चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ? चिमणी घरात आल्यास काय घडते? नक्की जाणून घ्या!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण पक्षीप्रेमी असतात आणि त्यांना आपल्या घरामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या टेरेसवर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आल्याने खूप आनंद होत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यातील अनेक लोक आपल्या घरामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला आणि टेरेसवर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यावेत आणि ते आपल्याला दिसावेत यासाठी बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात, छोटी छोटी रेडिमेड घरे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी बाल्कनी, टेरेस किंवा खिडकीमध्ये ठेवली जातात आणि बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय केलेली दिसून येते.

 

तर मित्रांनो आज आपण याच चिमण्यांबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चिमन्यांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. चिमण्यांच्या विविध हालचालींवरून, त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण या चिमण्यांच्याकडून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो माणसाच्या जीवनात चूक, दुःख, चढ, उतार हे येतच असतात. कधी काय होईल व कधी काय नाही हे आपल्या हातात नाही आणि आपण त्याबद्दल ती घटना घडण्यापूर्वी जाणूनही घेऊ शकत नाही. चांगली घटना असो की वाईट घटना परंतु आपल्या जीवनात काहीही अचानक घडत असते. अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलतो आणि आपण मालामाल होतो.

 

आणि तो आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो. परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. परंतु काही प्राणी, पक्षी यांच्या संकेतांवरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी ती घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो. आपण हेच जाणून घेणार आहोत की असे कोणकोणते संकेत आहेत ज्यावरून आपण आपल्या भविष्याबद्दल ती घटना घडण्यापूर्वी ते जाणून घेऊ शकतो. चिमणीचे घरात येणे खुप शुभ असते. असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनीत ओत्यावर जर बित केले आणि आपल्या डोक्यावरून जर ती उडून गेली तर हे खूपच शुभ असते.

 

असे म्हटले जाते की ज्या घरांमध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात त्या घरांमध्ये साक्षात भगवंतांचे वास्तव्य असते. तसेच चिमणीने जर आपल्या डोक्यावर बित केले तर तेही खूप शुभ असते. जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन चिवचिवाट करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे. आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे.

 

जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहे आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत. जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे. आपले घर सुख व आनंदाने भरून जाईल. त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल, काही बाधा येणार असेल तर तेही टळून जाईल.

 

असे म्हणतात ज्या घरांमध्ये चिमण्यांची ये जा असते, जेथे चिमण्या ये जा करतात तेथे भगवंतांचे वास्तव्य असते आणि ते घर नेहमी आनंद, सुख व समाधानाने भरलेले राहते. कधी कधी आपण बघतो की चिमण्या आपल्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात ते खूपच शुभ असते आणि त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात. चिमणी घरात आल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते. तर मित्रांनो चिमणी एक छोटासा पक्षी आहे परंतु ती आपल्याला इतके मोठमोठे संकेत व आनंद देत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *