मित्रांनो पावसाळा सुरू झाला किंवा थंडी सुरू झाल्यावर बऱ्याच लोकांना सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो खूप लोक यासाठी महागडी औषधे घेतात बाजारात जाहिरातीतील बघून औषध विकत आणतात पण याचा उपयोग त्यांना फार कमी वेळा साठी होतो आणि पुन्हा खोकला सुरू होतो तर अशा लोकांसाठी आपण आज एक घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा खोकला एका रात्रीत गायब होईल आणि मित्रांनो जर तुमचा घसा दुखत असेल घशात खवखव होत असेल घशाला सूज असेल तर सर्दी येण्यापूर्वीची ही सर्व लक्षणे आहेत.
मित्रांनो यासाठी आपण जो उपाय पाहणार आहोत त्यामुळे चुटकीसरशी तुमचा सर्दी आणि खोकल्याचा त्रास निघून जाईल. आणि खोकल्या वरती एक साधा सोपा आणि रामबाण असा उपाय याठिकाणी बनवून दाखवणार आहे जर मित्रांनो तुमच्या छातीमध्ये कफ साठला असेल घशामध्ये इन्फेक्शन झाला असेल जर घशामध्ये खवखव जाणवत असेल जर तुमच्या घसा दुखत असेल घशेला सूज आली असेल. सर्दी होण्या पूर्वी ची जी प्रक्रिया आहे ती जर तुम्हाला जाणवत असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि तुमचे ह्या जे समस्या आहे ते तुमच्या चुटकी सरशी बर्या करण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे फ्रेंड्स सध्याचे ह्या भयावह वातावरणा मध्ये आपण जीवन जगत आहोत.
आणि मित्रांनो यामध्ये जर आपल्या घशामध्ये थोडास जर इन्फेक्शन झालं किंवा आपल्याला घशामध्ये खवखव जाणवली तर आपल्याला लगेच भीती वाटते परंतु मित्रांनो घाबरण्या ऐवजी आपण साधे सोपे घरगुती उपाय करा आणि आपल्या जे आरोग्य आहे ते तुम्ही नक्कीच निरोगी बनवण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेऊ शकता. जर आपल्याला सर्दी-पडसे झाले की आपल्या छातीमध्ये कफ साठतो आणि कफ साठल्यामुळे वारंवार आपल्याला खोकल्याची उबळ येते आपल्या छाती तील कफ बाहेर काढण्यासाठी वारंवार जी प्रक्रिया होते आणि त्याला खोकला म्हणतात जर आपल्याला वारंवार खोकला आला कोरडा खोकला असो ओला खोकला कफाचा खोकला किंवा तुम्हाला ऍलर्जीचा खोकला असेल.
तर ह्या सर्व खोकल्याची समस्या तुमच्या समोरून नष्ट करण्यासाठी मित्रांनो हा उपाय तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक विडाचे पान यालाच खाऊचे पान म्हणतात. आणि मित्रांनो काही भागामध्ये नागिनीचे पान नागवेलीचे पान ह्या नावाने ओळखले जाते तर हे जे पान आहे ते सहजा सहजी आपल्याला पान टपरी वरती उपलब्ध होते. तर मी हे सर्व पान मिठाचे पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत कोरडी केलेले आहेत तर त्याचा आपण सुरुवातीला डेट कट करून घ्यायचा आहे डेट कट करून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने पान उलटे ठेवायचा आहे.
आणि त्यामध्ये दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हा आहे ओवा यामध्ये ओवा एक छोटा चमचा ऍड करायचा आहे. तर मित्रांनो हे जे नागिनीचे पान आहे यामध्ये केल्शियम थायमिन कॅरोटीन नावाचे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात त्याच बरोबर यामध्ये खानिजे देखील असल्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे करण्यासाठी आपण अशा पद्धतीने या पानाचा विडा तयार करायचा आहे आणि मित्रांनो ओव्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणामध्ये असतात ओवा उष्ण आहे त्याचबरोबर पाचक देखील आहे ओव्यांमध्ये थायमोल नावाचा जो घटक आहे तो आपले छातीमध्ये साठलेला कफ पूर्णता पातळ करून आपले छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी ओव्याचे आपल्याला खूप सारी मदत होत असते.
मित्रांनो जर तुम्ही हे तुमच्याकडे विडेचे पान नसेल तर मित्रांनो फक्त तुम्ही ओवा देखील थोडासा चावून खाल्ला तरी देखील तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे होण्यासाठी या ओवेची मदत होणार आहे तर अशा पद्धतीने विडा आपण तयार करायचा आहे आणि सकाळी उपाशी पोटी ह्याचा सेवन करायचा आहे सलग तीन दिवस. ओवा थोडासा तिखट असल्या मुळे आपण यामध्ये एक महत्त्वाचा आणि उपयुक्त असा खोकल्या वरती जो पदार्थ आहे आणि तो या मध्ये ऍड करणार आहोत तर त्यामध्ये आपण एड करणार आहोत मध जर तुम्हाला ओवा तिखट वाटत नसेल तर तुम्ही फक्त ओव्याचा देखील सेवन करू शकता.
परंतु यामध्ये जर आपण मध घातला तर आणखीन ह्या पानाची जी आयुर्वेदिकता आहे ती वाढणार आहे आणि आपला खोकला नक्कीच थांबण्यासाठी मदत होणार आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.