मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरासमोर कोणते झाड असावे? कोणते झाड असू नये? की ज्यामुळे त्याचे आपल्याला शुभ संकेत मिळतात किंवा अशुभ संकेत मिळतात. याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर कोअसूणतीही वस्तू कोणत्या ठिकाणी असावे व कोणत्या ठिकाणी नये. याबद्दलची संपूर्ण माहिती देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. जर आपण त्यानुसार सर्व क्रिया केली तर त्याचे उत्तम फळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असते.
जर आपण वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली तर त्यापासून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला ते अत्यंत फलदायी ठरत असत. म्हणूनच आज आपण वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या नारळाचे झाड आपल्या घरासमोर असणे शुभ असते की अशुभ असते. याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नारळ हा आपल्या आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये उपयोगि असा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये त्याला खूप मोलाचे स्थान असते. त्याच बरोबर एखादा पदार्थ बनवताना देखील नारळाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. याच नारळाचे झाड आपल्या घरासमोर असावे की नसावे याबद्दलची शंका सर्वांच्याच मनामध्ये असते. याबद्दलची संपूर्ण माहिती ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तसे तर कोणतेही झाड आपला घरासमोर लावणे हे अत्यंत शुभ असते. कारण त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.
परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार काही झाडे ही आपल्याला अशुभ फल देणाऱ्या असतात. म्हणून ती आपल्या घरासमोर किंवा दारासमोर अजिबात लावू नये. नारळाचे झाड हे कोणत्या ठिकाणी असावे व कोणत्या ठिकाणी असू नये. याची देखील माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तींची रास वृषभ किंवा तूळ आहे अशा व्यक्तींसाठी हे नारळाचे झाड अत्यंत शुभ मानले जाते.
ज्या घरातील कर्ता पुरुष यांची रास वृषभ किंवा तूळ असेल तर त्यासाठी हे नारळाचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये कुटुंबातील इतर व्यक्तींचा विचार करू नये. कारण करता व्यक्ती याचाच विचार आपल्याला येथे करायचा आहे. जर तुमच्या घरासमोर नारळाचे झाड असेल आणि तुमच्या घरामध्ये सतत धनाची समस्या निर्माण होत असते आणि तुमच्या घरात सतत भांडणे वाद्यविवाद होत असते. तर समजून जा की नारळाचे झाड तुमच्या घरासमोर आहे ते चुकीच्या दिसेस लावण्यात आलेले आहे.
यामुळे हे सर्व समस्या निर्माण होतात. नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. ज्या व्यक्तींच्या घरासमोर नारळाचे झाड, लाजाळूचे झाड, तुळस, हळद आणि दवना ही जर झाडे असतील तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला मिळत असतात. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला नियमनुसारच आपल्याला ही झाडे लावायचे आहे. तरच त्यापासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते व नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्याला धनलाभ होऊ शकतो व त्या घराची भरभराटी होते.
या झाडांना मनी प्लांट असे वास्तुशास्त्रामध्ये म्हटले गेले आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण नारळा विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कोणतेही शुभ झाड लावत असताना ज्यावेळी आपण त्या झाड लावण्यासाठी खट्टा खाण्यात असतो त्या खड्ड्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध व मध टाकावे आणि मगच ते झाड लावावे. नारळाची झाड ज्यांच्या घरासमोर असते त्या घरातल्या व्यक्तींना समाजा मध्ये मान सन्मान प्रतिष्ठान मिळत असते.
हे नारळाचे झाड जर तुम्ही लावणार असाल तर त्याचे मुख्य जागा ही आपल्या घराच्या पाठीमागच्या साईटला म्हणजेच परस बागेमध्ये लावावे. किंवा तुमच्या घराचे गार्डन असेल तर त्या ठिकाणी हे झाड लावावे. याचे योग्य दिशा म्हणजे दक्षिण दिशा व पश्चिम दिशा या दिशेलाच नारळाचे झाड लावावे. उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला नारळाचे झाड लावले असेल तर त्याची आपल्या घराच्या उंची पेक्षा जास्त नसावी. कारण या दिशेला जर झाडे असतील आणि ती उंच असेल तर घरामध्ये वाद विवाद सतत होत राहतात. जर अशुभ दिशेला जर आपले झाड असेल तर ते त्या ठिकाणाहून काढायला हवेत.
कारण नारळाचं झाड हे अशुभ दिशेला असेल तर ते आपल्यासाठी चांगले नसते. हे झाड काढण्यासाठी काही महिने वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेले आहेत. त्या महिन्यांमध्येच हे झाड काढावे. भाद्रपद व माघ या दोन महिन्यांमध्ये कधीही झाडे तोडू नयेत. असे वास्तु शास्त्राप्रमाणे सांगितले गेलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार नारळा संबंधीच्या या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याद्वारे आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगले संकेत आणू शकते. यानुसार तुम्ही देखील झाडे लावा त्याचा तुम्हाला शुभ परिणाम दिसून येईल.
अशाप्रकारे नारळाचे झाड हे योग्य दिशेला लावले तर ते आपल्यासाठी अत्यंत शुभ असते. यामुळे आपल्या घरातील सर्व धनसंबंधीच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये धनाची भरभराटी होऊ शकते.