घरात दिसणारी पाल आपल्याला देते हे खास संकेत 99% लोकांना माहित नसलेली माहिती ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, पाली आपल्या घरात सर्वांच्याच घरामध्ये असते. आपल्या घराच्या भिंतीवर ती असते. ती करत असलेल्या क्रियांवरून आपल्याला आपल्या भविष्याचे काही संकेत मिळत असतात. असे स्वामी महाराजांनी सांगितलेले आहे. ते संकेत कोणते व पालीने कोणते हालचाल केल्यावर आपल्याला कोणते फळ मिळते व कोणता संकेत मिळतो? याबाबतचे सर्व माहिती आपण आजच्या या नक्की जाणून घेणार आहोत.

 

पाळ जी आपल्याला विविध रुपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देते. घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते. अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे.

 

पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुमचे घर आनंदाने भरून जाणार आहे. नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा. याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे. ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल.

 

त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही. असे दृश्य दिसल्यास नवीन घर किंवा दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा. जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल. असे ज्योतिष्याशास्त्रात सांगण्यात आले आहे. घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानले जाते.

 

याचा अर्थ असा की, लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे. पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे. असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. पाल रात्री घराच्या भिंतींवर जास्त हालचाल करतात. तिची पकड भिंतीवर मजबूत असते. पण ती अनेक वेळा खाली पडते.

 

वास्तुशास्त्रानुसार, जर पाल तुमच्या उजव्या हातावर किंवा पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे.

 

जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लाथ मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगले लक्षण मानले जात नाही. भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याच हे लक्षण आहे.

 

अशाप्रकारे पालीच्या हालचालीवरून आपल्या भविष्यातील काही शुभ अशुभ परिणामाचे संकेत ते आपल्याला देत असते. यावरून आपण येणारा काळात आपल्यावर कोणती अडचण येणार आहे हे लक्षात घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *