महादेवच्या पिंडीला स्पर्श करत असाल तर अनर्थ होण्यापूर्वी ही एक चुक टाळा नाहीतर ; महादेव होतील क्रोधित ! खूपच उपयुक्त अशी माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, सर्व देवांचे देव महादेव हे सर्व जगाचे निर्माते आहेत. महादेव आपल्या भक्तांमध्ये कधी भेदभाव करत नाहीत. एवढा मोठा राक्षसाचा राजा लंकापती रावण हा त्यांचा सर्वात मोठा भक्त होता. मित्रांनो जसे महादेव भोले म्हणून ओळखले जातात. त्यापेक्षा जास्त त्यांचा राग हा मोठा आहे. म्हणून आपण रोज त्यांचे दर्शन घेत असताना काही चुका केल्या तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात आणि भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना होय. या महिन्यात भोलेनाथ खुप लवकर प्रसन्न होतात. म्हणून या महिन्यात केलेली शिवाची पुजा अधिक प्रमाणात फलप्राप्ती देते.

मित्रांनो या महिन्यात केलेली महाकाल पूजा जास्त लाभ देते. कारण या महिन्यातील पूजा इतर महिन्यापेक्षा जास्त प्रमाणात पवित्र मानली जाते. पण मित्रांनो शिवलिंगाची ही पुजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण दयाळू शिव शंकर जसे आपल्यावर खुप लवकर प्रसन्न होतात. आपल्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे या चुकीची शिक्षा देण्यास महादेव कोणतीही गय करत नाहीत. परिणामी महादेव क्रोधीत होऊ शकतात. मित्रांनो महादेवाचे दर्शन घेताना काही चुका न करणे आवश्यक असते.

जर एखादा पुरुष, विवाहित असो वा अविवाहित असो शिवलिंगाला हात लावुन पुजा किंवा प्रार्थना केली तरी चालते. मित्रांनो असं केल्याने त्याचे विवाहित जीवन चांगल्या प्रकारे चालू लागते. कारण शिवलिंगामध्ये एक तेजस्वी ऊर्जा असते. ज्यामुळे पतीपत्नी मध्ये प्रेम वाढते. त्यांना संतती गुणवान होते. मात्र तेच अविवाहित मुलींनी याची काळजी घ्यावी कारण अविवाहित मुलींनी शिवलींगाचे दर्शन घेताना त्याला स्पर्श करू नये. त्याचबरोबर मित्रांनो धर्मशास्त्रानुसार आपण शिवलिंगाला स्पर्श करतो आणि त्याची पुजा करतो कारण त्याने आपल्या जीवनात आनंद आणि सुख सुविधांबरोबर संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.

त्याचबरोबर अविवाहित मुलींनी अशी प्रार्थना करणे चुकीचे आहे. अविवाहित मुली 16 सोमवार उपवास करू शकतात. तसेच त्या शिवलिंगाची पूजा करू शकतात. तसेच त्याना ऊचित वर मिळावे म्हणून प्रार्थना करू शकतात. पण जर त्यांनी शिवलिंगास स्पर्श केला तर त्यांच्या जीवनात उलथा पालथ होऊ शकते. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही एक काळजी अविवाहित मुलींनी घेतलीच पाहिजे. मित्रांनो अशा रितीने जर भगवान शिव शंकराची मनोभावे स्पर्श न करता पूजा केली तर ती मान्य व फलित होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *