मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकाचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. अनेक नवनवीन रोग डोके वर काढताना दिसत आहेत. तसेच मित्रांनो आज काल या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाचेच आपले आरोग्याकडे लक्षही राहिले नाही. ते आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत व त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपणाला उद्भवतात. तर मित्रांनो लिव्हर हे एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे.
लिव्हर हे आपल्या शरीरामध्ये जर खराब झाले असेल तर आपल्याला त्याचा खूपच घातक परिणाम होऊ शकतो. लिव्हर जर खराब झाले असेल तर त्याचे अनेक संकेत देखील आपल्याला मिळतात. तर मित्रांनो लिव्हर खराब होण्याच्या अगोदर आपणाला कोणकोणते संकेत मिळतात. याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत.
तसेच मित्रांनो आपल्या आहारामध्ये तेलकट, तुपकट तसेच जंक फूडचा अतिवापर यामुळे आपले लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. तसेच मित्रांनो दारू, मद्यपान यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे देखील त्याचा लिव्हरवर वाईट परिणाम दिसून येतो.
लिव्हर हे आपल्या शरीरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रंथी पैकी एक आहे. शरीरातील 500 पेक्षा जास्त कार्य लिव्हर करते. आपल्या शरीरामध्ये अन्नपचनापासून ते आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्यापर्यंतची सर्व कामे हे लिव्हरच्या मदतीने केली जातात.
लिव्हर मध्ये आपल्याला थोडीशी जरी खराबी आली तर आपणाला वेगवेगळ्या संकेतामार्फत ते पाहायला मिळते. परंतु मित्रांनो शरीरावर त्याचा वेगळा परिणाम होत असतो. परंतु मित्रांनो या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. मग पुढे जाऊन आपल्याला खूप मोठ्या आजारांचा सामना देखील मग करावा लागतो. जर मित्रांनो आपल्या लिव्हरला एखादी छोटीशी जरी इजा झाली तर यामुळे आपल्या शरीरावर अनेक घातक आजार होऊ शकतात.
मित्रांनो जर तुम्हाला खाल्लेले अन्न पचत नाही म्हणजेच अपचन तसेच गॅसेस आणि तुम्हाला जर उलटी आल्यासारखे वाटत असेल तर मित्रांनो हे देखील लक्षण आपल्या लिव्हरमध्ये थोडीशी खराबी झाली असेल तर आपणाला दिसून येते. म्हणजेच लिव्हर खराब होण्याची ही सुरुवातीची स्टेप देखील असू शकते.
तसेच मित्रांनो जर आपण बाहेरचे थोडेसे जरी अन्न खाल्ले तर ते आपणाला पचत नाही व त्यामुळे आपल्याला गॅस निर्माण होतो. आपले पोट साफ होत नाही. अपचन, गॅसेस सारखी समस्या जर तुम्हाला दररोज जाणवत असेल तर यावेळी तुम्ही समजून जा की आपल्या लिव्हर मध्ये थोडीशी तरी खराबी झाली आहे. त्यामुळे मित्रांनो अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे.
तसेच मित्रांनो आपण भरपूर जरी खाल्ले तरी ते अन्न आपल्याला पचत नाही. म्हणजेच आपले वजन वाढत नाही. आपण जे खातो त्यातील पोषक तत्वे म्हणजेच आपल्या शरीराला मिळत नाहीत व त्यामुळे आपले वजन वाढत नाही. आपण किती व्यायाम केला, कितीही अन्न खाल्ले तरीही आपले वजन जर वाढत नसेल तर मग ते आपल्या लिव्हर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल हे मात्र नक्की.
तसेच मित्रांनो आपण काहीतरी बाहेरचे खाल्ले तर आपल्या तोंडाचा वास येत असतो. परंतु मित्रांनो असे बाहेरचे खाल्ले अन्न नाही खाल्ले तरी देखील आपल्या तोंडाचा जर वास दररोज येत असेल तर हे देखील आपल्या लिव्हरची संबंधित आहे. त्यामुळे मित्रांनो या लक्षणाकडे देखील तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका.
मित्रांनो तुम्ही ब्रश करून देखील तुमच्या जर तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही एक वेळ तुमच्या लिव्हरची टेस्ट करून बघायची आहे. तसेच मित्रांनो भूक न लागणे हे देखील आपले लिव्हर खराब होण्यामागचे संकेत आहे.
म्हणजेच मित्रांनो आपण ज्या वेळेस आपण जेवतो. त्यावेळेस आपणाला भूकही नसते म्हणजेच आपण कोणतेही अन्न ग्रहण करणे आपणाला नकोसे वाटते. म्हणजेच आपले पोट हे गच्च राहिल्यासारखे आपणाला वाटते म्हणजे जे आपण पहिल्यांदा अन्न खाल्लेले आहे त्याचीच पचनक्रिया आपली व्यवस्थित झालेली नसते. हे जर भूक न लागण्याची समस्या तुम्हाला जर दररोज सतावत असेल तर हे देखील आपले लिव्हर खराब होण्यामागचा एखादा संकेत असू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे गरजेचे आहे.
तसेच मित्रांनो तुम्हाला जर लिव्हरच्या आसपास त्रास होत असेल तर हा देखील आपले लिव्हर खराब होत आहे असा संकेत असतो. म्हणजेच आपले लिव्हर खराब झाल्यानंतर ते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मसल्सना देखील खराब बनवते. त्यामुळे मग आपणाला लिव्हरच्या आजूबाजूला वेदना होण्यास सुरुवात होते.
तसेच मित्रांनो आपल्या शरीरावर एलर्जी होणे हा देखील लिव्हर खराब होण्यामागचा संकेत आहे. मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या एलर्जी आपल्याला दिसून येतात. परंतु मित्रांनो तुमच्या शरीरावरती लालसर चट्टे निर्माण होणे म्हणजेच त्या ठिकाणी आपणाला खाज खुजली होत असेल आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर इतरत्र लाल चट्टे पडण्यास सुरुवात होते आणि हा देखील मित्रांनो लिव्हर खराब होण्यामागचा संकेत असू शकतो.
अशा प्रकारची एलर्जी आपणाला जास्त करून हात आणि गर्दनच्या ठिकाणी जास्त दिसून येते. तर मित्रांनो तुम्ही देखील सावध व्हा. तसेच मित्रांनो डोळे, त्वचा पिवळसर पडली असेल तर हे देखील आपले लिव्हर खराब होण्यामागचे संकेत आहे.
तसेच मित्रांनो आपल्या लघवीचा कलर देखील जर पिवळसर जाणवत असेल तर मित्रांनो तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. तसेच मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच आळस आणि कमजोरी जाणवत आहे. परंतु मित्रांनो हा थकवा आणि कमजोरी तुम्हाला दररोज जर जाणवत असेल तर हा देखील आपला लिव्हर खराब होण्यामागचा संकेत आहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे हे काही संकेत आहेत जे आपले लिव्हर खराब होण्यापूर्वी आपल्याला मिळत असतात. तर मित्रांनो या लक्षणांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घेणे जरुरीचे आहे.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.