मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गोष्टी करत असतो तो जसा काही आपल्या जीवनाचा भागच बनलेला असतो. आपल्या ऋषी-मुनींनी पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे वागावे, कोणती गोष्ट कोणत्या वेळी करावी, कोणत्या गोष्टी करू नयेत ही आपल्या धर्मग्रंथातून स्वतःच्या वागण्यातून त्यांनी आपल्याला शिकवून ठेवले आहे.
मित्रानो आणि त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांनी म्हणजे आजी-आजोबांनी आईवडिलांनी आपल्याला तसे शिकवून आपल्याला वळण लावलेली आहे आणि हीच गोष्ट पिढ्यानपिढ्या चालू राहते आणि त्यामुळे वारसाही चांगल्या गोष्टींचा चालू राहतो. या गोष्टी आपल्याला खूप साध्यासुध्या वाटतात परंतु आपल्या प्रत्येक पूर्वापार बाबींमध्ये काहीतरी चांगला अर्थ दडलेला आहे.
मित्रांनो सहज पदी पुर्वापार चालत आलेल्या या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. त्या त्या गोष्टी सर्वजण करत आहेत ना म्हणून आपण करतो. अशा रीतीने आपले जीवन चाललेले असते. परंतु या प्रत्येक गोष्टीत काही ना काही शास्त्र पडलेली आहे आणि जे मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
मित्रांनो आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या पूर्वजांनी साधुसंतांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत किंवा दैनंदिन वागणुकीबाबतच्या काही गोष्टी व नियम सांगितले आहेत, ज्या काही सवयी लावल्या आहेत त्या आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक आणि महत्त्वाच्या आहेत.
मित्रांनो त्यातीलच एक सवय म्हणजे उठल्याबरोबर स्नान करणे. स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. स्नान केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच त्याबरोबर आपले मनही प्रसन्न होते. स्नान करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात ते तर आपल्याला माहीतच आहे. शास्त्रानुसार स्नान करणे हे खूपच महत्त्वाचे कार्य आहे.
परंतु मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे का स्नान करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि एक विशिष्ट वेळ असते. आपल्याला हे माहीत नसते म्हणून आपण आपल्या मनात येईल वेळ मिळेल तेव्हा स्नान करत असतो. आत्ताच्या आधुनिक युगात तर लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहतात मोबाईल बघत बसतात सकाळी उठल्यावर देखील मोबाईलच हातात असतो. त्यात अत्यंत वाईट सवयी आहेत म्हणजे सकाळी उठल्याबरोबर दारात किंवा अंगणात जाऊन मोकळ्या वातावरणात उभे राहून श्वास घेणे किंवा समोर डोंगर बाग असे काही असेल तर ती हिरवळ पाहणे अत्यंत सुखदायी असते.
परंतु आपली ही सवय खूप चुकीचे आहे. कोणत्याही वेळी स्नान केल्याने आपल्याला त्याचा फायदा तर होत नाहीच उलट नुकसान होते. गरुड पुराणात सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.
गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे त्यात सविस्तर वर्णन केलेले आहे जीवन मृत्यू व स्वर्ग-नरका बरोबरच धर्म, व्यवहारिक ज्ञान, संस्कार, वर्तन, सवयी या सर्वांबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती त्यात आहे.
आपण जाणून घेणार आहोत स्नान करण्याची योग्य वेळ कोणती? स्नानाचे किती प्रकार आहेत व कोणत्या प्रकारचे स्नान कोणत्या वेळी केले तर फायदा होतो.
स्नानाचे पाच प्रकार आहेत
शास्त्रानुसार ब्रह्म स्नान, देव स्नान, ऋषी स्नान, मानव स्नान, दानव स्नान असे प्रकार पाच प्रकार आहेत. या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेली आहे.
गरुड पुराणानुसार ब्रह्म मुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय म्हणजे दिवसातील पहाटे ती तीन ते पाच ही वेळ सर्वात शुभ आहे. ही वेळ भगवंताची असते म्हणून या वेळी केलेले स्थान सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असते. ब्रह्म स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध्य दिल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते.
पहाटे चार ते पाच या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या स्नानाला ही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे. यावेळेस स्नान केल्यास आपल्या शरीरात मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो.
सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात. तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. यावेळेस स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते.
सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो.
सकाळी आठ नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान म्हटले जाते हे अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते यामुळे या वेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही. ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते. म्हणून सकाळी आठ वाजता नंतर कधीही स्नान करू नये.
स्त्रियांनी आठ नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. काही व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात हे स्नान तर खूपच अशुभ असते.
ज्या व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग लोभ द्वेष नकारात्मकता कंटाळा या गोष्टी असतात. या लोकांचा चिडचिडपणा वाढतो त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात.
गरुड पुराणात आपल्याला ब्रह्म स्नान देव व स्नान ऋषी स्नान किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे. रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंतांचे स्मरण करावी. स्नान करून सुर्यदेवांना अर्ध्य दिल्यास आपल्या शरीराबरोबर मनही शुद्ध व पवित्र होते. आणि आपल्या अनेक अडचणींचा ही अंत होतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.