मित्रांनो, भारत सरकार व महाराष्ट्र शासन या अनेक योजनांचा अंमलबजावणी करत आहे. ज्याचा उपयोग अनेक लोकांना झालेला आहे. सर्वसामान्य माणसांना आर्थिक सहाय्य देणे असा हा या योजनांमध्ये उद्देश आहे. या योजनांमध्ये काही योजना या शेतकऱ्यांसाठी, काही योजना मागासवर्गीय लोकांसाठी, काही योजना वृद्ध व्यक्तींसाठी, तर काही योजना मुलींसाठी देखील चालू करण्यात आलेला आहे. आजच्या लेखामध्ये आपण मुलींसाठी चालू केलेली ‘लेक लाडकी योजना’ याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये या योजने अंतर्गत चा अर्ज कसा करावा? अर्ज भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे? त्यासाठी कोण कोण पात्र आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही योजना सुरू करण्याची शासनाच्या निर्णय घेतलेला आहे.
या योजनेची उद्दिष्टे म्हणजे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे. मुलींच्या शिक्षणास चालना देणे. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे. कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. असे आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.
या योजनेच्या काही अटी व शर्ती आहेत त्या म्हणजे ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचालाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
दिनांक १ एप्रिल, २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थी बैंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड,बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला),संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied), कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ला ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकता. पण याची नोंद अंगणवाडी सेवक कडे असणे खूप गरजेचे आहे. मुलगी जन्माला आल्याची नोंद आपण आपल्या शहरातील किंवा गावातील अंगणवाडीमध्ये त्याची नोंद अंगणवाडी सेवेकर करावी व त्यांना या योजनेचा लाभ फॉर्म भरण्याची सांगावे. याचा फॉर्म अंगणवाडी सेविकेकडूनच भरला जातो. त्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा फॉर्म भरू शकता.
दिनांक १ एप्रिल, २०२४ अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र, त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४राहील, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच याचा फॉर्म कशा पद्धतीचा असतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते पाहू शकता. https://drive.google.com/file/d/1HkollIFG72ceJgFm0AtRc0K2iLmnv7up/view?usp=drivesdk
अशाप्रकारे या योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या मुलीसाठी घेता येणार आहे.