मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामी भक्त आहोत स्वामींची सेवा आपण अगदी मनापासून करत असतो स्वामी आपल्याला कोणत्या संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत हे आपल्याला माहीतच आहे आपण संकटांना कधीही घाबरायचे नाही तर त्याला आपण उलट धैर्याने सामोरे जायचे आहे.कारण संकटांमधून बाहेर काढायला आपले स्वामी आपल्याला मदत करत असतात व काही झालं तरी आपण स्वामींना आपले सर्व अडचणी सांगतच असतो.
मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी काहीजण जप करत असतात मठामध्ये जात असतात वेगवेगळे उपवास करत असतात किंवा पारायण देखील करत असतात हे सर्व करून काहीजणांना त्याच्या अनुभव येतात तर काहीजणांना अनुभव येत नाहीत तर मित्रांनो असाच आज आपण एका ताईला आलेला अनुभव जाणून घेणार आहोत.
मित्रांनो मी आज तुमच्या सोबत त्या ताईंचा अनुभव शेअर करणार आहे त्या ताई दादर मधून आहेत आणि त्या ताईंचे नाव आहे प्रमिला आक्री मित्रांनो या ताई आहेत त्या लग्नापासून स्वामींची सेवा करतात. इतर लोक स्वामी सेवा करायला जाताना बघून मी देखील स्वामींची सेवा करायला जात होते मला स्वामींची कधी गोडी लागली हे समजलं नाही स्वामींची आवड मनामध्ये निर्माण होऊ लागले आणि मी स्वामींची सेवा करू लागले .
स्वामी सेवेमध्ये येऊन मला बरेच वर्षे होऊन गेली तरीही मला स्वामींची प्रचिती आलेली नव्हती मी फक्त ही सेवा करत होते कारण ही सेवा करताना मला एकदम शांत वाटत होतं. या सेवांमुळे माझ्या सर्व अडचणी देखील दूर झाल्या आहेत माझ्या घरी सर्व काही सुखाने व आनंदाने सर्व चालू होतं मात्र एके दिवशी माझा मुलगा हा खूप आजारी पडला अगदीच त्याचं दहावीचं वर्ष चालू होतं आणि त्याला खूप मोठा आजार झाला होता त्याला अनेक दवाखान्यामध्ये घेऊन गेलो भरपूर पैसे देखील खर्च केला.
गोळ्या इंजेक्शन खूप वेगवेगळ्या प्रकारचे दवाखाने देखील झाले तरी देखील त्याची तब्येत बरी झाली नव्हती त्याला अनेक बाबा साधुसंत असे वेगवेगळे प्रकारे जे लोक सांगतील ते मी माझ्या मुलासाठी केलो तरी देखील त्याचा फरक जाणवला नाही अगदी वाटेल तेवढे पैसे मी माझ्या मुलासाठी खर्च केले होते मात्र कशामध्येच मला फरक देखील जाणवला नाही आता काय करावं हे देखील मला सुचेना स्वामींची सेवा तर चालूच होती स्वामी सेवा स्वामी पारायण हे नेहमी करतच होते पण असं म्हणतात की स्वामी आयुष्यामध्ये येऊन आपली एकदा तरी परीक्षा घेतातच अगदी तसंच माझ्यासोबत देखील घडल.
स्वामी माझी परीक्षा घेत होते पण या परीक्षेमध्ये मी भरकटत होते दोन वर्षांमध्ये माझ्या मुलाचा त्रास हा काही कमी झाला नाही त्याला होता तसाच त्रास होत राहिला आणि मी रागामध्ये स्वामी सेवा सोडण्याचा विचार केला आठ दिवस मी स्वामींचे नाव घेतलं नाही की स्वामींची पूजा केली नाही स्वामींचा कोणता जप देखील नाही केला कारण इतकं करूनही माझ्यासोबत असं घडलं तर स्वामी सेवा करून उपयोग काय असं मला वाटलं मग स्वामी या जगामध्येच नाहीत असा माझा पूर्ण समज झाला होता
त्या दिवशी मी स्वामीं सोबत खूप भांडले देखील कारण स्वामी तुम्ही म्हणत असता की मी तुमच्या संकटामध्ये तुमच्या सोबत असतो आणि त्याचबरोबर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तुमचे तुम्ही फक्त म्हणता पण जर तुम्ही पाठीशी असतात तर आज हे सर्व घडलं नसतं असे बोलून मी स्वामींची भांडतच राहिले.
स्वामींची मूर्ती रागाने मी अगदी कापडात गुंडाळून कपाटामध्ये ठेवून दिलो आणि आठ दिवस झाले आठ दिवसानंतर माझा मुलगा अचानक सिरियस झाला आणि आठव्या दिवशी स्वामी चक्क माझ्या मुलाच्या रूपामध्ये येऊन ते माझ्याशी बोलत होते श्वास गुदमरतोय मला कपाटातून मोकळं कर मला त्या कापडामधून बाहेर काढ असं म्हणत होते.
मुलगा असं का म्हणतोय मला समजत नव्हतं अगदी सुरुवातीलाच मी घरांमध्ये सर्वांना सांगितलं पण घरामध्ये देखील कोणाला काही समजत नव्हतं पण नंतर मला आठवलं की स्वामींना मी कपाटामध्ये ठेवलेलं होतं आणि तेच स्वामी माझ्या मुलाच्या रूपामध्ये बोलत आहेत स्वामींना मी कपाटामध्ये ठेवलं होतं पण इथे श्वास माझ्या मुलग्याचा गुदमरत होता आणि मी लगेचच स्वामींना कपाटातून काढले व त्याच्यातून मुक्त केलं आणि पुन्हा एकदा देव्हाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली आणि त्याच दिवशी आमच्या घरामध्ये मला खूप वाईट अशा गोष्टी सापडल्या आणि अनेक करणी बाधा केलेली यासारख्या गोष्टी घरातून मला सापडत होत्या.
मला लगेच समजलं की आमच्या घरातीलच एका व्यक्तीने माझ्या मुलग्यावर अशी बाधा केली होती. आणि त्याच्यामुळेच त्याला इतका त्रास होत होता मी अनेक भडजीकडे देखील गेले पण त्याचा काही फरक जाणवला नाही शेवटी मला एका ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही जितके देवांना मानतात त्या देवांची तुम्हाला उपासना करायची आहे आणि ही उपासना अजून वाढवा आणि याच्या मधूनच तुम्हाला काहीतरी मदत होईल.
स्वामी समर्थ माझ्या डोळ्याच्या अचानक समोर आले मी रात्रंदिवससेवा पुन्हा करायला चालू केले अगदी एक महिना पूर्ण श्वासांसारखा मी स्वामींचा नाम जप करायला सुरू केले नुसता माझ्या तोंडामधून श्री स्वामी समर्थ हे वाक्य यायला सुरू झाले मी जप चालू केला मी पारायण चालू केले मी पूर्ण महिना जिथे काही करेल तिथे फक्त मी स्वामी स्वामीच करत होते आणि स्वामी सारांमृत पारायण देखील केले.
कारण माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला काहीही करायचं होतं आणि एक महिना झाला त्या दिवशी गुरुवार होता आणि पोर्णिमा देखील होते. त्याच दिवशी माझ्या घरामध्ये चाफ्याची फुले देखील पडली होती आणि चाफ्याची फुले ही स्वामींना खूप आवडतात हेही तेव्हा मला माहिती नव्हतं आम्ही कधी कोणतीच फुले स्वामी समोर ठेवत नव्हतो. माझ्या मिस्टरांना डार्क स्मेलचा सतत त्रास होतो.
त्याच्यामुळे मी घरामध्ये अगरबत्ती देखील लावत नाही पण त्यादिवशी चाफ्याची फुले घरामध्ये अचानकच पडली त्यावेळेस घरामध्ये सर्वांनाच काहीच समजेना काहीच कळायला मार्ग देखील दिसेना आणि ती फुले माझ्या मुलग्याचा डोक्याजवळ अगदी जास्त प्रमाणामध्ये होती आणि त्या दिवशी मग आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली आणि आमच्या सोबत आत्तापर्यंत जे काही घडलं ते सर्व मी त्या केंद्रामधल्या स्वामींना सांगू लागलो आणि तेव्हा केंद्रामधून आम्हाला असं समजले की ही फुले स्वतः स्वामिनी तुमच्यासाठी तिथे दरवाजामध्ये टाकली होती.
त्या दिवशी अगदी माझा मुलगा पूर्णपणे मरणाच्या दारामध्ये होता तो उठत नव्हता ज्या मुलाला भयंकर त्रास होत होता आणि तो उठून बसला व पहिल्यासारखे चालू देखील लागला व सर्वांशी बोलू लागला हसू लागला जसा तो पहिला होता तश्याच प्रकारे तो पूर्ण गोष्टी वागायला लागला आमच्या आयुष्यामध्ये ही जी गोष्ट घडली ती दसरा किंवा दिवाळीपेक्षा मोठी होती.
आम्हाला वाटले की पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला आणि काहीतरी पुन्हा हा आजार त्याला होईल म्हणून आम्ही खूप घाबरत देखील होतो. दुसरा दिवस उगवला आणि त्याचबरोबर आणखी कित्येक दिवस जरी गेले तरी माझा मुलगा आहे तसाच राहिला त्याला कोणताही आजार पुन्हा झाला नाही व त्याला कोणताही त्रास पुन्हा झाला नाही व तो आम्हाला दिसला देखील नाही स्वामी कृपेने आमच्या आयुष्यामध्ये हा मोठा चमत्कारच घडून आला होता खरं तर इतक्या दिवसांपासून मी जी सेवा करत होती ती सेवा आज फळाला आली असं मला वाटलं तर मित्रांनो असा होता माझा हा स्वामी अनुभव.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.