-तंटे किंवा काहीतरी नकारात्मक उर्जा येण्याची शक्यता असते. तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाका. त्याजागी नवी तुळस घरात आणून लावा. असं म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते. त्यामुळे तुळस सुकत असते. घऱातील तुळस काहीही न करता सुकत असतील तर लगेच काळजी घ्या आणि मित्रांनो काही जणांकडे काही केल्या तुळस टिकत नाहीत. कितीही नवी तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही. असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते.
मित्रांनो ज्या ठिकाणी दारिद्र्य, अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही. जर घरात खूप अस्वच्छता असेल तर आताच घराची स्वच्छता राखा. घरातील कलह मिटवून आनंदी आनंद आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खुप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात.
आणि मित्रांनो आपण अस ही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आणि मित्रांनो तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे.तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्य़ा समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. अस होत असल्यास, विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.