नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात पिंपळाच्या झाडाचे फार महत्व आहे. बाकीची सर्व झाडे दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात परंतु पिंपळाचे झाड दिवसा आणि रात्री ऑक्सिजन सोडते. पिंपळाच्या झाडात साक्षात विष्णूचे वास्तव्य असते त्यामुळे त्याची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. तसेच पिंपळाचे पानांचे अनेक आ-युर्वेदिक औ ष धे बनवली जातात.
पिंपळाच्या झाडाला जर तुम्हाला विवाह ठरवण्यात अडथळे येत असतील तर प्रदक्षिणा घातली जाते. यामध्ये शनी देवांचा देखील वास असतो. साडेसाती असल्यास पिंपळाच्या झाडाचे पूजन आणि प्रदक्षिणा केली जाते. त्यामुळे शनी महाराजांच्या प्र को पा तू न सुटका होते.
पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचे वास्तव्य असते, म्हणून पिंपळाच्या झाडाचे पूजन सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी करावे नाहीतर तुमच्या घरात कंगाली, दारिद्र्य, दुर्भाग्य वास करते. पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा देखील वास असतो.
भगवान विष्णूनी पिंपळाच्या झाडाला असे वरदान दिले आहे की शनिवारी या झाडाची जे लोक पूजा करतील त्यांची साडेसातीपासून, शनीपासून सुटका होईल. माता लक्ष्मी त्यांच्या घरी वास करेल. शनी देवांच्या प्रकोपातून सुटका हवी असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून पहा.
रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी केलेली पिंपळाच्या झाडाची पूजा फलदायी ठरते तसेच अमावस्या व पौर्णिमेला सुद्धा ती फलदायी ठरते. शनिवारी मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्यामध्ये कापसाची वात न घालता काळ्या दोऱ्याची वात घालून त्यामध्ये एक खिळा किंवा एक रुपया टाकावा , तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.
पश्चिमेकडे वात होईल अशा पद्धतीने तो दिवा सायंकाळी लावावा कारण पश्चिम दिशेचे स्वामी शनी देव आहेत. असे केल्याने तुमच्या मागील पी-डा, त्रा-स कमी होतो. पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.
तुम्हाला जर सर्व देवी देवतांचा आशिर्वाद मिळवायचा असेल किंवा पितरांचा त्रा-स किंवा का ल स र्प दोष नष्ट करायचा असेल तर एक पिठाचा किंवा मातीचा दिवा घेऊन त्यात राईचे पीठ टाकावे, त्यात एक गोल वात मधोमध लावावी व त्यात थोडे काळे तीळ घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.
दिव्याची वात वरच्या दिशेला असावी. प्रथम श्री गणेशाला वंदन करून मग माता लक्ष्मी, शनिदेव, सर्व देवीदेवताना व नंतर पितरांना वंदन करून हनुमंताचे देखील स्मरण करावे. भगवान विष्णूंचा महामंत्र १०८ वेळा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा.
जर शनी दोषांपासून मुक्ती हवी असेल तर ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा राईच्या तेलाचा दिवा लावून तिथे पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालीसा म्हणावी. तसेच पिंपळाच्या झाडाचे पूजन रविवार सोडून दररोज केल्याने लाभ मिळतो परंतु तसे करत असताना शनिवार सोडून इतर दिवशी या झाडाला स्पर्श करू नये.
इतर दिवशी दुरूनच पूजन करावे. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे सर्व दुःख, दोष दूर होतील असे वरदान शनी देवांनी दिले आहे. अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.