‘हे’ तेल केसांच्या मुळांना लावा, आणि चमत्कार परत केस इतके प्रचंड वाढतील की लोक वळून वळून पाहतील …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये प्रदूषण आणि चुकीची जीवनशैली यामुळे केस गळणे किंवा तुटणे ही समस्या सामान्य आहे. बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे आपले केस कमकुवत होतात. केसांशी संबंधित समस्यांमुळे सध्या बहुतांश जण त्रस्त आहेत. तणाव, शरीरातील पोषण तत्त्वांची कमतरता, कोंडा, शारीरिक आजार, थायरॉइड इत्यादी कारणांमुळे केसगळतीची समस्या निर्माण होते. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती केसगळती तसंच टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. पण यामागील प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात.

काही जण केसांवर कलर ट्रीटमेंट, डाय लावणे किंवा ब्लीचिंग यासारख्या केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. यामुळे केसांच्या मुळांवर दुष्परिणाम होतात. परिणामी केस प्रचंड प्रमाणात गळतात. तर मेनोपॉजदरम्यान शरीरातील हार्मोन असंतुलित होत असल्या कारणामुळेही महिलामध्ये केसगळतीची समस्या अधिक प्रमाणात वाढते. तुम्ही देखील केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर ही समस्या दूर करण्यासाठी घरच्या घरी तयार केलेल्या आयुर्वेदिक तेलाचा वापर करून पाहा. तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय मध्ये आपण एक आयुर्वेदिक तेल घरामध्ये तयार करणार आहोत.

आणि मित्रांनो आजच आपण हे आयुर्वेदिक तेल तयार करणार आहोत हे आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि त्याच बरोबर हे तेल तयार केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये या तेलाची एका भरणी मध्ये किंवा डब्यामध्ये साठवून देखील ठेवू शकतो म्हणजेच या तेलाचा वापर आपल्याला खूप दिवसांसाठी करता येतो तर मित्रांनो कोणत्याही आयुर्वेदिक तेल आणि कशा पद्धतीने आपल्याला हे आयुर्वेदिक तेल आपल्या घरामध्ये तयार करायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो आपल्याला हे आयुर्वेदिक तेल तयार करण्यासाठी जो पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरांमध्ये कढीपत्त्याचे झाड हे नक्कीच असते आणि याच कढीपत्त्याचा वापर करून आज आपण हे आयुर्वेदिक तेल करणार आहोत मित्रांनो कढीपत्ता मध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या केसांसाठी खूपच उपयुक्त असतात आणि म्हणूनच यामुळे आपली केस गळती किंवा नाजूक केस आणि त्याचबरोबर पांढरे केस यांसारख्या सर्व समस्या यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे दूर होतात आणि म्हणूनच याचा वापर आपल्याला आजच्या या उपायासाठी करायचा आहे.

तर मित्रांनो यासंबंधीचा हा एक छोटासा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एका मोठ्या बोलमध्ये कढीपत्त्याची पाने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही पाने आपल्याला स्वच्छ पाण्याच्या सहाय्याने धुऊन घ्यायचे आहेत मित्रांनो जर तुम्ही गरम पाण्याने ही पाने धुतले तर यामुळे त्या पानांवर असणारे सर्व जीवजंतू नष्ट होऊन जातील तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पाने सर्वात आधी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये थोडी पाणी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे खोबरेल तेल आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने या दोन पदार्थांची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो खोबरेल तेल आणि कढीपत्त्याची पाने यांची तयार झालेली पेस्ट आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला दुसरीकडे एका गॅसवर लोखंडाची कढई ठेवायची आहे मित्रांनो जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर अशावेळी तुम्ही कोणतीही जाड पात्र घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वाटी खोबरेल तेल घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ही जी आपण कढीपत्त्याची पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस सुरू करून हे मिश्रण गरम करून घ्यायचा आहे मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे.

आणि या मिश्रणाचा म्हणजेच या तेलाचा रंग थोडासा हिरवा झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो गाळणीच्या सहाय्याने हे तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तेल गाळून घेतल्यानंतर आपल्याला खाली निघालेले जे कढीपत्त्याचे आयुर्वेदिक तेल आहे हे एका बरणीमध्ये किंवा एका डबे मध्ये साठवून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आठवड्यातून दोन ते तीन वेळा ज्यावेळी तुम्ही केस धुवाल त्यावेळी या तेलाने तुम्हाला तुमच्या संपूर्ण केसांच्या मुळांमध्ये आणि केसांवर मालिश करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केला तर यामुळे तुमची केस गळती पांढरे केस आणि केसावरील चमक या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचे केस खूप मजबूत होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *