मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.
या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो. त्यातून आपली सुटका होणार आहे आणि हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दालचिनी, आलं आणि खडीसाखर तसेच पाणी लागणार आहे. मित्रांनो दालचिनी हा मसाल्यामधील एक पदार्थ आहे. दालचिनी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा पदार्थ आहे आल म्हणजेच आद्रक. या मध्ये खोकला असेल, सर्दी असेल, कफ पातळ होऊन बाहेर काढण्यासाठी सुद्धा या चांगल्या प्रकारे वापर केला जातो.
त्याचबरोबर पोटातील वायू, गॅसचा नाश करण्यासाठी आपण आल्याचे सेवन करतो. तुमच्या स्नायूमध्ये जर वेदना होत असतील तर त्या भागावर बाहेरून जर आल्याची पेस्ट लावली तर वेदना कमी सुद्धा होऊ शकते. दमा असेल, डांग्या, खोकला असेल क्षय रोगाचा खोकला असेल हे अनेक प्रकारच्या खोकल्यावर हे खूप फायदेशीर आहे.
मित्रांनो खास करून खोकला आणि सर्दीसाठी तर ते रामबाण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यामुळे आपण याचा समावेश यामध्ये केलेला आहे. मित्रांनो तिसरा घटक आहे ते म्हणजे खडीसाखर. पण छोटी चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये बारीक खडीसाखर मिळते या खडी साखरेला खांड, खडीसाखर असे म्हणतात. ही थंड असते.
मित्रांनो जर आपल्याला अंगामध्ये उष्णता वाढली असेल तर खडीसाखरेचे सेवन आपण अवश्य केले पाहिजे. खडीसाखरेची पावडर आणायची नाही तर अशी ओबड-धोबड मोठ्या आकारात मिळते ती खडीसाखर आणायची. ती कडकड करून खायची किंवा बारीक पावडर करून जरी खाल्ले तरी काही अडचण नाही.
मित्रांनो या खडीसाखरेचे सेवन केलं तर बरेच फायदे तुमच्या शरीराला मिळू शकतो. मित्रांनो खडीसाखर हे अतिशय फायदेशीर आहे मित्रानो तुम्हाला जर लघवी करताना जळजळ होत असेल तरीसुद्धा तुम्ही खडीसाखरेच सेवन केलेल अतिशय चांगल असतं किंवा तुमचे पाय जळजळ करत असतील, हात भगभग करत असेल त्याच्यावर सुद्धा एक रामबाण उपाय म्हणून आपण खडीसाखर कडे पाहू शकतो.
मित्रांनो खडीसाखर ही आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मित्रांनो या तिन्ही घटकांचा समावेश करून आपल्याला या ठिकाणी सर्दी, खोकला, कफ यासाठीचा आजचा हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो यासाठी गॅसवर एक पातेले ठेवा. त्यामध्ये एक कप पाणी घाला. एक कप पाण्यामध्ये आपल्याला सुपारीएवढा एक छोटासा खडा खडीसाखरेचा टाकायचा आहे किंवा त्याची पावडर करून तुम्ही टाकु शकता आणि त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला लागणार आहे दालचिनी. आपल्या शरीराच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पण ते कमी प्रमाणामध्ये अति प्रमाणामध्ये त्याचं सेवन अजिबात करू नये.
कारण कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा साईड इफेक्ट हा ठरलेलाच असतो. त्याच्यामुळे आपण एक छोटासा तुकडा टाकलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला आल टाकायच आहे. साधारण आपल्या बोटाच्या एका पेराएवढा आल्याचा तुकडा कापून टाका. आल्याच प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. कारण का आल्याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत.
मित्रांनो आपण पातेल्यात छोटा एक कप पानी घ्यायच आणि त्यात दालचिनी, आलं आणि खडीसाखर घालायचे. हे एक कप पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या. जस चहा पितो तस प्यायचं आहे. जर हा चहा घेतला तर तुमचा कफ असेल, सर्दी असेल तो कमी होईल.
हा चहा थोडं कोमट घ्यायचा. आपण गरम पाणी करुन पितो. गरम पाण्याने सुद्धा कफ पातळ होत असतो. त्यामुळे जितका गरम पिता येईल इतका गरम हा चहा प्या. प्रमाणामध्ये घ्या. हा चहा तुमचा कप पातळ होण्यासाठी तसेच सर्दी, खोकला कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
तर मित्रांनो तुम्हालाही वारंवार सर्दी, खोकला, छातीतील कफ या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.