मित्रांनो, तळ पायाला तेल लावल्याने बऱ्याच व्याधी कमी होतात. हे आपण ऐकलेच असेल. यामुळे दबलेली नस झटक्यात मोकळी होते. यासोबत बऱ्याच व्यक्तींना डोळ्याला चष्मा लागलेला आहे, त्यांचा चष्मा कमी करण्यासाठी हे तेल वापरा. त्यासोबतच दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी हे तेल दिव्य आहे. या तेलाने खूप आजार कमी होतात व स्मरणशक्ती वाढते. मानसिक ताण देखील कमी होतात.
रात्री चांगली झोप लागते व शरीर दुप्पट कार्यरत होते. या तेलाने नुसते तळ पायाला मालिश करून इतके फायदे होतात तर मग संपूर्ण शरीराला लावल्याने शरीर एकदम ताजेतवाने, निरोगी व सुंदर दिसण्यासाठी मदत होते.
अशा या तेलाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदामध्ये अभ्यंग करण्यासाठी किंवा शरीराला मालिश करण्यासाठी किंवा तळ पायाला तेल लावण्यासाठी, बेंबीत दोन थेंब टाकण्यासाठी तिळाचे तेल सांगितले आहे. बाकीचे कोणतेही तेल चालते परंतु तिळाचे तेल दिव्य आहे.
आपल्याला यासाठी तिळाचे तेल वापरायचे आहे. या तेलाने आपल्याला तळपायाला मालिश करायची आहे. मालिश करत असताना वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत मालिश करायची आहे.
अभ्यंग करताना संपूर्ण शरीराला वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत हे तेल लावायचे आहे. मालिश करताना आपल्याला दाबायचे आहे. आपल्या तळपायावर 38 एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत. या पॉइंटला दाबल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व नसांची कार्यशक्ती दुप्पट होते.
बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नसेल तर सकाळी टॉयलेटला बसल्यावर अंगठा मुठीमध्ये दाबून अंगठ्यावरील शिर दाबत रहा. असे केल्याने तुमचे पोट साफ होणारच. असे भरपूर एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत जे दाबल्यामुळे बऱ्याच व्याधी कमी होतात.
असा नियम आहे की तळपायाला किंवा शरीरातील कोणत्याही अंगाला मालिश करताना जेवणानंतर तीन तासाने करावे. परंतु काही अपवाद वगळता आपण हे लगेच करू शकतो.
हे करत असताना तेल लावल्यानंतर चांगल्या प्रकारे ॲक्युप्रेशर पॉईंट कडे लक्ष द्यायचे आहे. ज्यांचे वजन वाढलेले आहे अशा व्यक्तींच्या पायाला सूज असते त्यांनी अंगठ्याने ॲक्युप्रेशर करत राहायचे आहे. म्हणजेच तुम्हाला अंगठ्याने दाब द्यायचा आहे.
जेवढा दाब अंगठ्याने पडतो तेवढा इतर कोणत्या बोटाने पडत नाही. हे मालिश करत असताना पायांच्या बोटांना देखील मालिश करायचे आहे. हे करताना डोक्यामध्ये किंवा कानाच्या पाठीमागे गुदगुद झाल्यासारखं वाटेल.
मालिश करत असताना एकदम संत व सावकाश गतीने मालिश करा. जितक्या घाईने मालिश कराल तितक्या लवकर शरीर थकते. हे शरीर थकू नये म्हणून एक्यूप्रेशर पॉइंट्स हळू प्रेस करावे म्हणजेच दबावेत. असे केल्याने नसा मोकळ्या होतात. 72 हजार नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय अत्यंत दिव्य आहे.
हा उपाय प्रत्येक व्यक्तीने घरी करू शकता तर मित्रांनो असे दोन्ही पायांना केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल. बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर उत्साह वाटेल. स्मरणशक्ती वाढते. तसेच डोळ्यांची कार्यशक्ती देखील वाढते. तळपायाला मालिश केल्याने त्वचा फुटत नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.