मित्रांनो शिव शंकर यांच्या पिंडीवर आपण बेलपत्र अर्पण करत असतो ते बेलपत्र आपण अर्पण करुन झाल्या नंतर केल्याने खायचे देखिल आहे. खाल्ल्यानंतर ना त्याचे काही फायदे देखील होणार आहे. शिवशंकर यांचा सोमवार हा वार आहे.wशंकरांना बेलपत्र खूप आवडते त्याचबरोबर त्यांना पांढरे फूल देखील खूप आवडते शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारचा व्रत देखील केला जातो
त्याच बरोबर सोळा सोमवार हा व्रत देखील केला जातो कारण सोळा सोमवार व्रत केल्यामुळे पाहिजे ती गोष्ट मिळून जाते काही इच्छा असतील तर त्या इच्छा देखील पूर्ण होऊन जातात तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी असतील किंवा समस्या असतील त्या समस्या देखील दूर होणार आहेत तर मित्रांनो शिवलिंग वर आपण केलेले बेलपत्र खाल्ल्याने नेमके काय घडते चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतील काहींच्या घरांमध्ये भांडण तंटे असतात तर काहींना नोकरीची समस्या असते किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीचे लग्न जमत नसेल तर तुम्हाला कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्याच तुम्हाला निवारण देखील होणार आहे तुम्ही हा बेलपत्र खाल्ल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जाणार आहेत.
मित्रांनो तुम्ही शिव मंदिरामध्ये जात असेल शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर ना तुम्ही बेलपत्र हे नक्की व्हायचे आहे बेलपत्र हे वाहिल्यामुळे महादेवांची आपल्यावर कृपा तर राहतील त्याचबरोबर आपण जे बेलपत्र पिंडीवर वाहतो ते पिंडीवर व्हायला नंतर म्हणजेच की अर्पण केल्यानंतर ना ते फक्त बेलपत्र राहत नाही तर तो श्री शिवशंकर महादेवांचा प्रसाद रुपी एक भाग होऊन जातो.
पिंडीवर वाहिले गेलेले बेलपत्र हे सहा महिने शिळे होत नाही असे देखील सांगितले गेलेले आहे पिंडीवरचे बेलपत्र तुम्ही पुन्हा काढून पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवल्यानंतर ते पुन्हा सहा महिने शिळे होत नाही असे देखील सांगितले आहे भारतामध्ये असे किती तरी ठिकाणी आहे तिथे शिवलिंग स्थापित केले गेलेले आहे तर तिथे आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी असा उपाय केला जातो.
शिव शंकरांना बेलपत्र अर्पण करण्याचे पौराणिक काळामध्ये कथा देखील सांगितले गेलेले आहेत तर ती कथा काहीशी अशी आहे.जेव्हा समुद्रमंथन सुरू होते त्या मंथनादरम्यान अमृत तर बाहेर येते त्याचबरोबर काही वस्तूंची निर्मिती देखील झाली होती त्यापैकी एका विषाची देखील निर्मिती झाली होती आणि ते विष चारी दिशांमध्ये पसरत जात होते.
पूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकर यांनी या विषला आपल्या कंठामध्ये धारण केले होते तेव्हापासून श्रीशंकरांना निलकंठ नाव देण्यात आलेलं आहे. या विषा मुळे श्री शिवशंकरांच्या अंगावरती तापमान वाढू लागले होते. त्यांचा संताप देखील होऊ लागला त्याचा परिणाम त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण होते त्यांच्या उष्णतेमुळे जळू लागले होते तेथे उपस्थित असणाऱ्या देवी देवतांनी एक सल्ला घेतला.
श्री शिव शंकरांना या विषच्या प्रभावापासून कसे वाचवले जाऊ शकते किंवा त्या काळामध्ये जे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी बेल पानाचा उपाय त्यांना सांगितला. तुम्ही महादेवांना जर बेलपत्र खायला दिले तर त्यांचा संताप कमी होणार आहे असे देखील सांगितले तेव्हापासूनच शिव शंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली.
तुम्ही जेव्हा पिंडीवर बेलपत्र अर्पण करता तेव्हा तुम्हाला आवश्यक एक तांब्या पाणी देखील त्याच्यावर घालायचे आहे याच्याने श्री शिवशंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तुम्हाला कायम एक गोष्ट लक्षात ठेवायचे तीन पानांचे एकत्रित असलेले बेलपत्र तेच तुम्हाला पिंडीवर अर्पण करायचे आहे बेलपत्राचा जो चिकना भाग असतो तोच तुम्हाला बेलपत्रावरती ठेवायचा आहे
तुम्ही एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे फाटलेले किंवा छिद्रे पडलेले बेलपत्र कधीही अर्पण करायचे नाही तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशी कधीही बेलपत्रे तोडायची नाही कारण सोमवार हा वार महादेवांचा असल्यामुळे तुम्हाला बेलपत्र तोडायचे नाही.
दुपारी बारा वाजल्यानंतर न देखील तुम्हाला बेल पत्र तोडायचे नाही.
बेलपत्राच्या झाडाला हात देखील लावायचे नाही असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिखित प्रमाणे सांगितले गेलेले आहे जर तुम्हाला हे सर्व माहीत असून देखील तुम्ही 12 नंतर जर बेल पत्र तोडत असाल तर त्याचे तुम्हाला पाप लागणार आहे.बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रक्त असत ते रक्त शुद्ध होऊन जात.
आपल्याला काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या समस्या देखील बेल पत्र खाल्ल्यामुळे दूर होऊ शकतात आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तरी आपण बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्या सर्व अडचणी तर दूर होतातच त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा देखील पूर्ण होऊन जातात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.