शनिदेव म्हणतात साडेसाती लागल्यावर जर एका क्षणात कोणाला कसे गरीब बनवतो, पहा? शनिदेव आणि माता लक्ष्मीची कथा?

Uncategorized

मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे. आजचे लेखक म्हणजे आपण शनिदेव वर माता लक्ष्मी यांची एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत.

 

असं म्हणतात की स्वर्गलोकांमध्ये एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होता. लक्ष्मी माता म्हणू लागली मी श्रेष्ठ आहे. तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की कोण श्रेष्ठ आहे. तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इमानदार राजाकडून त्यांचा न्याय करून घेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता. ते त्यांच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता. शनिदेव आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजा जवळ गेले आणि त्यांना त्यांची समस्य सांगितली. त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्ये है सिद्ध होत नाहीये की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा.शनिदेव आणि माता लक्ष्मीचे बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या धर्म संकटात अडकले.

 

त्यांना समजतच नव्हतं, की दोघांमध्ये मोठे कोणाला म्हणावं? जर शनि देवाला मोठे सांगितलं तर माता लक्ष्मी रुसेल आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल आणि जर शनि देवाला नाराज केलं, तर शनिदेव त्यांचा कोप करून माझा पूर्ण राज्य नष्ट करून टाकेल.राजासाहेब निर्णय देताना विलंब करत आहेत हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना एक महिन्याचा अवधी देऊन तिथून निघून गेले. त्यांनी सांगितलं की आम्ही एक महिन्यानंतर तुमच्याजवळ येऊ, तेव्हापर्यंत तुम्ही ह्या गोष्टीवर पूर्णपणे विचार करा. माता लक्ष्मी आणि शनिदेव परत गेल्यानंतर राजा हर्षवर्धनची झोप पूर्णपणे उडाली होती. ते प्रत्येक क्षणी फक्त ह्याच गोष्टीचा विचार करायचे की एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू? मी काय निर्णय देऊ? राजा हर्षवर्धन समोर खूप बिकट परिस्थिती होती.

 

त्यांना माहीत होतं की एकाला मोठे सांगितलं तर दुसरा नाराज होईल आणि त्यांच्यावर त्यांच्या राज्यावर खूप मोठा संकट येऊ शकतो. राजा हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती, पतीला अत्यंत चितेत पाहून राणीने विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त दिसत आहात. कृपया तुमचे जे काही दुःख असेल ते मला सांगावे. राजाने त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. राणीने राजाला एक मार्ग सांगितला हे बघा राजासाहेब तुम्ही स्वतः कोणालाही मोठा किंवा छोटा सांगू नका. त्यांच्या त्यांच्या जागेवरती दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये मोठा कोण आहे ह्या गोष्टीचा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक सोन्याचं आणि चांदीचं सिंहासन बनवा. दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. सोन्याचा सिंहासन तुम्ही तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला लावा. तर चांदीचा सिंहासन डाव्या बाजूला लावा. एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील, तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूचा आसन ग्रहण करतील. कारण माता लक्ष्मी ही माता स्वरूप आहे आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा ते तुम्हाला विचारतील, तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका. जेव्हा ते खूप जास्त विचारतील तेव्हा त्यांना म्हणा, की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच सांगितला आहे. मी काय उत्तर देऊ शकतो? राणी यशोमतीचे बोलणं राजाला पुरेपूर पटलं. दर्शक मित्रांनो एक महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारात आले. तेव्हा तेच घडलं जसं राणीने सांगितलं होतं.

 

माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहांसनावर विराजमान झाली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. जेव्हा त्यांनी दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे याबाबतीत राजाजवळ निर्णय मागितला, तेव्हा राजाने सांगितलं की तुम्ही दोघांनी स्वतःच तुमच्यामध्ये मोठा छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे. यामध्ये मी तुम्हाला काय सांगू शकतो? हे ऐकून शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले. माता लक्ष्मी राजाला म्हणाली हे पुत्र शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत . त्यामुळे तुमच्यावर खूप मोठा संकट येऊ शकतो. परंतु तू चिंता करू नकोस , मी नेहमी तुझ्या सोबत असेल. शनिदेव राजावर अशाप्रकारे कोपला की त्यांच्या राज्यावर भयंकर प्रमाणात दुष्काळ पडला. लोक उपाशीपोटी मरू लागले.

 

सर्व प्रजा पशुपक्षी हर्षवर्धन राजाच राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची अशी दशा पहावत नव्हती. एक वर्षानंतर राजाने त्याचा राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. आता राजा त्याच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघाले. एका पिशवीमध्ये राजाने काही दागिने हिरे बांधून घेतले. त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील. या वस्तू विकून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो. राजा राणी घरातून बाहेर निघाले होते की त्याच वेळेला मोठा वादळ आला चारही बाजूला अंधार झाला त्यामुळे ते त्यांचा रास्ता चुकले. त्यांना काही समजत नव्हतं की कोणत्या दिशेला जावे. तेव्हाच माता लक्ष्मी एका छोट्याशा कन्येचं रूप धारण करून तिथे येते आणि कंदीलाच्या मदतीने त्या दोघांनाही एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचवते. नंदीवर राजा आणि राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेली. आता राजा आणि राणी समोर समस्या ही होती, की ह्या नदीला पार कसं करावं? राजा आणि राणी या गोष्टीचा विचार करतच होते, की इतक्यातच शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तिथे पोहोचले.

 

राजाने नाविकाकडे नदी पार करून देण्याचा आग्रह केला. नाविक म्हणाला हे बघ भाऊ मी तुला त्या बाजूला पोहोचवू तर शकतो. परंतु माझी नाव खूप जास्त कमकुवत आहे. या नावेमध्ये एकदा फक्त एकच जण बसू शकतो.राजा म्हणाला ठीक आहे, एकेकालाच पोहोचव दुसऱ्या किनारी. प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवले. त्यानंतर राजाला घेऊन गेला. तिसऱ्या फेरीला त्या नाविकाने राजाची धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली. परंतु नाविक तर स्वतः शनिदेवच होता आणि म्हणूनच तो ती धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्यभागातूनच गायब झाला. आता तर राजाजवळ जे काही धन होतं, ते सुद्धा संपलं होतं. त्यामुळे आता त्याच्यावर अन्नाचं मोठे संकट आलं होतं. राजा हे सर्व देवाची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला निघाला आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजा जवळ गेले आणि त्यांना त्यांची समस्य सांगितली.

 

त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्ये है सिद्ध होत नाहीये की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा.चालत चालत राजा एका गावामध्ये पोहोचला, त्या गावातील लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचे काम करायचे. राजा सुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला. लक्ष्मी मातेच्या कृपेने राजाला जंगलामध्ये चंदनाचा बाग मिळाला. राजाने चंदनाची लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवले. आता तर राजाचा जीवन अतिशय सुख पूर्वक व्यतीत होत होता. राजा आणि राणी आनंदात आहेत, सुखी आहेत हे पाहून शनिदेवाने आणखी एक चाल चालली.एक व्यापारी होता जो त्या. गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यातनेऊन विकायचा. आज त्या व्यापाऱ्यांचा जहाज त्याच नदीकिनारी अडकला होता. त्याने जहाजाना काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जहाज हलण्याचं नावच घेत नव्हता. व्यापाऱ्याला काहीच कळत नव्हतं की आता काय करावे.

 

इतक्यातच शनिदेव एका ब्राह्मणाचा रूप धारण करून त्या व्यापाऱ्या जवळ आले आणि म्हणाले, हे व्यापारी तुझा जहाज चालू शकतो परंतु जर एखादी पतीव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर तुझा जहाज अगदी सहजरीत्या चालू शकतो. त्या व्यापाऱ्याने तसच केलं जस त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं. पूर्ण गावातील स्त्रियांना बोलावलं, सर्वस्त्रियांनी त्या जहाजाला स्पर्श केला. परंतु जहाज पुढे सरकला नाही. कोणीतरी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही. व्यापाऱ्याने त्याची काही माणसं त्या स्त्रीच्या घरी, म्हणजेच राजाच्या घरी पाठवले. व्यापाऱ्याने जेव्हा त्याची माणसं राजाच्या घरी पाठवली, तेव्हा रणी यशोमतीने तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितलं, की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला व्यापाऱ्यानै जेव्हा त्याची माणसं राजाच्या घरी पाठवली, तेव्हा राणी यशोमतीने तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितलं, की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे. मी तुमच्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. व्यापाऱ्याच्या माणसांनी परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली. व्यापाऱ्याला समजलं की हीच ती स्त्री आहे जी पतिव्रता आहे आणि हीच स्त्री माझा जहाज पुन्हा चालवू शकते.

 

जी पतिव्रता आहे आणि हाच स्त्री माझा जहाज पुन्हा चालवू शकते. संध्याकाळी पुन्हा त्या व्यापाऱ्याने त्याची माणसं यशोमतीच्या घरी पाठवली. तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याचा निमंत्रण स्वीकार केला. जेव्हा व्यापाऱ्याने राणीला सांगितलं, की तुम्ही जहाजाला स्पर्श करा ज्यामुळे आमचा जहाज चालू शकेल. तेव्हा राणीने पतीची अनुमती घेऊन जहाजाला स्पर्श केला. राणी यशोमतीचा स्पर्श होताच, जहाज चालू लागला. हे पाहून व्यापाराच्या मनामध्ये पाप निर्माण झाला. त्याने विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेतलं तर माझा खूपच फायदा होईल. ही स्त्री खूपच सुंदर आहे आणि जर माझा जहाज पुढे कुठे अडकला तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हां तिथून तो काढू शकतो. असा विचार करून व्यापाऱ्याने यशोमतीला त्याच्या जहाजामध्ये ओढले आणि जहाज घेऊन तिथून निघून गेला. राजा हर्षवर्धन फक्त ओरडत होता, परंतु तेवढ्यात तो जहाज खूप दूरवर गेला होता. राणी यशोमती अत्यंत सुंदर होती तिला पाहून व्यापाऱ्याच्या मनात पाप जागृत झाला तो तिला त्याची पत्नी बनवू इच्छित होता. राणी यशोमतीने व्यापाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली, की तिला तिच्या पतिव्रता धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावर कोड येऊ दे. राणी यशोमतीची पार्थना सूर्यदेवाने ऐकली, त्याच वेळेला. राणी यशोमतीच्या शरीरावर कोड फुटला आणि अचानकच राणी यशोमती कुरूप दिसू लागली. तिचा तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ आता जात नव्हता. परंतु तो राणीला नेहमी त्याच्यासोबत ठेवायचा. इकडे राजा रडतडत नदीकिनाऱ्यावरून माघारी चालला होता.

 

राजाला अशी आशा होती की पुन्हा जर जहाज त्याच मार्गाने आला तर तो त्याच्या पत्नीला – सोडवू शकेल. परंतु राजाला तो जहाज पुन्हा दिसलांच नाही. त्यानंतर राजा त्याच नदीकिनारी साधूंच्या आश्रमामध्ये मध्ये राहू लागला. आता राजा तिथे साधू लोकांची सेवा करू लागला होता. साधूंच्या, गाई चरवण्याचं काम तो करू लागला होता आणि गाईच्या शेणापासून तो गोवरी बनवू लागला. परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या गोवरी सोन्याच्या बन. यच्या . अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा जमल्या. एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता, त्याचा जहाज त्याच नदीवर आला. राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं. राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन जहाज त्याच नदीवर आला. राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं. राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन गेला, तर ह्या सोन्याच्या विटा तो त्या व्यापाऱ्याला देईल.त्या व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं परंतु सोन्याच्या विटांच्या लालसामुळे व्यापाऱ्याने राजाला त्याच्या जहाजामध्ये घेतलं.

 

सर्व विटा सुद्धा जहाजामध्ये भरून घेतल्या. जेव्हा जहाज पुढे चालू लागला तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकळून दिले राजाच्या ओरडण्याचा आवाज राणीने ऐकला आणि तिने ताबडतोब एक मोठा लाकूड पाण्यामध्ये फेकून दिला. त्या लाकडाच्या आधारावर राजा एका पुलापर्यंत पोहोचला जिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल केला जायचा. राजाला तेथील लोकांनी बाहेर काढले त्या तिथे लोकांनी राजाला विचारले तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात?तेव्हा राजाने सांगितलं की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे त्याचा सर्व काही लुटलं गेलं आहे. त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही. तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजा जवळ घेऊन गेले. हर्षवर्धन राजाने तेथील राजा जवळ नोकरी मागितली. राजाने राजा हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एका माळ्याचं काम दिलं. त्या राजाची एक पुत्री होती तिच्यासाठी नित्यनेमाने सुंदर फुलांचा गजरा एक माळीन घेऊन यायची. एके दिवशी राजकुमारीने माळणीला विचारलं की हल्ली गजरे कोण बनवत असतो? खूपच सुंदर गजरे असतात. माळिणीने राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे जो खूपच सुंदर गजरे बनवतो. राजकुमारीने त्या नोकऱ्याला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा तिने राजा हर्षवर्धनला पाहिले तेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाली आणि राजा सोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला. तिला राजाने खूप नकार दिला परंतु जेव्हा राजकुमारीराजकुमारी त्याच्यावर मर्माहित झाली आणि राजा सोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला.

 

तिला राजाने खूप नकार दिला परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजलं तेव्हा त्याने नाईलाजाने दोघांचं लग्न लावून दिलं आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं. हळूहळू वेळ पुढे सरकू लागला. काही दिवस असेच निघून गेले तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारीला म्हणाला असं नुसतं बसून राहणं मला आवडत नाही. तू तुझ्या वडिलांना सांग की मला जहाजांचा टोल वसूल करण्याचा करार मिळवून दे. राजकुमारीने जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितलं तेव्हा राजा सुद्धा म्हणाला की ठीक आहे. आता हर्षवर्धन येणाऱ्या जहाजाकडून टोल वसूल करायचा. अशाच प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेले शनि देवाचा प्रभाव जेव्हा संपायला आला तेव्हा व्यापाऱ्याचा जहाज तिथेच आला. तेव्हा हर्षवर्धनने तो जहाज थांबवला. व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला. तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोहोचला. राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारलं घेतल्या आहेत. हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही.

 

राजकुमारीने जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितलं तेव्हा राजा सुद्धा म्हणाला की ठीक आहे. आता हर्षवर्धन येणाऱ्या जहाजाकडून टोल वसूल करायचा. अशाच प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेले शनि देवाचा प्रभाव जेव्हा संपायला आला तेव्हा व्यापाऱ्याचा जहाज तिथेच आला. तेव्हा हर्षवर्धनने तो जहाज थांबवला. व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला. तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोहोचला. राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारलं घेतल्या आहेत. हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही.

 

राजा म्हणाला तुझ्याकडे काय पुरावा आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत त्या तुझ्या आहेत. तेव्हा हर्षवर्धन म्हणाला महाराज तुम्ही ह्याला दरबारात सर्वांसमोर बोलवा. त्या विटा एका बाजूने जोडल्या गेलेल्या आहेत. जर तो व्यापारी त्या विटा खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या आणि जर तो त्या विटा खोलू शकला नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेल. व्यापारी त्या सर्व विटा दरबारात घेऊन आला.

 

राजा व्यापाऱ्याला म्हणाला जर ह्या विटा तुझ्या असतील तर तू या विटाउघडू शकला नाहीस तर तुझ्याकडून या विटा घेण्यात येतील. तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचाप्रयत्न करत होता. परंतु त्याच्याकडून एक सुद्धा वीट उघडली गेली नाही. शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली तेव्हा राजाचा जावई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्याने काही क्षणातच ती वीट उघडन दाखवली. तेव्हा राजाने राजाचा जावई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्याने काही क्षणातच ती वीट उघडून दाखवली.

 

तेव्हा राजाने विचारलं की तू कोण आहेस? तेव्हा राजा हर्षवर्धनने सर्व कथा सांगितली की महाराज मी आणि माझी पत्नी यशोमती आम्हा दोघांना ह्य व्यापाऱ्याने फसवलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमतीला याने माझ्याकडून हिसकावून घेतले आहे.कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या.राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमतीला आणण्यास सांगितले आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. राणी यशोमतीने पुन्हा सूर्य देवा समोर प्रार्थना केली की माझा पूर्वीचा रूप मला परत करावा. दर्शक मित्रांनो भगवान सूर्यदेवाच्या कृपेने राणी पुन्हा सुंदर झाली.

 

राजाने आदरपूर्वक हर्षवर्धन राजाला खूप मोठ्या प्रमाणात धनदौलत देऊन त्याचा निरोप घेतला. राजा पुन्हा त्याच्या राज्यात परत आला आणि पुन्हा राज सिंहासनावर विराजमान झाला. एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथे प्रकट झाले. शनि देवाने राजा हर्षवर्धनला म्हटलं राजन आम्हा दोघांची स्पर्धा तर एक निमित्त होता. आम्ही तुमच्या सत्याची परीक्षा घेऊ इच्छित होतो. आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते लोक आहेत ज्यांचा नाश कधीच होत नाही. नंबर एक विपत्ती मध्ये सुद्धा जो धर्माचा आणि सत्याचा त्याग करत नाही,त्याचा कधीच नाश होत नाही. कठीण प्रसंगात देवता सुद्धा त्याची मदत करतात.

 

नंबर दोन गरिबी आल्यावर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही पापी मार्गाने जो धन कमावत नाही असा व्यक्ती देवतांचा सदैव कृपा पात्र ठरतो.मी त्याचा कधीच वाईट करत नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. नंबर तीन धनसंपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्याचा अभिमान, त्याचा गर्व करत नाही. गुरुजनांचा दिनदुबळ्यांचा जो अपमान करत नाही. मी त्यांचा कधीच वाईट करत नाही मी नेहमीच त्यांची मदत करत असतो. माझ्या कृपेने लोक क्षणातच धनवान बनतात आणि क्षणात कंगाल सुद्धा बनतात.

 

त्यानंतर शनिदेवाच्या राजाला आशीर्वाद दिला कि तुझा राज्य आता संपन्न होऊन जाईल. धनधान्याची दौलतीची तुझ्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल. तुझी प्रजा नेहमी आनंदात असेल आणि कधीच दुःख दारिद्र्यता तुझ्या राज्यावर येणार नाही. राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले.

 

अशाप्रकारे हे शनिदेव आणि लक्ष्मी माताची एक पौराणिक कथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *