नवरात्रीत जर तुम्हाला मिळाले हे संकेत, तर समजून साक्षात माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी झाले आहे घरामध्ये येत राहील पैसाच पैसा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, नवरात्री सुरु आहे आणि आपल्या सर्वांच्या घरी घटस्थापना केली असेलच. नवरात्रीच्या ९ दिवस देवींच्या ९ रूपांची आपण पूजा करतो त्यांना पुजतो आपण त्यांची मनोभावे पूजा करतो. पण नवरात्रीच्या पूजा हि आपली सफल होत आहे का, देवी आपल्यावरती प्रसन्न आहे का हे माहिती करून घ्याच असेल तर काही छोटे छोटे संकेत आपल्याला मिळत असतात. काही स्वप्ने अशी पडतात काही प्राणी, पक्षी आपल्याला समोर येतात. आपण त्यांना बारकाईने जाणले आणि हे संकेत समजून घेतले तर हि आपली नवरात्रीची पूजा आपली संपन्न झाली आहे का? माता राणीचा कृपाशिर्वाद आपल्याला लाभत आहे का? हे आपण सहजासहजी ओळखू शकतो.

मित्रांनो, हे संकेत आपण आपल्या आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो नवरात्रीतील पहिला संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसात स्वप्नात घुबड दिसले तर हा संकेत म्हणजे म्हणजे माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार आहे. म्हणूनच आपण आपल्या घरादाराची सर्व परिसराची स्वछता करा मातेच्या आगमनासाठी सुसज्ज व्हा. घरात दिवाबत्ती करा अखंड दिवा तर आपण लावलेला आहेच. मित्रांनो हा संकेत हे सांगतो कि, आपल्या जीवनात धनसंपदा, पैसा हे नक्की येणार आहेत. मित्रांनो घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते ह्यावरच माता बसून संपूर्ण पृथ्वीतलावर विचरन करत असतात.

दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे ह्या दिवसात सर्व शृंगार केलेली महिला जर तुम्हाला दिसली तर माता राणीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि मग तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल पैस्यांची च नाही तर इतर कोणतेही समस्या असतील तर ती समस्या लवकरच दूर होणार आहे ह्याचा हा संकेत असतो. म्हणून आपली नवरात्रीची पूजा आपण विधिविधान चालू ठेवा.

त्यानंतरचा तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे नारळ. कमळाचे फुल किंवा हंस पक्षी हे जर सकाळी सकाळी तुम्हाला दिसू लागले तर लक्षात घ्या कि, हि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी आहे कारण नारळ आणि कमळ ह्यांना मातेच्या पूजेत विशेष महत्ववआहे.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की हंस हे मातेचे वाहन आहे. ह्या गोष्टी सकाळी दिसणे हे मातेचा आपल्यावर आशीर्वाद मिळाल्याचे संकेत आहेत.
त्यानंतरचा चौथा संकेत जर घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला गोमातेचे म्हणजेच गाईचे दर्शन झाले तर हे खूप शुभ गोष्ट आहे कारण नवरात्रीच्या दिवसात गोमातेचे दर्शन होणे आणि त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाई दिसणे म्हणजे तुमच्या मनातील एखादी मनोकामना. लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ह्याचा हा संकेत असतो. तुम्ही मातेसमोर नतमस्तक होऊन एखादी इच्छा सांगितली नसेल तर ती तुम्ही बोलून दाखवा कारण हा संकेत तुमची इच्छा पूर्ण करणार आहे ह्याकडे दर्शवतो.

पाचवा संकेत असा येऊ कि,जर तुम्ही नवरात्रात कुठे बाहेर एका कामानिमित्त पडला असाल जर तुमचा प्रवास चालू असेल आणि त्यावेळी जर तुमच्या उजव्या हाताला जर तुम्हाला एखादा साप दिसला किंवा एखाद्या वान्यराचे दर्शन झाले किंवा स्वप्नात तुम्हाला सोनेरी कलरचा साप दिसला तर हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावर बरसत आहे असा याचा अर्थ होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला सुद्धा हे संकेत मिळत असतील तर तुमच्यावर सुद्धा माता अंबेचा आशीर्वाद मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर लक्षात ठेवा की, आता मातेची साथ ही तुम्हाला मिळालेली आहे आणि आता तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रयत्न सोबत आता मातेचा आशीर्वाद ही आता तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *